Saturday, April 20, 2024
Saturday, April 20, 2024

HomeFact CheckFact Check: तिरुपती तिरुमला मंदिराच्या ट्रस्टीच्या घरावर पडला आयटीचा छापा? काय आहे...

Fact Check: तिरुपती तिरुमला मंदिराच्या ट्रस्टीच्या घरावर पडला आयटीचा छापा? काय आहे व्हायरल दाव्याचे सत्य

Claim
तिरुपती मंदीराच्या विश्वस्थावरच आयटीचा छापा पडला आहे. भक्तांनी विचार करावा आपला पैसा कुठे जात आहे.
Fact
तिरुपती मंदिराच्या एका विश्वस्थांवर २०१६ मध्ये  छापा पडला होता मात्र पुरावे न मिळाल्याने प्रकरण बंद करण्यात आले आहे. 

सोशल मीडियावर एक व्यक्तीचा फोटो वापरून एक दावा केला जात आहे की तिरुपती तिरुमला मंदिराच्या विश्वस्थांवर आयटी विभागाचा छापा पडला आहे. हा दावा मागील दोन वर्षांपासून केला जात असून सध्या व्हाट्सअप च्या माध्यमातून पुढे आला आहे.

Fact Check: तिरुपती तिरुमला मंदिराच्या ट्रस्टीच्या घरावर पडला आयटीचा छापा? काय आहे व्हायरल दाव्याचे सत्य
Courtesy: Twitter@JamdhadeMahadev

“आयकर विभागाच्या छापां मध्ये हा तिरुमला तिरुपती बालाजी देवस्थान मध्ये जी 16 विश्वस्त आहेत त्यापैकी हा एक विश्वस्त आहे त्याच्या घरी आय कर विभाग ने छापे मारले 128 किलो सोनी 150करोड कॅश आणि70 करोड चे हिरे सापडले आहेत भक्तांना विचार करा आपला पैसा कुठे जात आहे सोळा विश्वस्तांनपैकी एक” अशा कॅप्शन च्या माध्यमातून हा दावा केला जात आहे.

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

Fact Check: तिरुपती तिरुमला मंदिराच्या ट्रस्टीच्या घरावर पडला आयटीचा छापा? काय आहे व्हायरल दाव्याचे सत्य
Screengrab of Whatsapp Tipline

Fact check/ Verification 

तिरुपती तिरुमला मंदिराच्या १६ विश्वस्थांपैकी एकावर आयकर खात्याची धाड पडली आहे का? याचा आम्ही पहिल्यांदा तपास केला. किवर्ड च्या माध्यमातून आम्ही गुगल सर्च केले. व्हायरल दाव्यामध्ये म्हटल्याप्रमाणे आम्ही ‘128 किलो सोने, 150 करोड कॅश आणि 70 करोड चे हिरे’ कोणत्या धाडीत सापडले आहेत का? याचा शोध घेतला. अमर उजाला ने 9 डिसेंबर 2016 रोजी प्रकाशित केलेला रिपोर्ट आम्हाला प्राप्त झाला. वृत्तानुसार, जे शेखर रेड्डी आणि त्यांचे सहकारी के श्रीनिवासुलू यांना पोलिसांनी अटक केली. नोटाबंदीनंतर, चेन्नईतील रेड्डी यांच्या घरावर आणि कार्यालयावर आयकर छाप्यांमध्ये 127 किलो सोने आणि 170 कोटी रुपये रोख जप्त करण्यात आले. असे या बातमीतून आम्हाला समजले.

Fact Check: तिरुपती तिरुमला मंदिराच्या ट्रस्टीच्या घरावर पडला आयटीचा छापा? काय आहे व्हायरल दाव्याचे सत्य
Screengrab of Amarujala

वृत्तानुसार, 9 डिसेंबर 2016 रोजी प्राप्तिकर विभागाने छापे टाकल्यानंतर रेड्डी यांना आंध्र प्रदेश सरकारने TTD (तिरुमाला तिरुपती देवस्थानम) बोर्डाचे सदस्य म्हणून काढून टाकले होते. अशी माहिती आम्हाला मिळावी. यावरून व्हायरल दाव्यामध्ये ज्या विश्वस्थांबद्दल बोलले जात आहे ते जे शेखर रेड्डी असल्याचे आमच्या निदर्शनास आले. आम्ही यासंदर्भात आणखी शोध घेतला.

आम्हाला ‘द हिंदू’ ने सप्टेंबर 2020 मध्ये प्रकाशित केलेले एक वृत्त सापडले. वृत्तानुसार, जे शेखर रेड्डी यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात सीबीआयला कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. वृत्तानुसार, सीबीआयने पुराव्याअभावी या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केला. हे प्रकरण बंद करण्यात आले.

Fact Check: तिरुपती तिरुमला मंदिराच्या ट्रस्टीच्या घरावर पडला आयटीचा छापा? काय आहे व्हायरल दाव्याचे सत्य
Screengrab of The Hindu

एकंदर शोधातून आम्हाला तिरुपती तिरुमला मंदिराचे विश्वस्थ जे शेखर रेड्डी यांच्यावर पडलेला आयकर विभागाचा छापा ही २०१६ मधील घटना असल्याचे आणि २०२० पूर्वीच त्यांच्यावरील छापा प्रकरण बंद झाल्याचे निदर्शनास आले. ही घटना अलीकडील नसून तिरुपती मंदिराच्या विश्वस्थांवर छापा पडल्याचा सध्या होत असलेला दावा पाहता अलीकडील काळात अशी कोणतीही घटना न झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Conclusion

प्राप्तिकर विभागाने डिसेंबर २०१६ मध्ये जे शेखर रेड्डी यांच्या चेन्नईतील घर आणि कार्यालयावर छापे टाकले होते आणि त्यादरम्यान विभागाने १२७ किलो सोने आणि १७० कोटी रुपये रोख जप्त केले होते. त्यानंतर सप्टेंबर 2020 मध्ये सीबीआयने पुराव्याअभावी प्रकरण बंद केले. दरम्यान जुन्या घटनेवरून दावा करीत दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे.

Result: Partly False

Our Sources

Report published by Amar Ujala on December 21, 2016

Report published by The Hindu on September 29, 2020


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular