Authors
Claim
रामनवमीच्या मुहूर्तावर बुर्ज खलिफावर प्रभू रामाची प्रतिमा झळकविण्यात आली.
Fact
रामनवमीच्या निमित्ताने कोणताही लाइट शो नव्हता, स्टॉक फोटो डिजिटली बदलण्यात आला आहे.
दुबईच्या प्रतिष्ठित बुर्ज खलिफावर प्रभू रामाची प्रतिमा प्रदर्शित होत असलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 30 मार्च 2023 रोजी असलेल्या रामनवमीच्या निमित्ताने लाइट शो करण्यात आल्याचा दावा अनेक युजर्सनी केला आहे.
बुर्ज खलिफा त्याच्या दर्शनी भागाच्या एका बाजूला (डाउनटाउन दुबईतील बुर्ज लेककडे) दैनंदिन लाइट शो तसेच नवीन वर्ष आणि राष्ट्रीय दिवस यासारख्या प्रसंगी विशेष शो आयोजित करण्यासाठी ओळखले जाते. गल्फ न्यूजच्या बातमीनुसार, शोची मीडिया फाइल “मेन ब्रेन” सर्व्हरशी जोडलेल्या लॅपटॉपवर चालते, जी फायबर ऑप्टिक्स आणि स्मॉल ब्रेनच्या नेटवर्कद्वारे, दर्शनी भागावरील लहान एलईडी दिव्यांना विशिष्ट रंग प्रदर्शित करण्याची सूचना देते.
इतर भाषांमध्येही आम्हाला समान दावे प्राप्त झाले आहेत.
ट्विटच्या संग्रहित आवृत्त्या येथे, येथे आणि येथे पाहता येतील.
Fact check/ Verification
न्यूजचेकरने प्रथम “राम नवमी बुर्ज खलिफा” या कीवर्डचा शोध केला, यामध्ये राम नवमीच्या निमित्ताने लाइट शो आयोजित करण्यात आल्याचे कोणतेही विश्वसनीय वृत्त मिळाले नाही.
त्यानंतर आम्ही व्हायरल झालेल्या फोटोचा रिव्हर्स इमेज शोध घेतला, ज्यामुळे आम्हाला 3 फेब्रुवारी 2016 रोजी iStock वर अपलोड केलेल्या बुर्ज खलिफाच्या या स्टॉक फोटोकडे नेले. दोन्ही प्रतिमांची तुलना केल्यास असे दिसून येते की स्टॉक फोटो भगवान राम गगनचुंबी इमारतीवर प्रक्षेपित झाले असे दिसण्यासाठी तो संपादित केला गेला. एक समान स्टॉक फोटो येथे पाहिला जाऊ शकतो.
न्यूजचेकरने यासंदर्भातील प्रतिक्रियेसाठी बुर्ज खलिफा अधिकार्यांशी देखील संपर्क साधला आहे. आम्हाला प्रतिसाद मिळाल्यावर हा लेख अपडेट करण्यात येईल.
Conclusion
रामनवमीच्या दिवशी गगनचुंबी इमारतीवर प्रभू रामाची प्रतिमा प्रदर्शित करण्यात आल्याचे दिसण्यासाठी बुर्ज खलिफाचा स्टॉक फोटो डिजिटली बदलण्यात आला असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
Result: Altered image
Sources
Image analysis
iStock photo
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in