Authors
Claim
हरियाणा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर काँग्रेसचे दीपेंद्र सिंग हुडा यांना अश्रू अनावर झाले.
Fact
जून 2024 चा व्हिडिओ चुकीच्या संदर्भाने शेअर केला जात आहे.
हरियाणा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर काँग्रेसचे दीपेंद्र सिंग हुडा यांना अश्रू अनावर झाले असे सांगणारा दावा व्हायरल आहे.
बहुतांश एक्झिट पोलने हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवली असताना, भाजपच्या 48 जागांच्या विरोधात, 90 पैकी 37 जागा जिंकून काँग्रेस पक्ष विद्यमान भाजपच्या तुलनेत दुसऱ्या क्रमांकावर येण्यात यशस्वी झाला.
निकाल जाहीर झाल्यानंतर, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हरियाणाचे काँग्रेस नेते दीपेंद्र सिंग हुड्डा अश्रू ढाळत असल्याचे दाखवणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
अनेक X आणि Facebook युजर्सनी “#HaryanaElectionResult, #Haryana” सारख्या हॅशटॅगसह व्हिडिओ शेयर केला, फुटेज मतदानाच्या पराभवाबद्दल हुड्डा यांची प्रतिक्रिया दर्शविते. असे दाखविले जात आहे. न्यूजचेकरला मात्र हा व्हिडिओ जुना असल्याचे आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीशी संबंधित नसल्याचे आढळले.
अशा पोस्ट येथे, येथे, येथे, येथे आणि येथे पाहता येतील.
Fact Check/ Verification
व्हायरल फुटेजच्या मुख्य फ्रेम्सवर Google लेन्स शोधामुळे आम्हाला @Radhey_307 ची X पोस्ट, दिनांक 5 जून, 2024 वर नेले. तोच व्हिडिओ घेऊन त्यात म्हटले आहे की, “दीपेंद्र हुडा 2019 मध्ये फक्त 5000 मतांनी हरले पण ते जमिनीवर काम करत राहिले. आणि आता 3,50,000 फरकाने जिंकले. तो रडत आहे, भावनिकरित्या चार्ज आहे. हा माणूस सर्व सुखास पात्र आहे.”
आम्हाला जून 2024 पासून अनेक X आणि Facebook पोस्ट सापडल्या ज्यात हुड्डा यांनी रोहतक लोकसभा जागा जिंकल्यानंतर त्याचे व्हायरल फुटेज होते. अशा पोस्ट इथे, इथे, इथे आणि इथे बघता येतील. उल्लेखनीय म्हणजे, X युजर @Albert_1789 ज्याने 8 ऑक्टोबर रोजी व्हिडिओ शेअर केला होता आणि तो हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालांशी जोडला होता, त्याने 5 जून 2024 रोजी देखील हेच फुटेज पोस्ट केले होते.
5 जून 2024 रोजी Facebook वर पोस्ट केलेल्या व्हिडिओच्या स्पष्ट आवृत्तीमध्ये, आम्हाला टीव्ही स्क्रीनवर प्रदर्शित झालेला “इंडिया” दिसला. उल्लेखनीय म्हणजे, काँग्रेस हा 2024 च्या लोकसभा निवडणुकीत स्थापन झालेल्या विरोधी पक्षांची युती इंडियाचा एक भाग होता.
आम्हाला डीएनए हिंदीचा 5 जून 2024 रोजीचा रिपोर्ट देखील सापडला, ज्यात व्हायरल फुटेजचा स्क्रीनशॉट देखील दर्शविला गेला आणि सांगितले की दीपेंद्र सिंग हुड्डा रोहतक लोकसभा जागा 3 लाखांहून अधिक मतांनी जिंकल्यानंतर अश्रू ढाळत होते.
Conclusion
हरियाणा विधानसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झाल्यानंतर काँग्रेस नेते दीपेंद्र सिंग हुडा यांना अश्रू ढाळत असल्याचे दर्शविण्यासाठी एक जुना व्हिडिओ चुकीच्या संदर्भाने शेअर केला गेला आहे.
Result: Missing Context
Sources
X Post By @Radhey_307, Dated June 5, 2024
Report By DNA Hindi, Dated June 5, 2024
(हे आर्टिकल न्यूजचेकर इंग्रजीसाठी वसुधा बेरी यांनी केले असून इथे वाचता येईल.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा