Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
वृद्धेला मुलगा आणि सून मारहाण करीत असून त्यांना शिक्षा झालेली नाही.
सदर घटना भोपाळ येथे २०२४ मधील घडलेली असून संबंधितांवर कारवाई झालेली आहे.
वृद्धेला मारहाण होत असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल आहे. तिचा मुलगा आणि सून ही मारहाण करीत असून त्यांच्यावर कारवाई होईतोवर हा व्हिडीओ शेयर करा. असा दावा केला जात आहे.
फेसबुकवर हा व्हिडीओ मोठ्याप्रमाणात व्हायरल असल्याचे आम्हाला आढळून आले.

दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.
“मी देवाला प्रार्थना करतो की ज्या वृद्धांकडे संपत्ती आहे त्यांना अशा शेवटच्या टप्प्याचा सामना कधीही करावा लागू नये. मुलगा आणि सुनेला शिक्षा होईपर्यंत कृपया तुम्ही जिथे असाल तिथे सर्व ग्रुपमध्ये हे शेअर करा.” अशा कॅप्शनखाली हा दावा केला जात आहे.
व्हायरल व्हिडिओच्या चौकशीसाठी आम्ही सर्वप्रथम त्यावर रिव्हर्स इमेज सर्च केला. आम्हाला India Today ने प्रसिद्ध केलेली बातमी मिळाली. २७ मार्च २०२४ च्या या बातमीत व्हायरल व्हिडिओतील किफ्रेम्स आम्हाला आढळल्या.

“मारहाण करणाऱ्या जोडप्याचे नाव दीपक आणि पूजा सेन असून ते भोपाळच्या बारखेडी भागातील आहेत. दीपक हा पीडित महिलेचा नातू असून आपल्या पत्नीसोबत तो आजीचा छळ करीत होता. मारहाण करण्याची घटना घरमालकाने कॅमेऱ्यात चित्रित करून व्हायरल केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.” असे आम्हाला या बातमीत वाचायला मिळाले.
अधिक तपासात वृत्तसंस्था ANI ने २८ मार्च २०२४ रोजी यासंदर्भात प्रसिद्ध केलेली बातमी आम्हाला मिळाली. यात दीपक आणि पूजा या जोडप्याला वृद्धेला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली. भोपाळच्या पोलीस उपायुक्त प्रियांका शुक्ला यांनी घरगुती वाद आणि वैयक्तिक रागातून सदर वृद्धेला मारहाण केली जात होती. कारवाईनंतर वृद्धेला तिच्या झाशी येथील मूळ ठिकाणी परत पाठविण्यात आले. अशी माहिती दिली होती.

डेक्कन हेराल्ड आणि पीटीआय ने सुद्धा या घटनेच्या बातम्या प्रसिद्ध केल्या असून त्या येथे आणि येथे पाहता येतील.
अशाप्रकारे आमच्या तपासात एक वर्ष जुना व्हिडीओ पुन्हा चुकीच्या संदर्भाने शेयर केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रत्यक्षात भोपाळ येथे घडलेल्या घटनेत आजीला मारहाण करणाऱ्या नातू आणि त्याच्या पत्नीवर कारवाई झाली आहे.
Our Sources
News published by India Today on March 27, 2024
News published by ANI on March 28, 2024
News published by Deccan Herald on March 27, 2024
JP Tripathi
November 27, 2025
Salman
November 26, 2025
Kushel Madhusoodan
November 26, 2025