Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Crime
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर काहींनी भाजपच्या झेंड्यावर एका गायीची क्रूरपणे कत्तल केली.
ही पोस्ट येथे पाहता येईल.
न्यूजचेकरला आमच्या व्हॉट्सअप टिपलाइनवर समान दावा प्राप्त झाला असून तथ्य तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
Google वर “गोहत्या” आणि “भाजप ध्वज” या कीवर्ड शोधामुळे आम्हाला @uncensoredlive द्वारे 2 फेब्रुवारी 2022 रोजी केल्या गेलेल्या एका ट्विटकडे नेले. गोहत्येचा क्रूर व्हिडिओ असलेल्या या पोस्टमध्ये ही घटना मणिपूरमध्ये घडल्याचे म्हटले आहे.
मणिपूरमध्ये भाजपच्या ध्वजावर “मुस्लिम तरुण गायीची कत्तल करताना” असे सांगत अनेक ट्विटर युजर्सनी 2022 मध्ये हा व्हिडिओ शेअर केला होता. अशा पोस्ट इथे, इथे आणि इथे बघता येतील.
@azad_nishant यांनी केलेल्या अशाच एका ट्विटच्या कॉमेंट विभागात, आम्हाला आढळले की मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या ट्विटर हँडलने इंफाळ फ्री प्रेसच्या रिपोर्टचा स्क्रीनग्राब शेअर केला होता. त्यात म्हटले आहे की, “भाजप उमेदवारांच्या यादीवर गायींची कत्तल केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.”
वृत्तानुसार, “सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या गायीच्या कत्तल प्रकरणात तीन जणांना लिलॉन्ग पोलिसांनी अटक केली होती…” पुढे असे म्हटले आहे की, “रविवारी संध्याकाळी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, एक गाय जमिनीवर टाकलेल्या भाजपच्या ध्वजावर काही लोक कत्तल करताना दिसले. मणिपूर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या तिकीटांच्या घोषणेचा निषेध म्हणून हा प्रकार घडला.”
@PetaIndia ने देखील या ट्विटला उत्तर दिले आहे की, “लिलॉन्ग पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे आणि IPC च्या कलम 153A, 429, 504 आणि प्राणी क्रूरता प्रतिबंध कायदा, 1960 च्या कलम 11(1) अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.”
1 फेब्रुवारी 2022 रोजीच्या द हिंदूने दिलेल्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की लिलाँगमध्ये अटक करण्यात आलेल्या तिघांवर मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन आणि राज्य भाजप अध्यक्ष ए. शारदा यांच्याविरुद्ध शिवीगाळ केल्याचा आणखी एक आरोप आहे. नजबुल हुसैन (38), अब्दुल रशीद (28) आणि अरीब खान (32, सर्व रा. थौबल जिल्ह्यातील लिलोंग) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
मणिपूरमधील एक वर्षाहून अधिक जुना व्हिडिओ कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर भाजपच्या झेंड्यावर काहीजण गायीची कत्तल करत आहेत असे खोटे सांगत शेयर केला जात आहे. हे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
Sources
Tweet By @NBirenSingh, February 1, 2022
Tweet By @PetaIndia, February 1, 2022
Report By The Hindu, Dated February 1, 2022
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in
Vasudha Beri
May 16, 2025
Prasad S Prabhu
May 19, 2024
Prasad S Prabhu
October 1, 2024