Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
पंजाब पुरग्रस्तांना ४२ कोटींचे ६०० ट्रॅक्टर देण्याचे जाहीर केले म्हणून क्रिकेटर युवराज सिंगला ईडीने समन्स पाठविला.
हा दावा चुकीच्या संदर्भाने केलेला आहे. बंदी घातलेल्या बेटिंग अप्लिकेशनच्या प्रचारात गुंतल्यावरून युवराज सिंगल ईडीने समन्स बजावले आहेत.
पंजाब मधील पूर आणि क्रिकेटर युवराज सिंग यांना जोडून एक दावा सध्या सोशल मीडियावर केला जात आहे. पंजाब पुरग्रस्तांना ४२ कोटींचे ६०० ट्रॅक्टर देण्याचे जाहीर केले म्हणून क्रिकेटर युवराज सिंगला ईडीने समन्स पाठविला. असा हा दावा X आणि फेसबुकवर व्हायरल झाला आहे.


दाव्यांचे संग्रहण येथे आणि येथे पाहता येईल.
“भारताचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग यांनी पंजाब मधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मदत म्हणून ४२ कोटींचे तब्बल ६०० ट्रॅक्टर देण्याचे जाहीर केल्यानंतर युवराजला ई.डी कडून समन्स” अशा कॅप्शनखाली हा दावा करण्यात आला आहे.
न्यूजचेकरच्या तपासात हा दावा चुकीच्या संदर्भाने करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे.
व्हायरल दाव्याच्या तपासासाठी आम्ही सर्वप्रथम ‘क्रिकेटर युवराज सिंग याला ईडीचे समन्स’ या कीवर्डसच्या माध्यमातून Google वर शोध घेतला असता, क्रिकेटरला ईडीने समन्स पाठविले असल्याचे सांगणाऱ्या अनेक बातम्या आम्हाला आढळल्या.
प्रहारच्या वेबसाईटवर १६ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीत “माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले.” अशी माहिती वाचायला मिळाली.

News18 मराठीने १६ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या बातमीत “युवराज सिंगला २३ सप्टेंबर रोजी दिल्लीतील ईडी मुख्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. हा खटला ऑनलाइन बेटिंग अप्लिकेशनशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित आहे.” अशी माहिती आम्हाला मिळाली.

“युवराज सिंग ईडीच्या रडारवर, बेटिंग अॅप प्रकरणात चौकशीसाठी समन्स” अशा शीर्षकाखाली १६ सप्टेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र टाइम्सने प्रकाशित केलेल्या बातमीतही आम्हाला हेच वाचायला मिळाले.

म्हणजेच पूरग्रस्तांना मदत जाहीर केल्यावरून ईडीने समन्स बजावले असे सांगणारा दावा खोटा असून ईडीने समन्स बजावण्याचे कारण वेगळेच असल्याचे आणि ते बेटिंग अप्लिकेशनशी संबंधित असल्याचे उघड झाले.
युवराज सिंग याने पंजाब पूरग्रस्तांना ४२ कोटींचे तब्बल ६०० ट्रॅक्टर देण्याचे जाहीर केले आहे का? हे पाहण्यासाठी आम्ही पुन्हा Google वर संबंधित कीवर्डस शोधले. मात्र यासंदर्भातील कोणत्याही बातम्या आम्हाला सापडल्या नाहीत. इतक्या मोठ्या क्रिकेटपटूने अशी घोषणा केली असती तर त्याची मोठी बातमी झाली असती.
अधिक तपासासाठी आम्ही युवराज सिंगच्या सोशल मीडिया खात्यांवर शोध घेऊन पाहिला. X, Facebook आणि Instagram खात्यांवर अशाप्रकारची कोणतीही घोषणा किंवा माहिती मिळाली नाही.
या दाव्याबद्दल अधिक माहितीसाठी, आम्ही युवराज सिंगशी संलग्न असलेल्या YouWeCan फाउंडेशनशी संपर्क साधला. फाउंडेशनच्या एका सदस्याने आम्हाला फोनवरून सांगितले की YouWeCan फाउंडेशनने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही आणि अशी कोणतीही बाब त्यांच्या लक्षात आलेली नाही.
युवराज सिंगच्या पीआर टीमशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्याशी संपर्क झाल्यावर हा लेख अपडेट केला जाईल.
अशाप्रकारे आमच्या तपासात क्रिकेटर युवराज सिंगला आलेल्या ईडीच्या समन्स बाबत चुकीच्या संदर्भाने दिशाभूल करणारा दावा करण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले.
Our Sources
Report published by Prahar on September 16, 2025
Report published by News18 Marathi on September 16, 2025
Report published by Maharashtra Times on September 16, 2025
Social media pages of cricketer Yuvraj Singh
Telephonic conversation with YouWeCan Foundation
(Inputs by Raushan Thakur)
Prasad S Prabhu
September 20, 2025
Salman
September 13, 2025
Sandesh Thorve
April 14, 2022