Tuesday, January 31, 2023
Tuesday, January 31, 2023

घरFact Checkआंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी दलवीर भंडारी यांची निवड झालेली नाही, भ्रामक दावा...

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी दलवीर भंडारी यांची निवड झालेली नाही, भ्रामक दावा व्हायरल

सोशल मीडियात आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे सदस्य दलवीर भंडारी यांची एक बातमी व्हायरल होत आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनवण्यात आल्याचा दावा केला जात आहे.हे पद 71 वर्षे ग्रेट ब्रिटनकडे होते, परंतु यावेळी या पदासाठी मतदान झाले तेव्हा दलवीर भंडारी यांना 193 पैकी 183 मते मिळाली असा दावा व्हायरल पोस्टमध्ये करण्यात आला आहे. 

फेसबुक पोस्टचा स्क्रिनशाॅट

या व्हायरल दाव्याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या अधिकृत व्हॉट्सअॅप नंबरवर (9999499044) आवाहनही करण्यात आले आहे.

Fact Check/Verification

आतंरराष्ट्रीय न्यायालयाचे सदस्य दलवीर भंडारी यांच्याबद्दल केल्या जाणाऱ्या दाव्याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही काही वेगळ्या कीवर्डच्या मदतीने गुगलवर सर्च करायला सुरुवात केली. परंतु आम्हाला व्हायरल दाव्याशी संबंधित कोणताही अहवाल सापडला नाही.

तपास सुरू ठेवत, आम्ही आंतरराष्ट्रीय न्यायालयाची अधिकृत वेबसाइट तपासली. दरम्यान, आंतरराष्ट्रीय न्यायालयात मुख्य न्यायाधीशासारखे कोणतेही पद नसल्याचे समोर आले. तथापि, आंतरराष्ट्रीय न्यायालयात तीन वर्षांच्या कालावधीसाठी, एक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष जातात निवडले जातात ही माहिती मिळाली. वेबसाइटवर मिळालेल्या माहितीनुसार, 8 फेब्रुवारी 2021 रोजी अमेरिकेचे न्यायाधीश जोन ई. डोनोघ्यू (Judge Joan E. Donoghue) आणि रशियाचे किरिल गेव्हॉर्जियन (Judge Kirill Gevorgian) यांची अनुक्रमे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.

जाणून घ्या आंतरराष्ट्रीय न्यायालय काय आहे?

इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस (ICJ) ची स्थापना संयुक्त राष्ट्रांनी जून 1945 मध्ये केली आणि एप्रिल 1946 मध्ये त्याचे कामकाज सुरू झाले. हेग (नेदरलँड) च्या पीस पासेसमध्ये स्थित, आंतरराष्ट्रीय न्यायालय हे संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख न्यायिक अंग आहे. हे राष्ट्रांमधील कायदेशीर विवादांचे निराकरण करते. आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये 193 देशांचा समावेश आहे. त्यात 15 न्यायाधीश असतात, ज्यांची निवड साधारणपणे 9 वर्षांच्या कालावधीसाठी केली जाते, परंतु जर एखाद्या न्यायाधीशाने मध्येच राजीनामा दिला, तर त्याच्या उर्वरित कालावधीसाठी नवीन न्यायाधीश निवडला जातो.

न्यायालयाच्या सर्व सदस्यांची आणि त्यांच्या पदांची यादी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या (ICJ) अधिकृत वेबसाइटवर दिली आहे. भारतातील न्यायमूर्ती दलवीर भंडारी यांची सरन्यायाधीश म्हणून नव्हे तर सदस्य म्हणून निवड झाली आहे.

पडताऑळणीदरम्दयानरम्यान, आम्हाला 27 एप्रिल 2012 रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयाद्वारे जारी केलेली प्रेस रिलीज सापडली. 27 एप्रिल 2012 रोजी प्रसिद्ध झाल्यानुसार, दलवीर भंडारी यांची आंतरराष्ट्रीय न्यायालय (ICJ) चे सदस्य म्हणून निवड झाली. त्यांची जॉर्डनच्या अवन शौकत अल-खासवनेहच्या (Awn Shawkat Al-Khasawneh) जागी ही नियुक्ती झाली आहे. 

परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, नोव्हेंबर 2017 मध्ये, न्यायमूर्ती दलवीर भंडारी यांची नऊ वर्षांच्या कालावधीसाठी ICJ (आंतरराष्ट्रीय न्यायालय) चे सदस्य म्हणून पुन्हा निवड करण्यात आली. त्यावेळी या पदासाठी झालेल्या मतदानात भंडारी यांना 193 मतांपैकी 183 मते मिळाली. त्यादरम्यान देशातील अनेक माध्यम संस्थांनीही ही बातमी प्रसिद्ध केली होती.

कोण आहेत न्यायमूर्ती दलवीर भंडारी?


राजस्थानातील जोधपूर,येथे 1 ऑक्टोबर 1947 रोजी जन्मलेले दलवीर भंडारी हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश राहिले आहेत. भंडारी यांनी जोधपूर विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर राजस्थान उच्च न्यायालयात प्रॅक्टिस केली. अमेरिकेतील शिकागो येथील वेस्टर्न युनिव्हर्सिटीमधून त्यांनी पदव्युत्तर पदवीही मिळवली. ऑक्टोबर 2005 मध्ये भंडारी हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले. 2017 मध्ये ते नेदरलँड्समधील हेग आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे सदस्य म्हणून निवडले गेले.

Conclusion

आमच्या पडताऴणीत हे स्पष्ट झाले आहे की, न्यायमूर्ती दलवीर भंडारी यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी निवड झालेली नाही. ते सध्या न्यायालयाचे सदस्य आहेत, 2018 मध्ये त्यांची नऊ वर्षांच्या कालावधीसाठी निवड झाली आहे.

Result: Misleading


Our Sources

International Court of Justice

International Court of Justice (ICJ)

Press Release

Ministry of External Affairs

Live Mint

The Hindu


कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Yash Kshirsagar
Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
Yash Kshirsagar
Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular