Authors
Claim
अंडरवर्ल्ड डॉन आणि दहशतवादी दाऊद इब्राहिमचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो एका महिलेसोबत बसलेला दिसत आहे. ही महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि माजी पत्रकार सुप्रिया श्रीनेत असल्याचा दावा केला जात आहे.
Fact
शोध घेतल्यानंतर आम्हाला शीला भट्ट नावाच्या पत्रकाराच्या ट्विटर प्रोफाइलवर व्हायरल झालेला फोटो सापडला. शीलाने 14 जून रोजी हा फोटो शेअर केला आणि सांगितले की हा 1987 चा फोटो आहे, जेव्हा तिने दुबईत दाऊद इब्राहिमची मुलाखत घेतली होती. ट्विटनुसार, शीलाने ही मुलाखत तिच्या ‘अभियान’ आणि ‘The Illustrated Weekly’ या मासिकासाठी घेतली होती.
याबाबत सुप्रिया श्रीनेत यांच्याशीही आम्ही बोललो. हा फोटो त्यांचा नसून शीला भट्टचा असल्याचे त्यांनी सांगितले. सुप्रिया सांगतात की, हा फोटो 1987 चा आहे जेव्हा त्या फक्त 10 वर्षांच्या होत्या. त्यामुळे व्हायरल झालेल्या फोटोमध्ये सुप्रिया श्रीनेत दाऊद इब्राहिमसोबत नसल्याचे सिद्ध झाले आहे. खोटा दावा करून हा फोटो व्हायरल केला जात आहे.
Result: False
Our Sources
Tweet of Sheela Bhatt, posted on June 14, 2023
Quote of Supriya Shrinate
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा : checkthis@newschecker.in