Authors
Claim
शेख हसिनांच्या बेडरूममध्ये झोपलेले आंदोलक.
Fact
हा दावा खोटा आहे. २०२२ मध्ये श्रीलंकेत झालेल्या आंदोलनात तेथील प्रेसिडेंशियल पॅलेसवर आंदोलकांनी ताबा घेतलेला होता तेंव्हाचा हा फोटो आहे.
शेख हसिनांच्या बेडरूममध्ये झोपलेले आंदोलक असे सांगत एक फोटो इंटरनेटवर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे. नुकत्याच झालेल्या बांगलादेश येथील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा फोटो शेयर केला जात आहे.
आमहाला हा दावा व्हाट्सअपवर आढळला.
Fact Check/ Verification
व्हायरल फोटोसंदर्भात तपासासाठी आम्ही सर्वप्रथम Google वर व्हायरल फोटोचा रिव्हर्स इमेज सर्च केला. आम्हाला reuters ने हा फोटो १५ जुलै २०२२ रोजी आपल्या वेबसाईटवर अपलोड केला असल्याचे आमच्या निदर्शनास आले.
श्रीलंकेचे आंदोलक राष्ट्रपतींच्या राजवाड्यात स्वयंपाक करत, पोहत आणि निद्रा घेताना असे मुख्य कॅप्शन मध्ये लिहिलेले आहे.
श्रीलंकन नागरिकांनी प्रमुख सरकारी इमारती आणि निवासस्थानांवर ताबा मिळवला, ज्यामुळे राष्ट्रपतींना देश सोडून पळून जावे लागले आणि त्यांनी अखेरीस राजीनामा दिला. यादरम्यान झालेल्या घटनांची छायाचित्रकार दिनुका लियानवट्टे यांनी काढलेली छायाचित्रे याठिकाणी अपलोड करण्यात आली आहेत. असे यामध्ये नमूद करण्यात आले असल्याचे दिसून आले.
पुढील तपासात आम्हाला Voice of America या युट्यूब चॅनेलने ११ जुलै २०२२ रोजी अपलोड केलेला श्रीलंकेतील आंदोलनाचा व्हिडीओ सापडला. यामधील दृश्यांवरून व्हायरल छायाचित्र श्रीलंकेतीलच असल्याचे पाहता येते.
WION ने ११ जुलै २०२२ रोजी अपलोड केलेल्या व्हिडिओत सुद्धा श्रीलंकेत झालेल्या आंदोलनात तेथील प्रेसिडेंशियल पॅलेसवर आंदोलकांनी ताबा घेतलेला होता याची व्हायरल छायाचित्राशी मिळती जुळती छायाचित्र पाहता येतील.
Conclusion
अशाप्रकारे आमच्या तपासात श्रीलंकेत झालेल्या जुन्या आंदोलनाचे छायाचित्र सध्याच्या बांगलादेश येथे झालेल्या आंदोलनाला जोडून खोटा दावा केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Result: False
Our Sources
Photo uploaded by reuters on July 15, 2022
Video uploaded by Voice of America on July 11, 2022
Video uploaded by WION on July 11, 2022
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा