बेळगाव महानगरपालिकेत भाजपच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना पेढा भरविला असल्याच्या दाव्याने एक फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यात भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पेढा भरवत असल्याचे दिसते.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “बेळगाव महानगरपालिका जिंकली आता मुंबई महानगरपालिका विजयाचा पेढा अडव्हान्समध्ये उद्धवजींना देताना मा. देवेंद्र फडणवीस.” बेळगाव महानगरपालिका निवडणुकीमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव करून भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. मात्र, या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर अत्यंत तीव्र शब्दांमध्ये टीका करताना म्हटले होते की, “मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता? लाज वाटत नाही का?” त्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.



Fact Check/Verification
नुकत्याच झालेल्या बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत भाजपने मराठी एकीकरण समितीचा पराभव केला असून यानंतर शिवसेना खासदार भाजपवर टीका केली होती. मात्र विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या विजयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना खरंच पेढा भरविला आहे का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
मुख्य प्रवाहातील एकाही इलेक्ट्रॅानिक, प्रिंट किंव वेब माध्यमांने मुख्यमंत्री उद्ऴ ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची बेळगाव महानगरपालिका निवडणुकीनंतर भेट झाल्याची बातमी प्रसिद्ध केली नसल्याचे आढळून आले नाही. यानंतर आम्ही हा फोटो नेमका कधीचा आहे याचा शोध घेण्यासाठी गूगल इमेज रिव्हर्सचा आधार घेतला असता हा फोटो दोन वर्षापूर्वीचा असल्याचे आढळून आले.
News18 वेबसाईटवर 23 में 2019 रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीत हा फोटो आढळून आला. यात म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांनी एनडीएचा विजय साजरा केला. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते तर शिवसेना एनडीए मधील एक पक्ष होता.

याशिवाय आम्हाला तत्कालिन मुख्यमंत्री व सध्या भाजपाचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या 23 मे रोजीच्या ट्विटमध्ये ही हा फोटो आढळून आला. यातील दुस-या एका फोटो उद्धव ठाकरे यांनीही देवेंद्र फडणवीस यांना पेढा भरवल्याचा आहे. फडणवीस यांनी ट्विटमध्ये शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले होते तसेच ते ठाकरेंना पेढा भरवण्यासाठी मातोश्रीवर विनोद तावडे रामदास आठवले, गिरीशी महाजन यांच्यासोबत गेले होते असे म्हटले आहे.
Conclusion
आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, देवेंद्र फडणवीस यांनी विजापूर महापालिका निवडणुकीत भाजपाच्या विजयांतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पेढा भरविलेला नाही, तर व्हायरल फोटो 2019 मधील लोकसभा निवडणुक निकालनंतर एनडीेच्या विजयाचा आनंद साजरा करतानाचा आहे.
Result- Misleading
Our Source
न्यूज 18 https://www.news18.com/photogallery/politics/devendra-fadnavis-uddhav-thackeray-celebrate-ndas-victory-2157089.html
देवेंद्र फडणवीस ट्विट – https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1131550376799326208
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा