Authors
Claim
देशभरातील गरीब महिलांना सरकार मोफत शिलाई मशीन देत आहे.
Fact
अशी कोणतीही मोफत शिलाई मशीन देण्याची योजना सरकार ने अंमलात आणलेली नाही.
देशभरातील गोरगरीब महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी सरकारने मोफत शिलाई मशीन देण्याची योजना आणली आहे. या योजनेचा लाभ घ्या असा दावा सध्या केला जात आहे. नोकरी आणि व्यवसाय संदर्भातील माहिती देणाऱ्या काही वेबसाईट्स वर यासंदर्भातील बातम्या फिरू लागल्या आहेत.
हा मेसेज व्हाट्सअप वर मोठ्याप्रमाणात फिरू लागला आहे. संबंधित बातमीसदृश्य संदेशाच्या बरोबरीने एक लिंकही दिली जात असून त्यावर क्लिक करून मोफत शिलाई मशीन साठी अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे. दरम्यान हा मेसेज किती खरा? यासंदर्भात संशयाचे वातावरण आम्हाला पाहायला मिळाले. यासाठी न्यूजचेकर मराठीने या मेसेजच्या मुळापर्यंत जाण्याचा निर्णय घेतला.
Fact check/ Verification
व्हायरल होत असलेल्या संदेशात मोफत शिलाई मशीनची योजना देशभरातील महिलांसाठी असे नमूद करण्यात आले आहे. यावरून आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही गुगल वर किवर्ड सर्च च्या माध्यमातून केंद्र सरकारने अशी कोणती योजना सुरु केली आहे का? याचा शोध घेतला, मात्र आम्हाला काहीच सापडले नाही.
केंद्र सरकारच्या कोणत्याही अधिकृत संकेतस्थळांवर आम्हाला अशाप्रकारची माहिती मिळाली नाही.
शोध घेत असताना लोकसत्ताने २९ मार्च २०२२ रोजी प्रसिद्ध केलेले एक वृत्त आम्हाला मिळाले. आम्ही त्यामध्ये वाचले असता देशाच्या पंतप्रधानांनी मोफत शिलाई मशीन योजना-२०२२ योजना सुरु केली आहे. असे म्हटले आहे. ही मागील वर्षीच्या योजनेसासंदर्भातील माहिती असल्याने आम्ही पडताळणी केली.
या बातमीत तसेच यासंदर्भात फिरणाऱ्या लिंक मध्ये आम्हाला india.gov.in वर मोफत शिलाई मशीन साठी अर्ज उपलब्ध आहेत. असे कळले. आम्ही सदर वेबसाईट ला भेट दिली असता आम्हाला असा कोणताही अर्ज तेथे सापडला नाही.
दरम्यान हरियाणा सरकारने नोंदणीकृत महिला कामगारांकरिता शिलाई मशीन देण्याची योजना जारी केली असल्याचे मात्र योजनेच्या शीर्षकात Free किंवा मोफत हा शब्द नसल्याने ही योजनाही पूर्णपणे मोफत नसल्याचे आमच्या निदर्शनास आले.
या योजनेसंदर्भात आणखी शोध घेत असताना आम्हाला पीआयबी फॅक्टचेक ने ६ एप्रिल २०२३ रोजी केलेले एक ट्विट दिसून आले.
या ट्विट मध्ये “हा फसविण्याचा प्रकार आहे. कारण केंद्र सरकारने अशी कोणतीही योजना सुरु केलेली नाही. सावध राहा” अशी सूचना करण्यात आली आहे.
दरम्यान अशी कोणतीही योजना नसताना अकारण महिलांची दिशाभूल करण्याचा प्रकार असल्याचे आमच्या निदर्शनास आले.
Conclusion
अशाप्रकारे आमच्या तपासात देशभरातील महिलांना सरकार मोफत शिलाई मशीन देत आहे, असे सांगणारा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे निदर्शनास आले आहे.
Result: False
Our Sources
News published by Loksatta on March 29, 2022
india.gov.in Website
Tweet made by PIB Factcheck on April 6, 2023
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: +91 9999499044 किंवा ई-मेल करा : checkthis@newschecker.in