Authors
सध्या सोशल मीडियावर एक विचलित करणारा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. ज्यात दोन्ही बाजूचे लोकं एकमेकांना मारतांना दिसत आहे. या व्हिडिओसोबत असा दावा केला गेलाय की, ‘द काश्मीर फाईल्स’ पाहिल्यावर हिंदूंनी मुस्लिमांवर हल्ला केला.
सीसीटीव्ही फुटेजची ही एक व्हिडिओ आहे. सुरवातीला एक व्यक्ती दुकानात बसलेल्या व्यक्तींवर तलवार चालवताना दिसत आहे. त्यानंतर एक दुसरा व्यक्ती येतो. जो काठीने हल्ला करत आहे.
दुकानात बसलेले व्यक्ती स्वतःचा बचाव करण्यासाठी काही वस्तू फेकताना दिसत आहे. व्हिडिओच्या शेवटी काही व्यक्ती मुस्लिम टोपी घालून बाहेर येतांना दिसत आहे.
या ट्विटचे संग्रहण तुम्ही इथे पाहू शकता.
या ट्विटचे संग्रहण देखील तुम्ही इथे पाहू शकता.
या व्हिडिओच्या माध्यमातून युजर दावा करत आहे की, हा नवीन भारत आहे, जिथे मुस्लिमांना आपल्या सुरक्षेसाठी कायम तयार असावे लागते. या सारख्याच विविध शीर्षकासह हा व्हिडिओ फेसबुक आणि ट्विटरवर शेअर होत आहे.
काश्मिरी पंडितांच्या कत्तली आणि त्यांच्या सुटकेवर आधारित ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट हिट झाला आहे. एका बाजूला या चित्रपटाचे खूप कौतुक होत असतांना दुसऱ्या बाजूला काही व्यक्ती म्हणतायेत की, या चित्रपटामुळे सांप्रदायिक वातावरण बिघडत आहे.
यातच आता सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात असा दावा केला गेलाय की, ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटानंतर मुस्लिमांना हिंदू व्यक्तींकडून दहशतीचा सामना करावा लागत आहे.
Fact Check / Verification
इन-विड टूलच्या मदतीने व्हिडिओतील एक फ्रेम रिव्हर्स सर्च करून शोधली. तेव्हा न्यूज १८ गुजरातची एक बातमी मिळाली. २० मार्चला प्रकाशित झालेल्या या बातमीत व्हायरल व्हिडिओ सुरत असल्याचे सांगितले आहे.
बातमीनुसार, ही घटना सुरतमधील भाठे भागातील आहे. ज्या ठिकाणी पैशांच्या देवाणघेवाणीवरून काही व्यक्तींनी दुकानदारावर तलवारीने हल्ला केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली. ही घटना सुरतमधील सलाबतपुरा पोलीस स्थानकाची सांगितली जात आहे.
या व्हायरल दाव्याची सत्यता तपासण्यासाठी आम्ही सलाबतपुरा पोलीस स्थानकामध्ये संपर्क केला. तिथे असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने आम्हांला सांगितले की,”व्हिडिओसोबत भ्रामक दावा केला जात आहे. ही घटना सांप्रदायिक नाही. कारण पीडित आणि आरोपी या दोन्हीमध्ये हिंदू आणि मुस्लिम समुदायातील व्यक्तींचा समावेश आहे. परस्पर गोष्टींमधून भांडणे झाली होती. याचा ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाशी कोणताही संबंध नाही. ही सदर घटना १५ मार्च २०२२ ची आहे.” त्या सीसीटीव्हीमधील फुटेजमध्ये ही तारीख दिसत आहे.
घटनेची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही सुरतचे पोलीस कमिशनर अजय तोमर यांच्याशी संपर्क साधला. त्यांचेही म्हणणे होते की,”व्हिडिओ चुकीच्या दाव्यासोबत व्हायरल होत आहे. या घटनेला कुठलाही सांप्रदायिक बाजू नाही.”
Conclusion
अशा पद्धतीने आमच्या तपासात हे स्पष्ट झाले की, हा व्हिडिओ ज्या सांप्रदायिक उद्देशाने शेअर केला जात आहे. हे भ्रामक आहे. व्हिडिओसोबत हे म्हणणे चुकीचे आहे की, हिंदूंनी मुस्लिमांवर हल्ला केला.
Result : Misleading/Partly False
Our Sources
न्यूज १८ गुजरातची बातमी
सुरतचे पोलीस कमिशनर अजय तोमर आणि सलाबतपुरा पोलीस स्थानकाशी झालेला संवाद
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.