Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
केरळमधील एका शैक्षणिक संस्थेत “वर्गात लिंगभेद” केला जात आहे.
हा दावा चुकीचा आहे. हा व्हिडिओ केरळमधील नसून, महाराष्ट्रातील नांदेड येथील MOS Academy या खासगी कोचिंग संस्थेचा आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात बुरखा परिधान केलेल्या विद्यार्थिनी एका बाजूला आणि विद्यार्थी दुसऱ्या बाजूला बसलेले दिसतात. मधोमध विभाजन भिंत (partition wall) आहे. पोस्ट्समध्ये दावा केला जातो की हा प्रसंग केरळमधील एका शैक्षणिक संस्थेचा असून विभाजन भिंतीच्या माध्यमातून वर्गखोलीत लिंगभेद केला जात आहे.
कॅप्शनमध्ये असा आशय होता, “Kerala, not Kabul: Classrooms split by walls so girls can’t see boys…” म्हणजेच प्रसंग केरळमधील असल्याचा आभास निर्माण केला गेला.

या पोस्टचा Archived version येथे पाहता येईल.
आम्ही व्हिडिओच्या की-फ्रेम्सचा रिव्हर्स शोध घेतला. या शोधात व्हिडिओ 10 ऑक्टोबर 2025 रोजी Instagram वरील @aamersrs_mos_academy या अकाउंटवर पोस्ट झाल्याचे आढळले. त्या अकाउंटच्या बायोमध्ये स्पष्टपणे “MOS Academy, Nanded (Maharashtra)” असा उल्लेख आहे.

याच दिवशी Aamer Srs यांनी Facebook वरही त्याच हॅशटॅग्स आणि वर्णनासह तोच व्हिडिओ शेअर केलेला आढळला. यावरून हा कंटेंट त्यांच्या संस्थेकडूनच तयार व शेअर झाल्याची पुष्टी होते.

इंस्टाग्राम अकाऊंटच्या बायोवरून आम्हाला MOS Academy चे संचालक Aamer Srs असल्याची माहिती मिळाली.

आम्ही आमेर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की हा व्हिडिओ त्यांच्या कोचिंग क्लासचा असून त्यांचा ओरिजिनल कन्टेन्ट आहे. हा शासकीय शाळा/ कॉलेजचा प्रसंग नाही आणि “MOS Academy, Nanded (Maharashtra)” येथे चित्रित करण्यात आला आहे.
याशिवाय, केरळ सरकार/शिक्षण विभाग/अधिकृत स्रोत यांच्याकडून अशा घटनेची कोणतीही नोंद आढळली नाही.
यावरून स्पष्ट होते की केरळचा म्हणून पसरवलेला हा दावा चुकीचा आहे आणि व्हिडिओ प्रत्यक्षात नांदेड (महाराष्ट्र) येथील MOS Academy चा आहे.
आमच्या तपासणीत हे स्पष्ट झाले की, सोशल मीडियावर केरळमधील वर्गात विभाजन भिंतीद्वारे लिंगभेद दाखवणारा म्हणून व्हायरल झालेला व्हिडिओ केरळचा नाही. तो महाराष्ट्रातील नांदेड येथील MOS Academy या खासगी कोचिंग संस्थेचा व्हिडिओ आहे. म्हणून हा दावा दिशाभूल करणारा आहे.
Sources
Instagram post shared by @aamersrs_mos_academy on October 10, 2025
Facebook post shared by Aamer Srs on October 10, 2025
Instagram bio of Aamer Srs
Telephonic conversation with Aamer Srs
Salman
November 26, 2025
Prasad S Prabhu
November 18, 2025
Vasudha Beri
November 4, 2025