सोशल मीडियात फुलाचा एक फोटो व्हायरल होत आहे, दावा करण्यात येत आहे की, हा फोटो 50 वर्षातून एकदाच उमलणा-या ॐ कार पुष्प या फुलाचा आहे. ही निसर्गाची अगाध लीला आहे, त्यामुळे हा फोटो केवळ आपल्यापुरता न ठेवता इतरांनाही पाठवा.
काय म्हटले आहे पोस्टमध्ये
५० वर्षामध्ये एकदाच फूलणारे “ॐ कार पुष्प ” निसर्गाची अगाध लीला !! (पूढे पाठवा कारण आणखी लोक बघू शकतील.) सर्व जाती धर्माच्या लोकांना याचं दर्शन व्हावं यासाठी फेसबूक वरती आणि स्टेटसला ठेवलेला आहे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर महादेव अंधश्रद्धा नाही श्रद्धा आहे एक अदृश्य ताकत अशी आहे की त्याला कोणी देव मंतर अल्ला मंत्र साई मंत्र गीता कुराण बायबल सगळ्यांचा मतितार्थ एकच सच कि राह पे चलो


Fact Check / Verification
व्हायरल फोटो हिमालयात 50 वर्षातून एकदाच उमलणा-या ॐ कार पुष्पाचा आहे का याचा शोध घेण्याचा आम्मही प्रयत्न केला. यासाठी गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध सुरु केला. असता आम्हाला orchidrepublic.com या ब्लाॅगमध्ये 11 आॅक्टोबर 2018 रोजी लिहिलेला ब्लाॅग आढळून आला ज्यात म्हटले आहे की,
एक विलक्षण सौंदर्य, हे भितीदायक ऑर्किड वनस्पती पाकळ्यासह कुरकुरीत पांढरी फुले घेऊन येते जी लांब आणि पसरलेली असतात. त्याला पाने नसतात आणि दुरून दिसते की ते हवेत तरंगत आहे पण ते एमेकांना झाडाशी जोडलेले असते. हे एक प्रकारचे ऑर्किड बहामास आणि फ्लोरिडामध्ये मध्ये आढळते आहे. याला घोष्ट आॅर्किड म्हटले जाते. सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे काही ऑर्किड तज्ञ आणि संशोधक वगळता कोणालाही त्यांचे अचूक स्थान माहित नाही.

yurtopic.com या ब्लाॅगमध्येही 2013 मध्ये याविषयी माहिती देण्यात आली आहे.

याशिवाय आम्हाला Natioanal Geographic च्या वेबसाईटवर हा लेख आढळून आला. फ्लोरिडाच्या दुर्गम दलदलीत संशोधक आणि छायाचित्रकारांच्या चमूने एक नवीन शोध लावला आहे जो जगातील सर्वात आयकॉनिक फुलांपैकी एक, भूत ऑर्किड आणि ते कसे पुनरुत्पादित करतो याबद्दल आहे.

Conclusion
आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की व्हायरल फोटो हिमालयात उमलणा-या ॐ कार पुष्पाचा नाही तर फ्लोरिडात आढळणा-या दुर्मिळ घोस्ट आॅर्किडचा आहे.
Result- Misleading
Our Source
Natioanal Geographic- https://www.nationalgeographic.com/animals/article/ghost-orchids-florida-surprising-pollinators-moths
Yurtopic- http://www.yurtopic.com/science/nature/rare-flowers.html
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा