Authors
प्रत्येकाने एकदा तरी किटकॅट खाल्लीच असणार. किटकॅट चॉकलेट भारतात खूपच आवडीने खालला जातो. त्याची दिवसेंदिवस वाढतच आहे. नेस्ले कंपनीच्या विविध वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. सोशल मीडियावर नेस्लेच्या किटकॅट चॉकलेट संदर्भात एक संदेश शेअर केला जात आहे. यात अनेक दावे केले जात आहे.
त्यात नेस्लेविषयी असा दावा केलाय की, किटकॅटमध्ये बीफमधून काढलेला रस वापरला जातो, हे खुद्द नेस्ले कंपनीने मान्य केलं आहे. त्या व्हायरल झालेल्या संदेशचा स्क्रिनशॉट खाली जोडत आहे.
हा संदेश फेसबुकवर अनेक युजरने शेअर केला आहे. त्याचे स्क्रिनशॉट खाली जोडत आहे.
काही महिन्यांपूर्वी एकदा असाच एक दावा व्हायरल झाला होता. त्यात आंबा खाल्ल्यावर कोल्ड ड्रिंक प्यायले तर माणसाचा मृत्यू होतो, असा त्यात दावा केला जात होता. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.
Fact Check / Verification
दावा क्रमांक १ : नेस्ले कंपनीने हे मान्य केलंय की, चॉकलेट किटकॅटमध्ये बीफमधून काढलेला रस वापरला आहे.
या संदर्भात आम्ही गुगलवर शोधले असता आम्हांला नेस्ले कंपनीचे एक ट्विट सापडले. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय,”आम्ही तुम्हांला खात्री देतो की, भारतातील किटकॅटचे सर्व पदार्थ १०० टक्के शाकाहारी आहे. संबंधित पॅकेटवर त्याची माहिती दिली आहे.”
या ट्विटची संग्रहित केलेली दुवा इथे जोडत आहे.
किटकॅटविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर गेलो. तेव्हा किटकॅट आणि अन्य वस्तूंवर हिरवा ठिपका आहे. याचाच अर्थ ते शाकाहारी आहे, असं आढळून आले.
फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड लेबलिंग अँड डिस्प्ले २०२० नुसार, हिरव्या भरलेल्या ठिपक्याभोवती चौकोन असेल तर ती प्रत्येक वस्तू शाकाहारी आहे. असे ते दर्शवते.
त्यानंतर आम्ही किटकॅट कोण-कोणते घटक वापरतात, त्याबद्दल माहिती शोधली. तेव्हा आम्हाला त्याविषयीचा एक फोटो मिळाला.
त्याचबरोबर आपण जर नेस्ले किटकॅटचे कागद पाहिले तर त्यावर देखील खालच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यात हिरवा ठिपका दिसत आहे. याचाच अर्थ ते शाकाहारी आहे.
या व्यतिरिक्त आम्ही नेस्ले कंपनीच्या कॉर्पोरेट कम्युनिकेशन व्यवस्थापकाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण आमचा संपर्क होऊ शकला नाही. जर संपर्क झाला तर लेख अपडेट करू.
नोट : या एकाच संदेशात अनेक दावे दिलेले आहेत. आम्ही त्या उरलेल्या सर्व दाव्यांची एक मालिका तयार करणार आहोत. आता आपण पुढच्या एका नव्या मालिकेत भेटू.
Conclusion
अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, नेस्लेच्या किटकॅट चॉकलेटमध्ये बीफमधून काढलेला रस वापरला जात नाही.
Result : Fabricated Content/False
Our Sources
४ जून २०१५ रोजी नेस्लेने केलेले ट्विट
नेस्लेच्या अधिकृत संकेतस्थळाचा स्क्रिनशॉट
फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथोरिटी ऑफ इंडियाची पीडीएफ
बिग बास्केटच्या संकेतस्थळाचा स्क्रिनशॉट
किटकॅट चॉकलेटचा कागदाचा स्क्रिनशॉट
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.