Friday, November 22, 2024
Friday, November 22, 2024

HomeFact CheckFact Check: उन्हाळ्यात इंधन टाकी फुल केल्यास गाडीचा स्फोट होतो? खोटा दावा...

Fact Check: उन्हाळ्यात इंधन टाकी फुल केल्यास गाडीचा स्फोट होतो? खोटा दावा होतोय व्हायरल

Claim
उन्हाळ्यात आपल्या वाहनांच्या टाकीत इंधन फुल भरल्यास गाडीचा स्फोट होऊ शकतो असा इशारा इंडियन ऑइल कंपनीने दिला आहे.

Fact
हा दावा खोटा आहे. असा इशारा आपण दिला नसल्याचे इंडियन ऑइल कंपनीने स्पष्ट केले आहे.

उन्हाळ्याचा कडाका वाढत आहे तसाच एक मेसेज मोठ्याप्रमाणात व्हायरल होऊ लागला आहे. इंडियन ऑइल या इंधन विक्रीक्षेत्रातील कंपनीचा हवाला देऊन हा दावा केला जात आहे.

Fact Check: उन्हाळ्यात इंधन टाकी फुल केल्यास गाडीचा स्फोट होतो? खोटा दावा होतोय व्हायरल
Courtesy: Facebook/ Rajiv Patil

“इंडियन ऑइल चेतावणी देते, येत्या काही दिवसात तापमान वाढणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त मर्यादेपर्यंत तुमच्या वाहनात पेट्रोल भरू नका. यामुळे इंधन टाकीमध्ये स्फोट होऊ शकतो. कृपया तुमच्या वाहनातील इंधनाची अर्धी टाकी भरा आणि हवेसाठी जागा ठेवा. या आठवड्यात सर्वाधिक पेट्रोल भरल्यामुळे 5 स्फोटांचे अपघात झाले आहेत. कृपया दिवसातून एकदा पेट्रोलची टाकी उघडा आणि आत साचलेला गॅस बाहेर येऊ द्या.” असे हा मेसेज सांगतो.

फेसबुकच्या बरोबरीनेच व्हाट्सअप वर हा मेसेज जोरदार फिरू लागला आहे.

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

Fact Check: उन्हाळ्यात इंधन टाकी फुल केल्यास गाडीचा स्फोट होतो? खोटा दावा होतोय व्हायरल

Fact check/ Verification

व्हायरल दाव्यात गाडीच्या इंधनाची टाकी वाढत्या तापमानात जास्त मर्यादेपर्यंत भरल्यास स्फोट होऊ शकतो. असा इशारा इंडियन ऑइल ने दिल्याचे म्हटले आहे. दरम्यान आम्ही किवर्ड सर्च च्या माध्यमातून यासंदर्भात शोध घेतला. मात्र यासंदर्भात आम्हाला कोणताही मीडिया रिपोर्ट आढळला नाही.

इंडियन ऑइल ने असा इशारा दिला आहे का? हे पाहण्यासाठी शोध घेताना आम्हाला @IndianOilcl हे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड चे अधिकृत ट्विटर खाते सापडले. त्यावर व्हायरल दाव्यासंदर्भात शोधताना आम्हाला एक ट्विट सापडले.

“उन्हाळा असो व हिवाळा उत्पादकांनी घालून दिलेल्या कमाल पातळीपर्यंत इंधन भरणे पूर्णपणे सुरक्षित आहे.” असे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ने या ट्विट मध्ये म्हटले आहे. “इंडियन ऑइल ने इशारा दिला आहे, असे सांगून व्हायरल होत असलेल्या दाव्याचा इन्कार करून वाहन उत्पादक अशाप्रकारच्या घटना घडू नये म्हणून आवश्यक ती काळजी घेत असता. दरम्यान कोणीही दिशाभूल करून घेऊ नये” असे आवाहनही या ट्विट च्या माध्यमातून करण्यात आले आहे.

तपासादरम्यान, न्यूजचेकरने फेडरेशन ऑफ ऑल-इंडिया पेट्रोलियम ट्रेडर्स (एफएआयपीटी) चे उपाध्यक्ष सबरीनाथ यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला सांगितले, “ऑटोमोबाईल कंपन्या बाष्पीकरणाची शक्यता लक्षात घेऊन वाहनाच्या पेट्रोल टाकीची क्षमता ठरवतात. म्हणजेच, ५० लिटरची पेट्रोल टाकी असलेल्या वाहनाची वास्तविक क्षमता ५५ लिटरपर्यंत असते. परंतु ५० लिटर नंतर एक फिल्टर स्थापित केला जातो, ज्याला टाकी फुल असे म्हटले जाते. फक्त ते फिल्टर रिफिल केले जाते.”

अशाप्रकारे आमच्या तपासात इंडियन ऑइल कंपनीने असा दावा केला नसल्याचे स्पष्ट झाले.

Conclusion

आम्ही केलेल्या तपासात व्हायरल होत असलेला दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे आढळले आहे. मुळात इंडियन ऑइल कंपनीने असा दावा केलेला नाही आणि कोणत्याही मोसमात इंधनाची टाकी फुल केली म्हणून स्फोटासारख्या घटना घडत नाहीत.

Result: False

Our Sources

Tweet made by Indian Oil on June 3, 2019

Conversation with Mr. Sabarinath Vice President, FAIPT


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: +91 9999499044 किंवा ई-मेल करा : checkthis@newschecker.in

Most Popular