Authors
Claim
महाराष्ट्रात बलात्काराचा आरोपी हाफिज बेगला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर मुस्लिमांनी हल्ला केला.
Fact
बलात्काराच्या आरोपीला पोलिस कोठडीतून आपल्याकडे सोपवण्याची मागणी करणाऱ्या जमावाने पोलिस ठाण्यावर हल्ला केला होता. या घटनेत कोणताही सांप्रदायिक अँगल नाही.
काही जखमी पोलिसांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक पोस्ट शेअर केली जात असून महाराष्ट्रात ६ वर्षांच्या निष्पाप मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या हाफिज बेगला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर मुस्लिमांनी हल्ला केल्याचा दावा केला जात आहे.
आमच्या तपासात, आम्हाला आढळले की हा व्हिडिओ महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील जामनेरचा आहे, जिथे बलात्काराचा आरोपी सुभाष भिल याला ताब्यात देण्याची मागणी करत जमावाने पोलिस स्टेशनवर हल्ला केला होता.
व्हायरल झालेला व्हिडिओ २० सेकंदांचा असून, त्यात काही जखमी पोलिस दिसत आहेत. हा व्हिडिओ सहित असलेला व्हायरल दावा, “35 साल के हाफ़िज़ बेग ने 6 साल की मासूम का रेप किया फिर निर्ममता से उसकी हत्या कर दी. हाफ़िज़ को अरेस्ट करने गयी महाराष्ट्र पुलिस पर वहां के नमाजी मुसलमानों ने ईंट पत्थरों लाठीयों से हमला कर दिया, 17 पुलिसकर्मी गंभीर रूप से घायल. भीड़ का कहना था कि 6 साल की बच्ची से रेप जायज़ है”. या कॅप्शनसह शेअर केला जात आहे.
हा व्हिडिओ इतर अनेक अकाऊंटवरही अशाच मथळ्यांसह शेअर केला गेला आहे, जो येथे, येथे पाहता येईल.
Fact Check/ Verification
व्हायरल व्हिडिओची चौकशी करण्यासाठी Newschecker ने संबंधित कीवर्डच्या मदतीने गुगल सर्च केले. यादरम्यान, आम्हाला NDTV इंडियाच्या YouTube खात्यावर २२ जून २०२४ रोजी अपलोड केलेला रिपोर्ट सापडला. ज्यामध्ये व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारा एक पोलिस कर्मचारी देखील उपस्थित होता.
व्हिडिओ रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील जामनेर, जळगाव येथे जमावाने पोलिस ठाण्यावर हल्ला केला होता. जामनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अलीकडेच एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर आरोपी फरार झाला होता, त्याला पोलिसांनी नंतर भुसावळ येथून पकडून जळगावला नेले. पीडितेच्या कुटुंबीयांना आणि आसपासच्या लोकांना याची माहिती मिळताच त्यांनी आरोपीला जमावाच्या ताब्यात देण्याची मागणी सुरू केली. मात्र पोलिसांनी नकार दिल्याने त्यांनी पोलिसांवर हल्ला केला.
२१ जून २०२४ रोजी आज तकच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेला याच घटनेशी संबंधित एक रिपोर्टही आम्हाला आढळला. या वृत्तात असलेले छायाचित्रही व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या आणखी एका पोलिसाचे होते.
आज तकच्या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ११ जून रोजी एका ६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला होता, त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. आरोपी अटक झाल्याची माहिती मिळताच जमाव त्याला ताब्यात घेऊन त्यांच्या पद्धतीने न्याय देण्याची मागणी करत होता. पोलिसांनी नकार दिल्याने जमावाने पोलिसांवर हल्ला केला आणि जामनेर पोलिस ठाण्याजवळ उभी असलेली वाहनेही जाळली. या घटनेत सुमारे ८ पोलीस जखमी झाले असून त्यापैकी ६ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शोध घेतल्यावर, आम्हाला २१ जुलै २०२४ रोजी टेलिग्राफ वेबसाइटवर प्रकाशित केलेला रिपोर्ट देखील सापडला. या घटनेची सविस्तर माहिती त्यात देण्यात आली आहे.
टेलिग्राफच्या रिपोर्टनुसार ११ जून रोजी जामनेर येथील एका आदिवासी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी ३५ वर्षीय सुभाष भिल असे असून तो घटनेनंतर फरार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी २० जून रोजी भुसावळ येथून सुभाष भिल याला अटक करून जळगावला आणले.
साडेदहाच्या सुमारास जामनेर पोलिस ठाण्याजवळ ३०० जणांचा जमाव जमला आणि आरोपींना ताब्यात देण्याची मागणी करू लागला. यानंतर जमाव हिंसक झाला. या हल्ल्यात जामनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह सुमारे आठ पोलीस जखमी झाले.
तपासादरम्यान आम्ही जळगावचे स्थानिक पत्रकार व्ही डी चौधरी यांच्याशीही संपर्क साधला. या घटनेबाबतही त्यांनी तीच माहिती दिली, जी वरील रिपोर्टमध्ये समाविष्ट आहे. आम्ही त्यांना आरोपी मुस्लिम असल्याच्या दाव्याबाबत विचारले असता त्यानी तो खोटा असल्याचे सांगितले आणि या प्रकरणातील आरोपी आणि पीडिता दोघेही आदिवासी समाजातील असल्याचे सांगितले.
यानंतर, आम्ही जामनेर पोलीस ठाणे असलेल्या पाचोरा तहसीलचे एसडीपीओ धनंजय येरुळे यांच्याशीही संपर्क साधला. आरोपी मुस्लिम असल्याचा दावा खोटा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आरोपी आणि पीडिता दोघेही एकाच समाजातील असल्याचेही त्यांनी सांगितले.
Conclusion
या जामनेर घटनेतील आरोपी मुस्लिम असल्याचा व्हायरल झालेला दावा खोटा असल्याचे आमच्या तपासात सापडलेल्या पुराव्यांवरून स्पष्ट झाले आहे. तसेच जमावाने आरोपींना वाचवण्यासाठी नव्हे, तर आरोपींना ताब्यात द्यावे, या मागणीसाठी पोलीस स्थानकावर हल्ला केला होता.
Result: False
Our Sources
Video Report by NDTV YT account on 22th June 2024
Article Published by AAJ TAK on 21st June 2024
Article Published by Telegraph on 21st June 2024
Telephonic Conversation with Local Journalist V D Chaudhary
Telephonic Conversation with Pachora SDPO Dhananjay Yerule
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा