Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
महात्मा गांधींबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजाला जामीन मंजूर झाल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही पोलीस कालीचरणला कुठेतरी घेऊन जाताना दिसत आहेत. यादरम्यान काही लोक जय श्री रामचा नारा देताना दिसत आहेत.
व्हिडीओ शेअर करताना एका ट्विटर युजरने लिहिले की, “कालीचरण महाराजांची जामीन मंजूर झाला आहे.. विजयाचे दार पराभवाच्या कोठडीत असेल… सिंहाच्या तोंडात हात घातला आहे… आता गर्जना तर होईल…”
आणखी एका ट्विटर युजरने लिहिले की, “आज कालीचरण महाराजांना जामीन मिळाला आहे हर हर महादेव “.
महात्मा गांधींबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल कालीचरण यांचा जामीन मंजूर झाल्याचा दावा फेसबुकवरील इतर अनेक वापरकर्त्यांनी व्हिडिओ शेअर केला आहे.
खरेतर, कालीचरण यांनी 25 डिसेंबर 2021 रोजी रायपूरमधील रावणभथ मैदानावर आयोजित दोन दिवसीय धर्मसंसदेच्या शेवटच्या दिवशी केलेल्या भाषणात महात्मा गांधींबद्दल अवमानकारक वक्तव्य केली होती आणि बापूंचा मारेकरी नथुराम गोडसेचे कौतुक केले होते. कालीचरण यांच्या द्वेषपूर्ण भाषणाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते आणि रायपूरचे माजी महापौर विनोद बन्सल यांच्यासह अनेकांनी निषेध केला होता.
काँग्रेस नेते प्रमोद दुबे यांच्या तक्रारीवरून छत्तीसगड पोलिसांनी टिकरापारा पोलीस ठाण्यात कालीचरण विरोधात गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 294, 505(2) अंतर्गत कालीचरण यांच्याविरुद्ध प्रथम गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर कलम 153 A (1)(A), 153 B (1)(A), 295 A ,505(1)(B) आणि 124A देखील राजद्रोहाच्या प्रकरणात जोडण्यात आले. कालीचरणला छत्तीसगड पोलिसांनी 30 डिसेंबर रोजी सकाळी मध्य प्रदेशातील छतरपूर येथून अटक केली होती.
कालीचरणच्या अटकेनंतर छत्तीसगड पोलिसांच्या विरोधातही आवाज उठू लागला. इंदूरमध्ये गौ रक्षा संघटना आणि बजरंग सेनेच्या कार्यकर्त्यांनी छत्तीसगड सरकारने कालीचरण यांच्याविरोधात केलेल्या कारवाईचा निषेध केला.
छत्तीसगड पोलिसांनी 1 जानेवारी रोजी कालीचरणला रायपूर न्यायालयात हजर केले, जिथे न्यायालयाने कालीचरणला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत मध्यवर्ती कारागृहात पाठवले. आता सोशल मीडियावर ‘महात्मा गांधींबद्दल अवमानकारक टिप्पणी करणाऱ्या कालीचरणचा जामीन मंजूर झाला आहे’ असा दावा करणारा व्हिडिओ शेअर केला जात आहे.
महात्मा गांधींबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या कालीचरणचा जामीन मंजूर झाला आहे, या दाव्यासह सोशल मीडियावर शेअर होत असलेला व्हिडिओ तपासण्यासाठी, आम्ही इनव्हीड टूलच्या मदतीने व्हिडिओच्या काही कीफ्रेम तयार केल्या आहेत. यानंतर रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध घेतला
या दरम्यान आम्हाला झी न्यूज (मध्य प्रदेश आणि छत्तीसगड) च्या वेबसाइटवर 30 डिसेंबर 2021 रोजी अपलोड केलेली एक व्हिडिओ स्टोरी प्राप्त झाली, त्यानुसार,कालीचरणला रायपूर पोलिसांनी 30 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर केले, जिथे काही लोकांनी जय श्री राम ची जोरदार घोषणाबाजी केली.
आमच्या तपासात, काही कीवर्डसह Google सर्च केले. यादरम्यान आम्हाला न्यूज 24 चे एक वृत्त प्राप्त झाले. रिपोर्टनुसार, रायपूर कोर्टात कालीचरणच्या प्रोडक्शनदरम्यान, कोर्टाच्या बाहेर त्याच्या समर्थकांचा जमाव जमला होता आणि ते जय श्री रामच्या घोषणा देत होते.
03 जानेवारी 2022 रोजी एबीपी न्यूजने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, कालीचरणचे वकील शरद मिश्रा यांनी एडीजे विक्रम प्रताप चंद्र यांच्या न्यायालयात जामीन याचिका दाखल केली होती. अहवालानुसार, एडीजे चंद्रा यांनी पोलिस डायरीचा अभ्यास केल्यानंतर, कालीचरणचा जामीन अर्ज फेटाळला कारण त्याच्यावर देशद्रोहाचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, महात्मा गांधींबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी कालीचरण महाराजांना जामीन मंजूर झालेला नाही.
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.