Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact CheckFact Check: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

Fact Check: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या युवावस्थेतील म्हणून व्हायरल फोटोंचे जाणून घ्या सत्य

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही युवावस्थेतील छायाचित्रे आहेत.
Fact
कोलाजमध्ये फक्त मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या युवावस्थेतील चित्र योग्य आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छायाचित्रे या कोलाजमध्ये नाहीत.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या युवावस्थेतील फोटो असे सांगत चार छायाचित्रांचा कोलाज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसत असल्याचा दावा केला जात आहे. सदर फोटो या साऱ्यांच्या युवावस्थेतील असल्याचे हा दावा सांगतो.

आम्हाला आमच्या WhatsApp टिप लाइन (9999499044) वर देखील हा दावा प्राप्त झाला आहे.

चार छायाचित्रांच्या या कोलाजसोबत लिहिले आहे की ‘चार छायाचित्रे पाहा, तुम्हाला आश्चर्य वाटेल! कर्म आणि नशिबाचा खेळही अप्रतिम आहे.” असेही सांगण्यात आले आहे की, पहिला फोटो पंतप्रधान मोदींचा आहे, ज्यात ते फरशी झाडताना दिसत आहेत. दुसरे चित्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे असल्याचे सांगितले जात आहे. तिसरे छायाचित्र उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे असल्याचे सांगितले जात असून, त्यात ते पूजा करताना दिसत आहेत. चौथे छायाचित्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे असल्याचे सांगितले जाते, जेथे ते एका ऑटोरिक्षाजवळ उभे आहेत.

Fact Check: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या युवावस्थेतील म्हणून व्हायरल फोटोंचे जाणून घ्या सत्य
Courtesy: Whatsapp User

Fact Check/Verification

सर्वप्रथम, आम्ही नरेंद्र मोदींच्या फरशीवर झाडू मारत असलेल्या चित्राबाबत सत्य शोधण्यासाठी गुगलवर रिव्हर्स इमेज सर्च केला. या प्रक्रियेत, आम्हाला ‘द वायर’ द्वारे 27 मे 2017 रोजी प्रकाशित केलेला रिपोर्ट सापडला, ज्यामध्ये व्हायरल चित्रासारखेच चित्र प्रकाशित करण्यात आले आहे. रिपोर्टनुसार, हा फोटो असोसिएटेड प्रेसने जून 1946 मध्ये काढला होता. असोसिएटेड प्रेसने “भारतातील ‘अस्पृश्यांपैकी एकाने’ झाडू धरला आहे, ज्याचा वापर तो रस्ते, अंगण आणि घरे झाडण्यासाठी करतो” अशा मथळ्यासह फोटो प्रसिद्ध करण्यात आला होता.

Fact Check: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या युवावस्थेतील म्हणून व्हायरल फोटोंचे जाणून घ्या सत्य

शंका आल्याने, आम्ही असोसिएटेड प्रेसने प्रकाशित केलेल्या आणि व्हायरल पोस्टमध्ये दिलेल्या चित्राची तुलना केली आणि आढळले की व्हायरल झालेले चित्र संपादित केले आहे, जे असोसिएटेड प्रेसने प्रकाशित केलेले चित्र संपादित करून तयार केले आहे. असोसिएटेड प्रेसने काढलेले छायाचित्र 1946 मध्ये प्रसिद्ध झाले होते, तर पंतप्रधान मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी झाला आहे.

Fact Check: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या युवावस्थेतील म्हणून व्हायरल फोटोंचे जाणून घ्या सत्य

तपासात पुढे जाताना, आम्ही द्रौपदी मुर्मूच्या रूपात शेअर केलेल्या चित्रावर गूगल रिव्हर्स सर्च केले. यादरम्यान, आम्हाला 23 जुलै 2023 रोजी न्यूज18 ने प्रकाशित केलेला एक रिपोर्ट सापडला, ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की चित्रात दिसणारी महिला सुकुमार तुडू आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याशी सुकुमार तुडू यांचे एकमेव नाते आहे की त्या ओडिशातील वरबेडा नावाच्या गावातील रुग्णालयात स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करतात, जिथे राष्ट्रपती मुर्मू यांचा जन्म झाला होता. द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती म्हणून निवड झाल्याबद्दल सुकुमार तुडू यांना अभिमान वाटतो, त्यांच्या समाजातील कोणीतरी देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचले आहे, असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

Fact Check: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या युवावस्थेतील म्हणून व्हायरल फोटोंचे जाणून घ्या सत्य
Courtesy: News 18

कोलाजमधला पुढचा फोटो एकनाथ शिंदेंचा असल्याचं म्हटलं जातं. आम्ही 26 जुलै 2022 रोजी या दाव्याची वस्तुस्थिती तपासली, जी तुम्ही येथे आणि येथे वाचू शकता. तपासादरम्यान आम्हाला आढळून आले की, व्हायरल फोटोमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचे नाव बाबा कांबळे आहे. 24 जुलै 2022 रोजी लोकमत या मराठी वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टमध्ये बाबा कांबळे यांच्या जीवनाचा आणि कर्तृत्वाचा तपशीलवार अहवाल व्हायरल फोटोसह प्रकाशित करण्यात आला आहे. चित्रात दिसणारी व्यक्ती बाबा कांबळे आहे, याला सकाळ आणि शबनम न्यूजने प्रसिद्ध केलेल्या वृत्तातही दुजोरा मिळाला आहे.

Fact Check: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या युवावस्थेतील म्हणून व्हायरल फोटोंचे जाणून घ्या सत्य
Courtesy: Lokmat

तपासाच्या अंतिम टप्प्यात, आम्ही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या रूपात शेअर केलेल्या छायाचित्राचे परीक्षण केले. या प्रक्रियेत आम्हाला 8 ऑगस्ट 2020 रोजी अमर उजालाने प्रकाशित केलेला रिपोर्ट सापडला. या रिपोर्टमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या आयुष्यातील 30 न पाहिलेली छायाचित्रे दाखवण्यात आली आहेत. या क्रमात, व्हायरल चित्र प्रत्यक्षात त्याच्या तारुण्याच्या दिवसातील असल्याचे दिसून आले आहे. चित्रासोबत लिहिले आहे की, हे चित्र 15 फेब्रुवारी 1995 चे आहे जेव्हा ते पंत दीक्षा पूर्ण करत होते.

Fact Check: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या युवावस्थेतील म्हणून व्हायरल फोटोंचे जाणून घ्या सत्य
Courtesy: Amar Ujala

Conclusion

आमच्या तपासणीतून आम्ही निष्कर्षापर्यंत पोहोचलो की कोलाजमध्ये दाखवलेल्या चार छायाचित्रांपैकी फक्त योगी आदित्यनाथ यांचा फोटो योग्य आहे. उर्वरित तीन फोटो वेगवेगळ्या लोकांचे आहेत, जे खोटे दावे करून शेअर केले जात आहेत.

Result: Partly False

Our Sources
Report published by The Wire.
Report published by News 18.
Report published by Lokmat.
Report published by Amar Ujala.

कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Most Popular