Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
महाकुंभ 2025 पूर्वी प्रयागराजमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला आहे.
Fact
हा दावा दिशाभूल करणारा आहे. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील शिवाजी महाराजांचा पुतळा प्रयागराज येथील असल्याचे सांगून शेयर केला जात आहे.
दर 12 वर्षांनी, प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन या भारतातील 4 प्रमुख तीर्थक्षेत्रांवर महाकुंभ आयोजित केला जातो. यावेळी 13 जानेवारी 2025 पासून प्रयागराजमध्ये महाकुंभ आयोजित केला जाणार आहे. दरम्यान, सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की, महाकुंभ 2025 च्या तयारीदरम्यान प्रयागराजमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला आहे.
दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.
“प्रयागराज मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासह कुंभाची तयारी जय शिवराय हर हर महादेव #प्रयागराज” अशा कॅप्शनखाली हा दावा शेयर केला जात आहे.
सर्वप्रथम “प्रयागराज मध्ये छत्रपती शिवाजी महाराज” या कीवर्ड्सचा आम्ही Google वर शोध चालविला. मात्र कुंभ मेळा किंवा महाकुंभच्या पार्श्वभूमीवर अशाप्रकारे शिवाजी महाराजांची मूर्ती किंवा पुतळा उभारण्यात आला असल्याचे सांगणारे कोणतेही मीडिया रिपोर्ट्स आम्हाला मिळाले नाहीत.
तपासात पुढे, आम्ही व्हायरल दाव्यातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या फोटोचे किफ्रेम्स तपासले. गुगल लेन्सच्या मदतीने सर्च केल्यानंतर 2023 च्या अनेक सोशल मीडिया पोस्टमध्ये आम्हाला हा पुतळा दिसला. पोस्टच्या कॅप्शनमध्ये हा पुतळा क्रांतीचौक, संभाजीनगर, महाराष्ट्रातील असल्याचे वर्णन केले आहे. अशा पोस्ट इथे, इथे, इथे आणि इथे पाहता येतील.
आता आम्ही Google Earth वर ‘छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, क्रांती चौक, संभाजीनगर, औरंगाबाद’ हा कीवर्ड शोधला. त्यामुळे प्रयागराजमधील शिवाजी महाराजांचा पुतळा म्हणून शेअर केलेला फोटो महाराष्ट्रातील संभाजीनगरमध्ये बसवण्यात आलेल्या पुतळ्याचा असल्याचे स्पष्ट झाले.
प्रयागराजमधील सम्राट हर्षवर्धनच्या पुतळ्याच्या जागी शिवाजीचा पुतळा बसवण्यात आला असा दावा करण्यात आला होता, यासंदर्भात Newschecker ने केलेले फॅक्ट चेक आपण येथे वाचू शकता.
महाकुंभ 2025 पूर्वी प्रयागराजमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आल्याचा दावा दिशाभूल करणारा असल्याच्या निष्कर्षाप्रत आम्ही पोचलो.
Sources
Report published ABP News by on 22nd October 2024.
Report published by Amar Ujala on 21st October 2024.
Report published by Hindustan on 18th October 2024.
Google Maps.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Prasad Prabhu
February 12, 2025
Prasad Prabhu
February 8, 2025
Prasad Prabhu
February 4, 2025