Authors
Claim
सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून असा दावा केला जात आहे की, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, 2024 मध्ये भाजपला सत्तेतून काढून टाकणे हीच सोनिया गांधींना खरी श्रद्धांजली ठरेल.
Fact
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाने शेअर केल्या जाणाऱ्या, 2024 मध्ये भाजपला सत्तेतून काढून टाकणे हीच सोनिया गांधींना खरी श्रद्धांजली असेल, असे सांगणाऱ्या या छायाचित्राची चौकशी करण्यासाठी आम्ही हा कीवर्ड सर्च केला. प्रक्रियेत, आम्हाला 17 सप्टेंबर 2023 रोजी ‘बोलता हिंदुस्तान’ नावाच्या X पृष्ठाने शेअर केलेल्या ट्विटमध्ये फोटोची मूळ आवृत्ती सापडली.
व्हायरल झालेले चित्र आणि मूळ चित्र यांचे तुलनात्मक विश्लेषण केले असता, आम्हाला आढळले की मूळ चित्र संपादित केले गेले आणि त्यात लिहिलेले वाक्य, ‘2024 मध्ये भाजपला सत्तेतून काढून टाकणे हीच महात्मा गांधींना खरी श्रद्धांजली आहे’, यामध्ये महात्मा च्या जागी सोनिया घालण्यात आले आहे.
17 सप्टेंबर 2023 रोजी नवजीवन, ABP News आणि लोकमत हिंदी ने प्रसिद्ध केलेल्या लेखांमध्ये अशीही माहिती देण्यात आली आहे की, काँग्रेस च्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी हे विधान केले होते.
अशाप्रकारे, आमच्या तपासात हे स्पष्ट झाले आहे की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी 2024 मध्ये भाजपला सत्तेतून काढून टाकणे ही सोनिया गांधींना खरी श्रद्धांजली आहे. असे म्हटल्याचा दावा करणारे व्हायरल चित्र संपादित केले आहे, मूळ चित्रात ‘2024 मध्ये भाजपला सत्तेतून काढून टाकणे हीच महात्मा गांधींना खरी श्रद्धांजली आहे’ असे लिहिले आहे.
Result: Altered Photo/Video
Our Sources
Tweet shared by Bolta Hindustan on 17 September, 2023
Newschecker analysis
Media reports
(हे आर्टिकल न्यूजचेकर हिंदीसाठी सर्वप्रथम सौरभ पांडे यांनी केले आहे.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in
फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा: https://whatsapp.com/channel/0029Va23tYwLtOj7zEWzmC1Z