Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक महिला पंतप्रधान मोदींवर टीका करीत आहे. दावा केला जात आहे की, भाजपाच्या खासदार मेनका गांधी यांनी मोदी आणि भाजपाला घरचा आहेर दिला आहे.त्यांनी भाजप नेत्यांचा खरा चेहरा उघडा पाडला आहे.
व्हिडिओतील महिलेचा गळा दाटून आलेलेला दिसतो ती आक्रमक आवाजात म्हणते की, या महामारीच्या काळात सध्याच्या सरकारची व्यवस्था पूर्णपणे अपयशी ठरली आहे. तीन मिनिटे 31 सेकंदांच्या या व्हिडिओत ती महिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका करताना म्हणते की, एवढी खुर्चीची लालसा मी माझ्या 36 वर्षाच्या आयुष्यात कधी पाहिली नाही. एवढा आंधळा पंतप्रधान, एवढा आंधळा गृहमंत्री, एवढा आंधळा आरोग्यमंत्री. वर पासून खाली पर्यंत सगळे फेल झाले आहात. तुमच्यासाठी बंगालमध्ये दीदीलला हरविणे गरजेचे आहे. ओ दीदी-ओ दीदी करणे गरजेचे आहे पण देशातील जनता मरत आहे तिला जिवंत ठेवणे गरजेचे नाही. ज्यांचे आईवडिल मृत्यू पावले त्यांना हा कोरोना काळ आठवत राहिल.
भाजपाच्या खासदार मेनका गांधी यांनी खरंच आपल्याच पक्षावर आणि पंतपप्रधान नरेंद्र मोदींवर टिका केली आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला मात्र आम्हाला मुख्य प्रवाहातील माध्यमांत बातमी आढळली नाही. यानंतर आम्ही हा व्हिडिओ बारकाईने पाहिला असता सदर महिला व्हिडिओच्या सुरवातीला आपले वय 36 असल्याचे सांगत आहे हे आढळून आले. मेनका गांधींचे सध्या वय 62 आहे. त्यामुळे ही महिसा मेनका गांधी नाहीत हे स्पष्ट झाले शिवाय व्हायरल पोस्टमधील एका यूजरने देखील सदर महिला मेनक गांधीची अॅक्टिंग करत आहे असे म्हटले आहे. ही महला काॅंग्रेसची कार्यकर्ती असल्याचे म्हटले असल्याचे आढळून आले.
यानंतर आम्ही काही किवर्डच्या साहाय्याने शोध सुरु केला असता आम्हाला हिंदी भाषेतील एक ट्विट आढळून आले ज्यात म्हटले आहे की, हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ब-याच लोकांनी म्हटले आहे की, भाजपा नेत्या मेनका गांधी यांना चांगलेचभाषण दिले आहे. पण मला तुम्हाला सांगायचे आहे की, माझी मोठी बहिण काॅंग्रेसच्या नेत्या आणि गाझियाबादच्या माजी लोकसभा उमेवादवार डाॅली शर्मा आहेत.
यानंतर आम्ही डाॅली शर्मा यांच्या फेसबुक पेजला भेट दिल असता आम्हाला त्यांच्या भाषणाचा फेसबुक लाईव्हचा 22 मिनिटे 54 सेंकदांचा व्हिडिओ आढळून आला. यात 14 व्या मिनिटाला व्हायरल क्लिपचा हिस्सा सुरु होतो. तीन मिनिटांच्या व्हायरल व्हिडिओ क्लिपमध्ये याच व्हिडिओतील काही दृश्ये वापरली गेली असल्याचे स्पष्ट झाले.
कोण आहेत डाॅली शर्मा?
डाॅली शर्मा यांनी उत्तरप्रदेशातील गाझियाबाद लोकसभा मतदार संघातून काॅंग्रेसच्या तिकिटावर 2019 मध्ये निवडणुक लढविली होती भाजपाचे खासदार जनरल व्ही. के सिंग यांनी त्यांचा पराभव केला. डाॅली यांनी बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनची डिग्री घेतली असून त्यांचा कपड्यांचा बिझनेस देखील आहे. त्यांना याआधी महापौर पदाच्या निवडणुकत देखील पराभव स्विकारावा लागला होता.भाजपाच्या आशा शर्मा विजयी झाल्या होत्या. डाॅली शर्मा यांचे वडील नरेंद्र भारद्वाज हे गाझियाबाद जिल्हा काॅंग्रेसचे अध्यक्ष होते. तसेच त्यांचे आजोबा देखील काॅंग्रेसमध्ये होते.
आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, व्हायरल व्हिडिओ भाजपच्या खासदार मेनका गांधी यांचा नसून काॅंग्रेसच्या गाझियाबादमधील नेत्या डाॅली शर्मा यांचा आहे. सोशल मीडियात चुकीचा दावा व्हायरल झाला आहे.
Read More : रतन टाटांनी देशाला कोरोनामुक्त करण्यासाठी सगळी संपत्ती दान करण्यास तयार असल्याचे म्हटलेले नाही
Claim Review: मेनका गांधींनी भाजपा आणि पंतप्रधान मोदींवर टिका केली Claimed By: Viral Post Fact Check: Misleading |
ट्विटर- https://twitter.com/KuldipshrmaMP06/status/1397800880921972736
फेसबुक-https://www.facebook.com/263084037549244/videos/747318049299632
न्यूज नेशन – https://www.newsnationtv.com/elections/vip-candidates/who-is-dolly-sharma-congress-candidates-ghaziabad-lok-sabha-seat-lok-sabha-election-2019-general-vk-singh-82140.html
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Prasad S Prabhu
June 10, 2025
Runjay Kumar
June 2, 2025
Prasad S Prabhu
May 21, 2025