Saturday, June 29, 2024
Saturday, June 29, 2024

HomeFact CheckFact Check: धुळ्यात ४००० मतांनी पडलेला काँग्रेस उमेदवार फेरमोजणीनंतर ८००० मतांनी जिंकला...

Fact Check: धुळ्यात ४००० मतांनी पडलेला काँग्रेस उमेदवार फेरमोजणीनंतर ८००० मतांनी जिंकला आणि १२००० मतांचा घोळ झाला? जाणून घ्या सत्य काय आहे

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
धुळ्यात ४००० मतांनी पडलेला काँग्रेस उमेदवार फेरमोजणीनंतर ८००० मतांनी जिंकला आणि १२००० मतांचा घोळ झाला.
Fact

हा दावा खोटा आहे. विजयी उमेदवाराची आघाडी ३८३१ मतांची आहे. शिवाय धुळे मतदारसंघात फेरमोजणी झालेली नाही.

धुळ्यात ४००० मतांनी पडलेला काँग्रेस उमेदवार फेरमोजणीनंतर ८००० मतांनी जिंकला आणि १२००० मतांचा घोळ झाला असे सांगणारा दावा सध्या केला जात आहे.

Fact Check: धुळ्यात ४००० मतांनी पडलेला काँग्रेस उमेदवार फेरमोजणीनंतर ८००० मतांनी जिंकला आणि १२००० मतांचा घोळ झाला? जाणून घ्या सत्य काय आहे
Courtesy: X@mikejava85

दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.

“धुळे महाराष्ट्र, काँग्रेस उमेदवार ४००० मतांनी पराभूत घोषित, फेरमोजणीची विनंती, आता ८००० मतांनी विजयी घोषित, निवडणूक आयोग काय चाललं आहे, १२००० मतांनी कशी झोकात ??” असे मूळ इंग्रजी दाव्याचे मराठी भाषांतरण आहे.

मंगळवार दि. ४ जून रोजी देशातील लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. याच पार्श्वभूमीवर हा दावा व्हायरल झाला आहे.

Fact Check/ Verification

व्हायरल दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही सर्वप्रथम निवडणूक आयोगाने आपल्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केलेला धुळे लोकसभा मतदारसंघाचा निकाल अभ्यासला.

Fact Check: धुळ्यात ४००० मतांनी पडलेला काँग्रेस उमेदवार फेरमोजणीनंतर ८००० मतांनी जिंकला आणि १२००० मतांचा घोळ झाला? जाणून घ्या सत्य काय आहे
Screengrab of ECI website

या निकालामध्ये आम्हाला आढळले की, धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या शोभा दिनेश बच्छाव या ५,३८,८६६ मते घेऊन निवडून आल्या आहेत. पराभूत भाजपचे उमेदवार सुभाष रामराव भामरे यांना ५,८०,०३५ इतकी मते पडली. विजयी आणि पराभूत उमेदवारात मतांचा फरक हा ३८३१ इतका आहे. दरम्यान व्हायरल दाव्यात म्हटल्याप्रमाणे ८००० मतांनी विजयी हा दावा खोटा असल्याचे आम्हाला प्राथमिक तपासात लक्षात आले.

दरम्यान मतमोजणी वेळी फेर तपासणी झाली का? आणि त्यामध्ये काय घडले का? हे शोधण्यासाठी आम्ही Google वर काही किवर्डस शोधले. आम्हाला धुळे मतदारसंघाच्या निकालाबद्दल माहिती देणाऱ्या अनेक बातम्या सापडल्या. त्या येथे, येथे, येथे आणि येथे पाहता येतील. या प्रत्येक बातमीत काँग्रेसच्या उमेदवार विजयी झाल्या असेच म्हटलेले असून फेर तपासणीचा उल्लेखही आढळला नाही.

दरम्यान पुढील तपासासाठी आम्ही धुळ्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी पदाची धुरा सांभाळलेले वरिष्ठ अधिकारी अभिनव गोयल यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला हा दावा खोटा असल्याची माहिती दिली. “लोकसभा निवडणुकीचा निकाल पूर्णपणे इन कॅमेरा लावण्यात आला. विजयी आणि सर्व पराभूत उमेदवारांच्या उपस्थितीत निकाल घोषित झाला. मतमोजणी एकदाच झाली. कोणत्याही कारणासाठी फेर मोजणी करण्याचा प्रश्नच आला नाही. विशेष म्हणजे निकाल रात्री १० नंतर घोषित झाला असून व्हायरल दावा ४ जून रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास करण्यात आला आहे.” असे त्यांनी आम्हाला सांगितले.

यावरून व्हायरल दावा खोटा असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

Conclusion

अशाप्रकारे आमच्या तपासात, धुळ्यात ४००० मतांनी पडलेला काँग्रेस उमेदवार फेरमोजणीनंतर ८००० मतांनी जिंकला आणि १२००० मतांचा घोळ झाला, हा दावा खोटा आहे. हे स्पष्ट झाले. प्रत्यक्षात विजयी उमेदवाराची आघाडी ३८३१ मतांची आहे. शिवाय धुळे मतदारसंघात फेरमोजणी झालेली नाही.

Result: False

Our Sources
Result of Dhule Lok Sabha Constituency declared by ECI Website
News published by One India on June 4, 2024
News published by TV9 Marathi on June 4, 2024
News published by Mumbai Tak on June 5, 2024
News published by Abplive on June 5, 2024
News published by Aaj Tak on June 5, 2024
Conversation with DC & Election Officer Dhule Mr. Abhinav Goyal


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular