Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
समान नागरी कायद्याला समर्थन करण्यासाठी ही सोशल मीडिया मोहीम असून 9090902024 वर मिस्ड कॉल देण्याचे आवाहन करण्यात येते.
Fact
2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी भाजपच्या सत्तेची नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मिस्ड कॉल मोहीम हा भाजपच्या मेगा आउटरीच कार्यक्रमाचा भाग असून समान नागरी कायद्याला समर्थनाची ही मोहीम नाही.
अनेक सोशल मीडिया युजर्स समान नागरी कायद्याच्या (UCC) समर्थनासाठी से सांगत हिंदूंना 9090902024 वर मिस कॉल देण्याचे आवाहन करत आहेत. “आधीच दोन दिवसांत 4 कोटी मुस्लिम आणि 2 कोटी ख्रिश्चनांनी UCC च्या विरोधात मतदान केले आहे. म्हणून 6 जुलै अंतिम मुदतीपूर्वी, देशातील सर्व हिंदूंना विनंती आहे की त्यांनी UCC च्या बाजूने मतदान करावे. कृपया UCC ला समर्थन देण्यासाठी आणि देश वाचवण्यासाठी 9090902024 वर मिस्ड कॉल द्या ” असे Whatsapp फॉरवर्ड सांगतो.
व्हाट्सपप आणि ट्विटर च्या बरोबरीनेच फेसबुकवर हा दावा मोठ्याप्रमाणात पसरत आहे.
आम्हाला आमच्या Whatsapp टिपलाइनवर (9999499044) हा दावा प्राप्त झाला असून, त्याची तथ्य तपासणी करण्याची विनंती केली आहे.
या ट्विट्स चे संग्रहण येथे आणि येथे पाहता येईल.
न्यूजचेकरने “UCC मिस्ड कॉल 909090204” साठी कीवर्ड शोध घेतला, ज्याने अशा मोहिमेची कोणतीही विश्वासार्ह बातमी दिली नाही.
तथापि, आम्हाला 31 मे 2023 रोजीचा हा इंडिया टुडेचा रिपोर्ट सापडला. “भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अद्वितीय मिस्ड कॉल मोहीम सुरू केली” असे शीर्षक दिले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पक्षाने (भाजप) 9090902024 या विशेष क्रमांकासह एक अनोखी ‘मिस्ड कॉल’ मोहीम सुरू केली आहे. या उपक्रमाचा उद्देश पक्षाच्या समर्थनाचा आधार वाढवणे आहे आणि 2019 मध्ये पक्षाने आयोजित केलेली सदस्यत्व मोहीम आठवण करून देणे आहे. ” असे हा रिपोर्ट सांगतो. पुढे लिहिले आहे की, “भाजपने मोबाईलचा क्रमांक वैशिष्ट्यपूर्णरीत्या निवडला आहे. हा क्रमांक मोदी सरकारच्या नऊ वर्षांचे आणि 2024 च्या महत्त्वपूर्ण निवडणूक वर्षाचे प्रतिनिधित्व करतो. आगामी निवडणुकांमध्ये जनतेकडून नवा जनादेश मागताना आपल्या गेल्या नऊ वर्षांच्या कार्यकाळाला समर्थन म्हणून हा आकडा काळजीपूर्वक निवडला आहे .” असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. याबद्दलचे समान रिपोर्ट येथे आणि येथे पाहिले जाऊ शकतात.
“केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ संघटनात्मक सदस्य मोदी सरकारच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त महिनाभर चालणार्या मास कनेक्ट कवायतीचा भाग म्हणून देशभरात कार्यरत होतील, ज्याकडे सत्ताधारी पक्षाचा पाठिंबा वाढवण्याचा मोठा आउटरीच म्हणून देखील पाहिले जाते. 2024 लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत,” असे NDTV च्या रिपोर्ट मध्ये नमूद करण्यात आले आहे. 31 मे पासून सुरू झालेली महिनाभर चाललेली मोहीम 30 जून रोजी संपेल. “भाजपने लोकांना आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी एक मोबाइल क्रमांक (9090902024) देखील सुरू केला आहे. मिस्ड कॉल देऊन समर्थन करा, असे आवाहन केले गेले आहे.” असे रिपोर्ट सांगतो.
या मोहिमेची माहिती देणारे भाजपचे प्रेस रिलीज येथे पाहिले जाऊ शकते.
आम्ही त्या नंबरवर मिस्ड कॉल दिला, त्यानंतर आम्हाला एसएमएस आला, मोदी सरकारला दिलेल्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद तसेच नरेंद्र मोदी सरकारच्या नऊ वर्षांवर लक्ष केंद्रित करणार्या वेबसाइटची एक लिंक देण्यात आली.
भाजपची अधिकृत वेबसाइट देखील मिस्ड-कॉल मोहिमेबद्दल माहिती देते. दरम्यान प्रसिद्ध बातम्या, भाजप प्रेस रिलीज आणि वेबपेजेसमध्ये समान नागरी कायदा UCC चा उल्लेख नाही.
आम्ही भाजपशी संपर्क साधला आणि आम्हाला प्रतिसाद मिळाल्यावर हा लेख अपडेट करू.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची गरज सांगितल्यानंतर भाजपने यूसीसीवर पक्ष आणि देशात चर्चा सुरू केल्याची माहिती आहे. सर्व धर्मातील नागरिकांसाठी विवाह, घटस्फोट, वारसा, मालमत्तेची देखभाल आणि उत्तराधिकार यासंबंधीच्या समान कायद्याशी संबंधित UCC हा पक्षाच्या स्थापनेपासून भाजपच्या जाहीरनाम्याचा भाग आहे.
नरेंद्र मोदी सरकारच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त एक महिनाभर चाललेल्या मास कनेक्ट ड्राइव्हचा भाग असलेली मिस्ड-कॉल मोहीम समान नागरी कायदा UCC समर्थक चळवळ म्हणून व्हायरल झाली आहे.
Sources
India Today report, May 31, 2023
NDTV report, May 31, 2023
BJP press release, May 30, 2023
BJP official website
BJP webpage dedicated to the mass connect drive
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in
Prasad S Prabhu
June 10, 2025
Runjay Kumar
June 2, 2025
Prasad S Prabhu
May 21, 2025