Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
मुंबई विद्यापीठाच्या 14 ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या सर्व परीक्षा तांत्रिक कारणांमुळे आणि पेपर सुरक्षा चिंतेमुळे 6 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
मुंबई विद्यापीठाने याचे खंडन केले असून व्हायरल परिपत्रक खोटे असल्याचे म्हटले आहे.
सोशल मीडियावर मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या असे सांगणारे एक परिपत्रक मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या पत्रात म्हटले आहे की, “मुंबई विद्यापीठाच्या 14 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होणाऱ्या सर्व परीक्षा तांत्रिक कारणांमुळे आणि पेपर सुरक्षा चिंतेमुळे 6 नोव्हेंबर 2025 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.”
न्यूजचेकरला आमच्या टिपलाइनवर (+91-9999499044) समान दावा प्राप्त झाला असून सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

या पत्रावर “University of Mumbai – Examination Department” असा हेडर आहे आणि खाली Controller of Examinations असे लिहिलेले दिसते. हे परिपत्रक अनेक विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि शिक्षकांनी शेअर केले असून त्यातून गोंधळ निर्माण झाला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर परीक्षा विभागातील सूचना तपासल्यावर असे परिपत्रक दिसत नाही. “Examination → Circulars / Notices” या विभागात शेवटचे अपडेट सप्टेंबर 2025 मधील आहे. म्हणजेच परीक्षा पुढे ढकलल्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

मुंबई विद्यापीठाने आपल्या अधिकृत X अकाउंटवर एक पोस्ट करून स्पष्ट सांगितलं आहे, “हे परिपत्रक खोटं आहे”.
“Students are advised not to believe in any postponement notices circulating on social media. The University has not issued any such circular. All examinations will be held as per schedule.” याचा मराठीत अनुवाद: विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावरील कोणत्याही परिपत्रकांवर विश्वास ठेवू नये. विद्यापीठाने अशा कोणत्याही सूचना जारी केलेल्या नाहीत. सर्व परीक्षा वेळापत्रकानुसारच होतील. असे पोस्टमध्ये म्हटलेले आहे.
“महाराष्ट्र टाइम्स”, “Free Press Journal” आणि “Mid-Day” यांसारख्या वृत्तसंस्थांनी विद्यापीठाच्या निवेदनाचा हवाला देत म्हटले आहे की, ‘व्हायरल परिपत्रक खोटे आहे आणि विद्यार्थ्यांनी अधिकृत माहिती फक्त संकेतस्थळावरूनच घ्यावी.’



आमच्या तपासात हे दिसून आले की, व्हायरल परिपत्रकातील फॉन्ट, लेआउट, आणि लोगो वापर विद्यापीठाच्या मूळ अधिकृत नोटिसमध्ये दिसणार्या स्वरूपापासून भिन्न आहेत. हे बदल सामान्यतः डिजिटल एडिटिंगच्या मार्गाने केले जातात. यावरून हे स्पष्ट आहे की हे दस्तऐवज एक falsified / फ्रॉड कौशल्याने तयार केले गेलेले आहेत.
मुंबई विद्यापीठाने पूर्वी सुद्धा असे बनावट परिपत्रक खोटे असल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. याच वर्षी मे महिन्यात परीक्षा रद्द करण्यात आली असं सांगणारं बनावट परिपत्रक प्रसारित झालं होतं, ज्याचा विद्यापीठाने त्वरित इन्कार केला होता.
आम्ही मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाशी संपर्क साधून याबद्दल विचारणा केली. परीक्षा विभागाने स्पष्ट केले की ते परिपत्रक खोटे आहे. अधिकृत संकेतस्थळावरून जोपर्यंत परिपत्रक येत नाही तोवर कुणीही विश्वास ठेऊ नये.
मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलण्याचा कोणताही अधिकृत निर्णय जारी केला नाही.
व्हायरल परिपत्रक fabricated आहे आणि विद्यापीठानेच त्याचा खुला इन्कार केला आहे.
Our Sources
Mumbai University Official Website
X post shared by Mumbai University on October 13, 2025
Articles published by Maharashtra Times on October 12, 2025
Conversation with Examination Department of Mumbai University