Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
कर्नाटकात मुस्लिम पुरूष आपल्या बहिणीशी लग्न करण्यासाठी जिवंत पत्नीला पुरत आहे.

पोस्ट येथे पाहता येईल.
व्हायरल व्हिडिओच्या कीफ्रेम्सवर गुगल लेन्स सर्च केल्यावर आम्हाला Nourin Mim या युजरने ९ ऑगस्ट २०२५ रोजी केलेली फेसबुक पोस्ट मिळाली. त्यात तीच क्लिप होती, ज्यामध्ये असे म्हटले होते की ही घटना बांगलादेशातील शेरपूर येथील श्रीबर्डी उपजिल्ह्यातील ३ क्रमांक काकिलाकुरा युनियनच्या कानिपारा बाजाराशेजारील एका ठिकाणची आहे.

याचा अंदाज घेत, आम्ही गुगलवर बंगाली भाषेत “शेरपूर”, “माणसाने पत्नीला पुरले” हे कीवर्ड शोधले ज्यावरून या घटनेबद्दल बांगलादेशातील अनेक रिपोर्ट मिळाले. ९ ऑगस्ट २०२५ रोजी प्रकाशित झालेल्या ढाका प्रकाश २४ च्या अशाच एका रिपोर्टमध्ये व्हायरल क्लिप दाखवण्यात आली होती आणि त्या व्यक्तीची ओळख मोहम्मद खलीलुर रहमान अशी सांगितली आहे. त्यात असे म्हटले होते की रहमानने त्याची अर्धांगवायू झालेली पत्नी खोशेदा बेगम हिला अंगणात ओढले आणि तिला जिवंत गाडण्याचा प्रयत्न केला. बातमीत अशीही पुष्टी करण्यात आली की ही घटना शेरपूरच्या श्रीबर्डी उपजिल्हा येथे घडली.

श्रीबर्डी पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी (ओसी) मोहम्मद अन्वर जाहिद म्हणाले की, घटनेची माहिती मिळताच पोलिस कर्मचारी घटनास्थळी गेले, परंतु स्थानिकांनी सामाजिकरित्या प्रकरण सोडवले. लेखी तक्रार आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले, असे Daily Ittefaq ने वृत्त दिले आहे.
त्यामुळे, कर्नाटकात एका मुस्लिम पुरूषाने आपल्या बहिणीशी लग्न करण्यासाठी आपल्या पत्नीला जिवंत पूरण्याचा प्रयत्न केला, असा दावा करणारी पोस्ट खोटी असल्याचे आढळून आले.
Sources
Facebook Post By Nourin Mim, Dated August 9, 2025
Report By Dhaka Prokash 24, Dated August 9, 2025
Report By Daily Ittefaq, Dated August 9, 2025
(हे आर्टिकल न्यूजचेकर इंग्रजीसाठी वसुधा बेरी यांनी केले असून येथे वाचता येईल.)
Salman
September 27, 2025
Vasudha Beri
August 7, 2025
Prasad S Prabhu
July 30, 2025