Wednesday, January 1, 2025
Wednesday, January 1, 2025

HomeFact CheckFact Check: मुस्लिम जमावाने तरुणाला मारहाण करून तलवारीने त्याची मान कापल्याचे दृश्य...

Fact Check: मुस्लिम जमावाने तरुणाला मारहाण करून तलवारीने त्याची मान कापल्याचे दृश्य खरे आहे का? ही घटना कुठे घडली आहे?

Authors

Pankaj Menon is a fact-checker based out of Delhi who enjoys ‘digital sleuthing’ and calling out misinformation. He has completed his MA in International Relations from Madras University and has worked with organisations like NDTV, Times Now and Deccan Chronicle online in the past.

Claim
मुस्लिम जमावाने तरुणाला बेदम मारहाण केली, तलवारीने त्याचा गळा कापला.

Fact
व्हिडिओमध्ये दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांची संपादित दृश्ये आहेत जी एकमेकांशी संबंधित नाहीत आणि सत्य नाहीत.

एका तरुणाला मुस्लीम गटाकडून मारहाण आणि चाकूने ठार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हॉट्सअपवर आढळलेल्या या व्हिडिओमध्ये दुचाकीवर आलेल्या तरुणाला जमावा कडून बेदम मारहाण केली जाते आणि त्याला एका गेटच्या आतील परिसरात नेले जाते, त्यानंतर त्याला बांधून त्याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली जाते. या व्हिडीओमध्ये हिंदीत एक वाक्य लिहिलेले पाहायला मिळते, “कसाई अपना हो या पराया कसाई ही रेहता है, ओ किसीको कटने से पहिले ये नही देखता की वो बकरा है या इंसान”

Fact check/ Verification

जेव्हा वस्तुस्थिती तपासण्यासाठी व्हिडिओ तपासला गेला तेव्हा असे आढळून आले की दोन स्वतंत्र व्हिडिओ एकामध्ये एकत्र केले गेले आहेत. याव्यतिरिक्त, व्हिडिओच्या मुख्य फ्रेम्स मिळवून रिव्हर्स इमेज शोध घेण्यात आला आणि 5 मे 2021 रोजी प्रसिद्ध झालेले अमर उजाला चे हे वृत्त सापडले.

Fact Check: मुस्लिम जमावाने तरुणाला मारहाण करून तलवारीने त्याची मान कापल्याचे दृश्य खरे आहे का? ही घटना कुठे घडली आहे?
screengrab of Amar Ujala

या वृत्तानुसार, ही घटना उत्तर प्रदेशातील सिक्री गावात घडली असून, अनुज नावाच्या लाइनमनला मारहाण केल्याचा हा व्हिडिओ आहे. सिक्री गावातील विजेच्या समस्येबाबत अनुज आला होता, त्याला एका घराची वीज जोडणी बदलण्यास सांगण्यात आले, त्याने नकार दिला, त्याचे रूपांतर वादात झाले आणि एका गटाने त्याला मारहाण केली. अशी माहिती उपलब्ध झाली.

हा व्हिडिओ ट्विटरवर देखील आढळला आणि Brijeshyadav945 या युजरने तो पश्चिम बंगालचा असल्याचा दावा करत शेअर केला होता. मात्र मुझफ्फरनगर पोलिसांनी याला उत्तर देत उत्तर प्रदेशातील ही घटना असल्याचे सांगितले आणि याप्रकरणी 10-12 जणांवर गुन्हा दाखल केला आहे, अशीही माहिती दिली.

मान कापल्याचा व्हिडिओही तपासण्यात आला. यासंदर्भात गुगलवर कीवर्ड सर्च केले असता 6 फेब्रुवारी 2018 रोजी news.com AU ने प्रसिद्ध केलेला रिपोर्ट सापडला. या रिपोर्टनुसार, शिरच्छेदाची घटना उत्तर अमेरिकेतील व्हेनेझुएला येथे घडली. व्हिडिओमध्ये दिसणार्‍या तरुणाचे ड्रग्ज माफिया टोळीशी वैर होते आणि माफिया टोळीने त्याला पकडून अज्ञात परिसरात त्याची मान कापून हत्या केली.

Fact Check: मुस्लिम जमावाने तरुणाला मारहाण करून तलवारीने त्याची मान कापल्याचे दृश्य खरे आहे का? ही घटना कुठे घडली आहे?
Screengrab of news.com AU

या घटनेचा व्हिडिओ बनवून इंटरनेटवर शेअर केल्याचे सांगण्यात आले आहे. 6 फेब्रुवारी 2018 रोजी द सननेही या घटने संदर्भात वृत्तांकन केले आहे.

Conclusion

आमच्या तपासात जमावाने केलेल्या हत्येचा व्हिडिओ खोटा आहे. मारहाण आणि हत्येचे दोन व्हिडिओ एकत्र जोडण्यात आले असून एकच घटना म्हणून व्हायरल करण्यात आले आहेत. पहिला व्हिडिओ वीजे समस्येशी संबंधित आहे आणि दुसरा व्हिडिओ व्हेनेझुएलातील एका घटनेचा आहे.

Result: False

Our Sources
Report by Amarujala , Dated May 5, 2021
Report by News.com.au , Dated, February 6, 2018
Report by The Sun , Dated, February 6, 2018


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

Authors

Pankaj Menon is a fact-checker based out of Delhi who enjoys ‘digital sleuthing’ and calling out misinformation. He has completed his MA in International Relations from Madras University and has worked with organisations like NDTV, Times Now and Deccan Chronicle online in the past.

Ishwarachandra B G, Translated By Prasad Prabhu , Edited By Pankaj Menon

Most Popular