Authors
नागपूरहून मुंबईला सुमारे ९० कंटेनर घेऊन जाणारी मालवाहू गाडी बेपत्ता आहे, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.
नागपूर येथील इंग्रजी दैनिक द हितवाद च्या ऑनलाईन आवृत्तीने १४ फेब्रुवारी २०२३ रोजी ही खळबळजनक बातमी प्रसिद्ध केली. या बातमीची संग्रहित आवृत्ती आपण इथे पाहू शकता. ही बातमी प्रसिद्ध होताच भलीमोठी रेल्वे हरविली आहे असा दावा करीत अनेक युजर्सनी समाज माध्यमांवरून या बातमीचे कात्रण पसरविण्यास प्रारंभ केला. यासाठी न्यूजचेकर ने या घटनेचा तपास करून नेमके प्रकरण काय आहे? हे शोधण्याचा प्रयत्न केला.
Factcheck/ Verification
आम्ही अशाप्रकारची रेल्वे हरविण्याची घटना घडली आहे का? याचा शोध सुरु केला. गुगल वर किवर्ड सर्च च्या माध्यमातून आम्ही शोधले असता, आम्हाला आणखी कुठेही असे मीडिया रिपोर्ट मिळाले नाहीत. नागपूर ते मुंबई या दोन शहरांना जोडणारे हे वृत्त असल्याने आम्ही तसा शोध घेतला, मात्र काहीच उपलब्ध झाले नाही. अशास्थितीत हा विषय रेल्वे खात्याशी संबंधित असल्याने आम्ही रेल्वेने याबद्दल काही स्पष्टीकरण दिले आहे का? या दृष्टीने शोध घेतला. आम्हाला रेल्वे हरविल्याचा हा दावा खोटा असल्याचे पाहायला मिळाले.
सेंट्रल रेल्वेच्या मीडिया विभागाने एक प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून याचा इन्कार केला आहे.
द हितवाद ला दिलेल्या स्पष्टीकरणात ही रेल्वे भुसावळ डिव्हिजन च्या शेगाव रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर जेएनपीटी पोर्ट वर प्रत्यक्षात नेण्यात आली आहे असे सेंट्रल रेल्वे ने म्हटले असून, हे वृत्त चुकीच्या माहितीवर आधारित असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात सेंट्रल रेल्वेने केलेले ट्विट ही आम्हाला मिळाले आहे.
Conclusion
नागपूरहून मुंबईकडे निघालेली सुमारे ९० कंटेनर्स घेऊन जाणारी मालवाहू ट्रेन १२ ते १३ दिवसांपासून बेपत्ता असल्याच्या प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या बातम्या खोट्या असल्याचे आमच्याकडे उपलब्ध असलेल्या पुराव्यांवरून स्पष्ट झाले आहे.
Result: False
Our Sources
News published by The Hitwad on February 14,2023
Tweet made by Cental Railway on February 14,2023
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in