Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
काँग्रेस आरक्षण हटविणार असल्याचे नाना पटोले यांनी मान्य केले.
Fact
नाना पटोले यांचे विधान कापून चुकीच्या संदर्भाने शेयर केले जात असून हा दावा दिशाभूल करणारा आहे.
काँग्रेस आरक्षण हटविणार असल्याचे नाना पटोले यांनी मान्य केले, असा दावा सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेक युजर्स समान दावा करीत हा दावा करीत आहेत.





दाव्याचे संग्रहण इथे आणि इथे पाहता येईल.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दावा शेयर केला जात आहे. “हा घ्या पुरावा..महाविकास आघाडी दलितांचे, वंचितांचे, ओबीसींचे, आदिवासींचे आरक्षण हटवणार!! काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की दलितांना, आदिवासींना, वंचितांना, ओबीसी समाजाला मिळणारे आरक्षण काँग्रेस हटवणारच! ही काँग्रेसची भूमिका असून त्यावर राष्ट्रवादी आणि उबाठा सेनेची मूकसंमती आहे. जर हे डॉ.आंबेडकरांनी दलित, वंचित, आदिवासी, ओबीसी यांना दिलेले आरक्षणच काढणार आहेत तर मराठे, धनगर किंवा इतर कोणाला आरक्षण देतील? अशक्य!! हे फक्त मुसलमानांना देशाच्या साधनानांवर पहिला अधिकार आहे म्हणत त्यांनाच आरक्षण देण्याचा खेळ खेळत आहेत. खोटं वाटत असेल तर एकदा विडिओ बघाच!” अशा कॅप्शन दाव्यासोबत वाचायला मिळत आहेत.
महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा हा व्हायरल व्हिडीओ आम्ही काळजीपूर्वक पाहिला. यामध्ये स्वतः पटोले आणि प्रश्न विचारणारे पत्रकार हिंदीमध्ये बोलत असल्याचे आमच्या निदर्शनास आले. यावरून संबंधित व्हिडीओ एकाद्या हिंदी चॅनेलचा असल्याचा सुगावा लागला. पत्रकाराच्या बुमवर तसेच नाना पटोले यांच्या हातातील बुमवर आम्हाला India TV असे दिसले.


यावरून कीवर्डसच्या माध्यमातून शोध घेतला असता, इंडिया टीव्हीने ही मुलाखत घेतली होती. आणि या चर्चेचा व्हिडिओ 24 ऑक्टोबर रोजी युट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे. हे आमच्या निदर्शनास आले.
आम्ही संपूर्ण चर्चा ऐकली. या चर्चेत नाना पटोले अनेक प्रश्नावर उत्तरे देतात.
व्हिडिओमध्ये 13:30 मिनिटावर नाना पटोलेंना प्रश्न विचारला जातो की, राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात परदेशात केलेल्या वक्तव्याबाबत भाजप काँग्रेसला लक्ष्य करत आहे. तुम्ही जातीय जनगणना करुन जातींमध्ये संघर्ष निर्माण करू पाहता आहात आणि मराठा आणि ओबीसींमध्ये तेढ निर्माण करु पाहात आहात. असा भाजपचा आरोप आहे.
यावर उत्तर देताना नाना पटोले म्हणतात की, ज्यांना इंग्रजी कळत नाही त्यांच्यासाठी हा मुद्दा असेल. आपल्याकडे तो राहुल गांधींचा व्हिडीओ असेल तर लावा. जेंव्हा आमच्या देशामध्ये समानता येईल तेंव्हा आम्ही आरक्षणाचा विचार करू असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. यात चूक काय? आणि बाबासाहेब आंबेडकरांची भूमिकाही तीच होती. राहुल गांधी यांच्या विधानाची मोडतोड करण्यात आली असून ज्यांना इंग्रजी येत नाही ते तसे सांगत आहेत.
दरम्यान नाना पटोले यांचे पुढचे आणि मागचे विधान गाळून गैरसमज निर्माण करण्यात आला असल्याचे स्पष्ट होते.
आम्ही खुद्द नाना पटोले यांच्याशीसुद्धा यासंदर्भात संपर्क साधला, “राहुल गांधी यांच्या आरक्षण संदर्भातील भाषणाचा सर्वप्रथम विपर्यास लावण्यात आला. ते चुकीचे बोलले नाहीत इतकेच मी सांगितले असून व्हायरल दाव्यात म्हटलेल्या गोष्टी खोट्या असल्याचे त्यांनी सांगितले.”
यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सत्तेत आल्यास आरक्षण संपवू असे विधान केल्याचा दावा झाला होता त्यावेळी न्यूजचेकरने त्याचे खंडन केले होते.
अशाप्रकारे आमच्या तपासात काँग्रेस आरक्षण हटविणार असल्याचे नाना पटोले यांनी मान्य केले, हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे आढळले. नाना पटोले यांचे विधान कापून चुकीच्या संदर्भाने शेयर केले जात आहे.
Our Sources
Self Analysis
Video published by India Tv on October 24, 2024
Conversation with Congress Leader Nana Patole
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Vasudha Beri
November 19, 2025
Runjay Kumar
November 17, 2025
Prasad S Prabhu
October 30, 2025