Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत असा दावा करण्यात आला आहे की, नीता अंबानी जगातील सर्वात महागडे पाणी पितात, ज्याच्या एका बाटलीची किंमत 44 लाख रुपये आहे. व्हायरल पोस्टमध्ये नीता अंबानी बाटलीतून पाणी पिताना दिसत आहेत.
विचार सागर नावाच्या फेसबुक पेजने व्हायरल पोस्ट शेअर करत लिहिले की, “नीता अंबानी श्रीमंतांमध्ये आघाडीवर, जगातील सर्वात महागडे पाणी पितात, किंमत जाणून घ्या.”

Gworld7 या वेबसाइटने देखील व्हायरल फोटो शेअर करत लिहिले की, “नीता अंबानी जगातील सर्वात महागडे पाणी पितात, दिल्ली-मुंबईत एका घोटाच्या किमतीत घर खरेदी करू शकतात, जाणून घ्या या पाण्याची खासियत.”

त्याचवेळी, आणखी एका वेबसाइट Viral Sandesh ने लिहिले की, “नीता अंबानी जगातील सर्वात महागडे पाणी पितात, बाटलीच्या किमतीत घर खरेदी करू शकतात.”

आणखी एक इंस्टाग्राम हँडल billionaire mindset नेही पोस्ट शेअर करत दावा केला आहे की, “नीता अंबानी जगातील सर्वात महागडे पाणी पितात.”

रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि संस्थापक नीता अंबानी या IPL क्रिकेट संघ मुंबई इंडियन्सच्या सह-मालक आणि भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी आहेत. नीता त्यांच्या समाजसेवेशी संबंधित कामांमुळे नेहमीच चर्चेत असतात. याशिवाय त्यांना ब्रँडेड गोष्टींचीही खूप आवड आहे. अशा परिस्थितीत त्याच्या महागड्या छंदाशी संबंधित बातम्या अनेकदा व्हायरल होतात. अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की नीता अंबानी जगातील सर्वात महाग पाणी पितात, ज्याच्या एका बाटलीची किंमत 44 लाख रुपये आहे.
नीता अंबानी जगातील सर्वात महागडे पाणी पितात, ज्याच्या एका बाटलीची किंमत 44 लाख रुपये आहे. या दाव्यासह सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोची सत्यता पडताळणीसाठी, आम्ही गुगल इमेज रिव्हर्सचा आधार घेतला यादरम्यान अमर उजालाची बातमी आढळून आली.
यानंतर आम्ही ‘Nita Ambani Ipl Drink Bottle’ या कीवर्डच्या मदतीने गुगलवर सर्च करायला सुरुवात केली. या प्रक्रियेत आम्हाला Bollywood Mantra नावाच्या वेबसाइटवर नीता अंबानींचा फोटो मिळाला. ज्यामध्ये त्या बाटलीतून पाणी पिताना दिसत आहेत. वेबसाइटनुसार, 2015 मध्ये झालेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या आठव्या आवृत्तीदरम्यान हा फोटो क्लिक करण्यात आला आहे. ज्यामध्ये त्यांच्यासोबत क्रिकेटर अनिल कुंबळेही दिसत आहे. या चित्रात नीता अंबानी यांनी जगातील सर्वात महागडे पाणी पिल्याचे ऐकिवात नाही. हा फोटो व्हायरल झालेल्या फोटोसारखाच आहे.

आम्ही व्हायरल फोटोची तुलना Bollywood Mantra च्या वेबसाइटवरून मिळवलेल्या फोटोशी केली. दोन्ही फोटोत बरेच साम्य होते. दोन्हींत नीता अंबानीनी चष्मा घातलेल्या दिसत आहे तर, डाव्या हातात लाल दोरा, पाण्याची बाटली घड्याळ दिसत आहे.

तपासादरम्यान, व्हायरल झालेल्या चित्रात नीता अंबानींच्या हातात दिसलेल्या बाटलीबद्दल आम्ही शोध सुरू केला. या दरम्यान आम्हाला 14 डिसेंबर 2021 रोजी Times Of India च्या प्रकाशित झालेला रिपोर्ट प्राप्त झाला. रिपोर्टनुसार, नीता अंबानींच्या व्हायरल फोटोमध्ये दिसणारी सोनेरी रंगाची बाटली प्रत्यक्षात एक विशेष प्रकारचे पाणी आहे. या पाण्याच्या ब्रँडचे नाव Acqua di Cristallo tributo a modigliani आहे. ही बाटली जगातील सर्वात महागड्या बाटलींपैकी एक आहे, ज्याची 750 मिलीलीटर किंमत सुमारे 44 लाख रुपये आहे. या ब्रँडच्या सर्वात स्वस्त बाटलीची किंमत $285 म्हणजेच 21,355 रुपये आहे. 2010 मध्ये या बाटलीच्या ब्रँडचे नाव गिनीज बुकमध्ये सर्वात महागड्या पाण्याची बाटली म्हणून नोंदवले गेले.
अशाप्रकारे, आमच्या तपासात हे स्पष्ट झाले आहे की, नीता अंबानी यांचा एक फोटोशॉप केलेला फोटो सोशल मीडियावर भ्रामक दाव्याने व्हायरल होत आहे.
Self Analysis
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Prasad S Prabhu
January 31, 2025
Vasudha Beri
June 6, 2025
Komal Singh
April 14, 2025