Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
औषधांच्या कॅप्सूलमध्ये खिळे घालून नवा जिहाद सुरू झाला आहे.
Fact
व्हायरल व्हिडिओ दोन स्वतंत्र व्हिडिओचे एकत्रीकरण असल्याचे सामोरे आले आहे. हा व्हिडिओ भारतातील नाही, व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेले कॅप्सूल पाकिस्तान, बोस्निया आणि हर्झेगोविना येथील आहेत.
सोशल मीडियावर कॅप्सूलमध्ये खिळ्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती औषधाचे पॅकेट उघडतो आणि नंतर कॅप्सूल उघडून आतील एक खिळा बाहेर काढतो. कॅप्सूलच्या आणखी एका पॅकेटमध्ये खिळे असल्याचेही दाखवले आहे.
व्हॉट्सअपवर प्रसारित झालेल्या व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “सर्व बांधवांनी कॅप्सूल गिळण्यापूर्वी चुंबकाने तपासावे.. नवीन जिहाद सुरू झाला आहे.”
वस्तुस्थिती शोधण्यासाठी व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला गेला आणि असे आढळले की दोन व्हिडिओ एकत्र जोडले गेले आहेत. जवळून तपासणी केली असता कॅप्सूलच्या पॅकवर उर्दूमध्ये लिहिलेले आढळले. पाकिटावर Esoral असाही उल्लेख आढळला.
त्यानुसार या कॅप्सूलच्या नावाचा शोध घेतला असता, ती पाकिस्तानमध्ये तयार केलेली कॅप्सूल असल्याचे आढळून आले. कराची, पाकिस्तानची सिटी फार्मा कंपनी या गोळ्यांचे उत्पादन करत आहे.
त्याचप्रमाणे बांगलादेशची Escaif Pharmaceuticals Limited कंपनी देखील अशाच प्रकारच्या कॅप्सूलचे उत्पादन करत आहे. त्याचे पॅकेज वेगळे आहे.
या तपासणीत दोन कंपन्या एकाच नावाने कॅप्सूल तयार करत असल्याचे आढळून आले. पण पाकिस्तानच्या सिटी फार्मा कंपनीने बनवलेल्या कॅप्सूलचे पॅक व्हायरल व्हिडिओमध्ये दाखवलेल्या कॅप्सूलसारखेच असल्याचे आढळून आले. यासोबतच बांगला कंपनीच्या इसोरल कॅप्सूलचे पॅकेज वेगळे असल्याचे आढळून आले.
आम्ही दुसऱ्या व्हिडिओसाठी कीवर्ड शोधले आणि हा व्हिडिओ YouTube वर उपलब्ध असल्याचे आढळले.
18 फेब्रुवारी 2021 रोजी FirstNigeriaTV चॅनलवर एका शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून अपलोड केला गेलेला हा व्हिडीओ असून, ज्यामध्ये अँकरचा आवाज रशियन आहे. महत्वाचे म्हणजे कॅप्सूलचे नावही रशियन भाषेत आहे.
त्याचे नाव Google Lens द्वारे शोधले गेले आणि ते आहे ‘BOSKALLJEN’. गुगल भाषांतरादरम्यान, ते Entofuril 200 mg कॅप्सूल Nifurkazil Boskalgen कॅप्सूल असल्याचे आढळून आले. त्याच्या उत्पादन कंपनीच्या शोधात ती बोस्निया आणि हर्झेगोविना येथील असल्याचे दिसून आले. कंपनी युगोस्लाव्हिया येथे स्थित आहे आणि युरोपच्या विविध भागांमध्ये उत्पादन आहे.
आमच्या तपासात व्हायरल व्हिडिओ दोन स्वतंत्र व्हिडिओचे एकत्रीकरण असल्याचे सामोरे आले आहे. तसेच हा व्हिडिओ भारतातील नाही. तो पाकिस्तानी आणि रशियन वंशाचा असू शकतो. हे स्पष्ट झाले असून व्हायरल व्हिडीओचा मूळ स्रोत आम्ही स्वतंत्रपणे शोधू शकलो नाही.
Our Sources
Website of City Pharmaceutical Pakistan
Video published by FirstNigeriaTV on February 18, 2021
Website of Vidal.ru
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in