‘लागीरं झालं जी’या प्रसिद्ध टिव्ही मालिकेतील अजिंक्य म्हणजेच नितीश चव्हाणचे निधन झाले असल्याचा दाव्याने एक फोटो व्हायरल होत आहे. अनेक युजर्सनी त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. आमच्या पडताळणीत हा दावा चुकीचा असल्याचे आढळून आले आहे.
शेअरचॅट या सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर हा दावा मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.
तसेच या संदर्भात काही बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र यात ‘लागीरं झालं जी’ ज्ञानेश माने या कलाकाराचे अपघातात निधन झाले आहे असे म्हटले आहे.
Fact Check/Verification
‘लागीरं झालं जी’ या प्रसिद्ध टिव्ही मालिकेतील अजिंक्य (नितीश चव्हाण) चे निधन झाले असल्याचा दाव्याने व्हायरल होत असलेल्या मेसेजचे सत्य काय आहे? हे जाणून घेण्यासाठी आम्ही शोध सुरु केला.व्हायरल बातमीचे कात्रण ज्या दैनिकाचे आहे त्या दैनिक कार्यारंभच्या वेबसाईटला भेट दिली. मात्र आम्हाला बातमीl दुसराच फोटो आढळून आला. यात म्हटले आहे की, लागिर झालं जी या मालिकेतील कलाकार ज्ञानेश माने यांचा पुण्याला जाताना रोटी घाटात कार अपघातात मृत्यू झाला असल्याचे म्हटले आहे.

दैनिक कार्यारंभ ची बातमी
यानंतर आम्ही ज्ञानेश चव्हाण यांचे अपघातात निधन या किवर्ड्सच्या आधारे शोध सुरु केला असता टिव्ही 9 मराठीची बातमी आढळून आली. यात म्हटले आहे की, ‘लागीरं झालं जी’ या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या अभिनेत्याचं निधन झालं. अभिनेते ज्ञानेश माने यांना कार अपघातात प्राण गमवावे लागले आहेत. पुण्यातील रोटी घाटातून प्रवास करताना मानेंच्या गाडीला भीषण अपघात झाला होता. घाटातील वळणावर झालेल्या अपघातात ज्ञानेश माने बेशुद्ध झाले होते, मात्र रुग्णालयात नेईपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती.

याशिवाय लोकसत्ताची बातमी आढळून आली. यात देखील “लागीरं झालं जी मालिकेतील अभिनेते ज्ञानेश माने यांचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. रोटी घाटातून पुण्याला येत असताना त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. त्यानंतर उपचारासाठी त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. ज्ञानेश हे मुळचे बारामतीतील झारगडवाडी येथील होते. ते पेशाने डॉक्टर होते पण अभिनयाची आवड असल्यामुळे त्यांनी मालिकेत काम करण्यास सुरुवात केली होती.” असे म्हटले आहे.

याशिवाय आम्हाला ‘लागीरं झालं जी’ मालिकेतील अजिंक्य (अभिनेता नितीश चव्हाण याचा) या अपघातासंदर्भात खुलासा करमारा व्हिडिओ शेअरचॅटवर आढळून आला. यात त्याने म्हटले आहे की, “नितीश चव्हाण ‘लागीर झालं जी’ मालिकेतील कलाकराचे अपघाती निधन झाल्याची बातमी सगळीकडे पसरली आहे, पण तसं काही झालेलं नाही, आमच्या मालिकेमध्ये ज्ञानेश माने नावाचे कलाकार होते , त्यांचं अपघाती निधन झालं आहे.तुम्ही ती बातमी नीट वाचा, फोटो जरी माझा आला असला तरी मी सुखरुप आहे. काहीही काळजी करु नका, आणि सगळ्यांना सांगा की, ही बातमी खोटी आहे.”
Conclusion
अशाप्रकारे, आमच्या तपासात हे स्पष्ट झाले की, ‘लागीरं झालं जी’ मालिकेतील अजिंक्यचे (नितीश चव्हाण) अपघातात निधन झाले नाही तर मालिकेतील दुसरे कलाकार ज्ञानेश माने यांचं निधन झाले आहे नितीशचा फोटो चुकीच्या दाव्याने व्हायरल झाला आहे.
Result: Misplaced Context
Our Sources
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.