Authors
Claim
वसई येथील युवतीचे खूनप्रकरण लव्ह जिहाद मधून झाले आहे.
Fact
हा दावा खोटा आहे. हे प्रकरण प्रेमप्रकरणातून झाले आहे. मात्र मयत युवती आणि तिचा मारेकरी प्रियकर हिंदूच आहेत.
वसई येथील युवतीच्या खून प्रकरणाला ‘लव्ह जिहाद’ ची किनार आहे, असा दावा सोशल मीडियाच्या माध्यमातून केला जात आहे.
दाव्यासोबत एक व्हिडिओही आहे. यामध्ये भर रस्त्यात एक व्यक्ती खाली पडलेल्या व्यक्तीवर सपासप वार करताना दिसत आहे. दरम्यान कॅप्शनच्या माध्यमातून “मुंबईतील वसईतील एका गजबजलेल्या रस्त्यावर एका २० वर्षीय तरुणीला एका व्यक्तीने भरदिवसा मारहाण केली. हा लव्ह जिहादचा मामला आहे.” असे हा दावा सांगतो.
दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.
Fact Check/ Verification
वसईतील युवतीच्या हत्येचा तपास करण्यासाठी, आम्ही यूट्यूबवर “वसई, रस्त्यावर लोखंडी वस्तूने युवतीची हत्या” असा कीवर्ड शोधला. आज तक न्यूज चॅनलच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर १८ जून २०२४ रोजी अपलोड केलेला वसई हत्याकांडाशी संबंधित ब्रेकिंग व्हिडिओ रिपोर्ट आम्हाला मिळाला. त्यानुसार ज्याने युवतीची लोखंडी रेंचने हत्या केली तो तिचा माजी प्रियकर होता. नुकतेच तिने त्याच्याशी संबंध तोडले होते, मुलीचे दुसऱ्या मुलाशी संबंध असल्याचा त्या मुलाला संशय होता, त्यामुळे २९ वर्षीय आरोपीने सकाळच्या वेळी भर रस्त्यावर लोखंडी पान्याने युवतीच्या डोक्यावर अनेक वार केले. अशी माहिती आम्हाला मिळाली.
पुढील तपासादरम्यान, आम्हाला टाइम्स ऑफ इंडियाने १९ जून रोजी प्रकाशित केलेला रिपोर्ट प्राप्त झाला. २९ वर्षीय युवकाचे नाव रोहित यादव आणि २२ वर्षीय युवतीचे नाव आरती यादव असे आहे. दोघे गेल्या ६ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. हल्ल्याच्या वेळी तिथे उपस्थित असलेले लोक प्रेक्षक बनून राहिले. मात्र, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अशी माहिती आम्हाला त्यातून मिळाली.
या घटनेनंतर राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. विरोधकांनी फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुलगी मूळची उत्तर प्रदेशची तर मुलगा हरियाणातील असून दोघेही मुंबईतील नालासोपारा येथे राहतात.
वरीलपैकी कोणत्याही रिपोर्टमध्ये हिंदू-मुस्लिम किंवा लव्ह जिहादचा उल्लेख नाही. त्यानंतर आम्ही पीडितेची आई निर्जला यादव आणि वडील राम दुलार यादव यांच्याशी फोनवर संपर्क साधला. पीडितेच्या आईने सांगितले की, “काही दिवसांपूर्वी आरोपी रोहित हा आरतीसोबत लग्नाच्या मागणीसाठी घरी आला होता, मुलाच्या आर्थिक परिस्थितीमुळे कुटुंबीयांनी त्यांच्या मुलीचे लग्न त्याच्यासोबत करून देण्यास नकार दिला होता. कुटुंबीयांनी नकार दिल्यानंतर आरतीनेही त्याच्यापासून दूर राहण्यास सुरुवात केली. दरम्यान रोहितला तीने दुसऱ्या मुलाशी सूत जुळविल्याचा संशय आल्याने हा प्रकार घडला आहे.”
Conclusion
अशाप्रकारे आम्ही केलेल्या तपासात हे स्पष्ट झाले आहे की, वसई येथे झालेले खून प्रकरण प्रेमप्रकरणातून झालेले असले तरी त्याला ‘लव्ह जिहाद’ ची कोणतीही किनार नाही. व्हायरल दावा खोटा आहे.
Result: Partly False
Sources
Reports published by Aaj Tak, Times of India and ABP Marathi on 18, 19 Jun 2024
Conversation with Victim Family
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा