Monday, November 25, 2024
Monday, November 25, 2024

HomeFact Checkकाॅंग्रेस नेते अहमद पटेल यांच्या अंत्ययात्रेचा नाही व्हायरल व्हिडिओ, हे आहे सत्य

काॅंग्रेस नेते अहमद पटेल यांच्या अंत्ययात्रेचा नाही व्हायरल व्हिडिओ, हे आहे सत्य

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

काॅंग्रेस नेते अहमद पटेल यांच्या अंत्ययात्रेला हजारो लोक उपस्थित असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. व्हायरल पोस्टमध्ये दावा करण्यात येत आहे की हा व्हिडिओ अहमद पटेल यांच्याच अंत्ययात्रेच्या असून ते कोरोना पाॅझिटिव्ह होते, तरी देखील त्यांच्या अंत्ययात्रेत कोणत्याही नियमाचे पालन करण्यात आले नाही.

https://www.facebook.com/100029516533368/videos/448231406170740

संग्रहित

याशिवाय हाच दावा करणा-या अनेक पोस्ट व्हायरल झाल्याचे आढळून आले.

फेसबुक, संग्रहित

Fact Check/Verification

चार दशकांपासून राष्ट्रीय स्तरावर भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचा अविभाज्य भाग असलेले अहमद पटेल यांचे 25 नोव्हेंबर 2020 रोजी निधन झाले. यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या देशातील सर्व पक्षांच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला. दरम्यान, सोशल मीडियावर अंत्ययात्रेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि दावा करण्यात आला की ही अंत्ययात्रा दिवंगत नेते अहमद पटेल यांची आहे. जिथे कोरोनाव्हायरसचे धुडकावून शेकडो लोक यात सामील झाले. आम्ही व्हायरल व्हिडिओची सत्यता जाणून घेण्यासाठी शोध सुरु केला.

आम्ही ‘अहमद पटेल अंत्यसंस्कार’ कीवर्डसह Google वर अहमद पटेल यांच्या अंत्यसंस्कार व्हिडिओ शोधण्यास सुरुवात केली. यावेळी आम्हाला टीएनएन न्यूज नावाच्या युट्यूब चॅनेलवरर अहमद पटेल यांच्या अंत्यसंस्काराचा व्हिडिओ आढळला.

शोधादरम्यान, आम्हाला वरील व्हिडिओमध्ये आढळले की, अंत्यसंस्कारात केवळ मर्यादित संख्येने लोक होते, तसेच मास्क, थर्मल स्कॅनिंग आणि सेनिटायझर्स सारख्या मार्गदर्शकाची देखील काळजी घेण्यात आली आहे.

युट्यूबवरील व्हिडिओमध्ये अहमद पटेल यांच्या अंत्ययात्रेत काळ्या रंगाचा कफन वापरलेला आहे तर व्हायरल व्हिडिओत हिरवा कफन वापरण्यात आला आहे.

यावरुन निदर्शनास आले की व्हायरल व्हिडिओ कॉंग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्या अंत्यसंस्काराचा नाही. त्यानंतर आम्ही व्हायरल व्हिडिओंविषयी माहिती मिळवण्यासाठी गुगलवर बारकाईने शोधण्यास सुरवात केली. दरम्यान, आम्हाला एमएम टाइम्स न्यूज नावाच्या यूट्यूबच्या चॅनेलवर एक व्हिडिओ सापडला, त्यातील काही दृश्ये व्हायरल व्हिडिओंशी जुळतात असे दिसून आले.

शोधादरम्यान सापडलेल्या व्हिडिओमध्य माहिती देण्यात आली आहे की ही अंत्ययात्रा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते जमील शेख यांची आहे. त्यानंतर आम्ही प्राप्त माहितीची पुष्टी करण्यासाठी गूगलवर काही किवर्डसच्या साहाय्याने शोध सुरू केला असता प्रहार टाईम्स नावाच्या युट्यूबच्या चॅनेलवर व्हायरल व्हिडिओ मिळाला. व्हिडिओमध्ये ही अंत्ययात्रा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते जमील शेख यांची असल्याचे सांगितले आहे.

Conclusion

यावरुन हेच सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ कांग्रेस नेते अहमद पटेल यांच्या अंत्ययात्रेचा नसून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिवंगत नेते जमील शेख यांच्या अंत्ययात्रेचा आहे.

Result- Misleading

Our Sources

AAPKA PRAHAR TIMESAAPKA PRAHAR TIMES- https://www.youtube.com/watch?v=2ZE9t7fYTK4

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Most Popular