Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact CheckFact Check: 1 जुलैपासून सुधारित 10 रेल्वे नियम होणार लागू? नाही, खोटा...

Fact Check: 1 जुलैपासून सुधारित 10 रेल्वे नियम होणार लागू? नाही, खोटा जुना दावा पुन्हा व्हायरल

Authors

Pankaj Menon is a fact-checker based out of Delhi who enjoys ‘digital sleuthing’ and calling out misinformation. He has completed his MA in International Relations from Madras University and has worked with organisations like NDTV, Times Now and Deccan Chronicle online in the past.

Claim
भारतीय रेल्वेचे 10 नवीन नियम जे 01 जुलैपासून लागू होणार आहेत.
Fact
किमान 2015 पासून हा मेसेज इंटरनेटवर शेअर केला जात आहे. हा संदेश चुकीचा असल्याचे रेल्वे मंत्रालयाने यापूर्वी अनेकदा स्पष्ट केले आहे. त्यामुळे पोस्टमध्ये केलेला दावा खोटा आहे.

भारतीय रेल्वेने आपल्या 10 नियमात नवे बदल केले आहेत. हे नियम 01 जुलैपासून लागू होणार आहेत. असा दावा सध्या एका भल्यामोठ्या टेक्स्ट च्या माध्यमातून व्हाट्सअपवर केला जात आहे. अनेकजण हा व्हाट्सअप फॉरवर्ड शेअर करीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

Fact Check: 1 जुलैपासून सुधारित 10 रेल्वे नियम होणार लागू? नाही, खोटा जुना दावा पुन्हा व्हायरल

आम्हाला हा दावा फेसबुकवरही आढळला. ज्यामध्ये जनहितार्थ जारी असे सांगत नव्या सुधारित नियमांची माहिती देण्यात आली आहे.

Fact Check: 1 जुलैपासून सुधारित 10 रेल्वे नियम होणार लागू? नाही, खोटा जुना दावा पुन्हा व्हायरल
Courtesy: Facebook/ विजय झा

मूळ हिंदी भाषेत असणाऱ्या या माहितीचे मराठी भाषांतर असे आहे. “1 जुलैपासून बदलले रेल्वेचे हे 10 नियम…., 1) प्रतीक्षा यादीचा त्रास संपेल. रेल्वेने चालवल्या जाणाऱ्या सुविधा गाड्यांमध्ये प्रवाशांना कन्फर्म तिकिटांची सुविधा दिली जाईल., 2) 1 जुलैपासून तत्काळ तिकीट रद्द केल्यावर 50 टक्के रक्कम परत केली जाईल., 3) तत्काळ तिकीट नियम १ जुलैपासून बदलले आहेत. एसी कोचमध्ये सकाळी 10 ते 11, तर स्लीपर कोचमध्ये सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत तिकीट बुकिंग होईल., 4) राजधानी आणि शताब्दी ट्रेनमध्ये १ जुलैपासून पेपरलेस तिकीट सुविधा सुरू होत आहे. या सुविधेनंतर शताब्दी आणि राजधानी ट्रेनमध्ये कागदी तिकिटे मिळणार नाहीत, त्याऐवजी तुमच्या मोबाईलवर तिकीट पाठवले जातील., 5) लवकरच विविध भाषांमधील रेल्वे तिकीटांची सुविधा सुरू होणार आहे. आतापर्यंत रेल्वेत हिंदी आणि इंग्रजी भाषेत तिकिटे उपलब्ध होती, मात्र नवीन वेबसाइटनंतर आता वेगवेगळ्या भाषांमध्ये तिकिटे बुक करता येणार आहेत.,6) रेल्वेत तिकिटांसाठी नेहमीच चढाओढ असते. अशा परिस्थितीत १ जुलैपासून शताब्दी आणि राजधानी गाड्यांच्या डब्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे., 7) गर्दीच्या वेळी चांगली रेल्वे सेवा देण्यासाठी पर्यायी ट्रेन समायोजन प्रणाली, सुविधा ट्रेन आणि महत्त्वाच्या गाड्यांची डुप्लिकेट ट्रेन चालवण्याची योजना आखण्यात आली आहे., 8) रेल्वे मंत्रालय १ जुलैपासून राजधानी, शताब्दी, दुरांतो आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या धर्तीवर सुविधा ट्रेन चालवणार आहे., 9) रेल्वे १ जुलैपासून प्रीमियम ट्रेन्स पूर्णपणे बंद करणार आहे., 10) सुविधा गाड्यांमधील तिकिटाच्या परताव्यावर, भाड्याच्या ५०% परतावा दिला जाईल. याशिवाय AC-2 वर 100/- रुपये, AC-3 वर 90 रुपये, स्लीपरवर प्रति प्रवासी 60 रुपये वजा केले जातील. जनहितार्थ जारी केला आहे”

Fact check/ Verification 

भारतीय रेल्वेने घेतलेला निर्णय आणि सुधारित नियमांसंदर्भात आम्ही किवर्ड सर्च च्या माध्यमातून शोध घेतला. मात्र आम्हाला कोणतीच अधिकृत माहिती मिळाली नाही. दरम्यान आम्ही व्हायरल मेसेज सोशल माध्यमांवर शोधला असता, फेसबुकवर हाच दावा 2015 पासून केला जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

Fact Check: 1 जुलैपासून सुधारित 10 रेल्वे नियम होणार लागू? नाही, खोटा जुना दावा पुन्हा व्हायरल
Courtesy: Facebook/Crime Cap News

यावरून आम्हाला हा मेसेज जुना असल्याचे निदर्शनास आले. त्या अनुषंगाने तपास करताना जून 2016 मध्ये काही माध्यमांनीही या मेसेज संदर्भात बातम्या प्रसिद्ध करून रेल्वेने आपल्या नियमात बदल केला असल्याचे लिहिले असल्याचे दिसून आले. झी न्यूज ने 22 जून 2016 रोजी हे वृत्त प्रसिद्ध केले होते. मात्र त्यानंतर लगेचच ही बातमी चुकीचे असल्याचे अधिकृत माध्यमांनी सांगितले आहे. एनडीटीव्ही ने 24 जून 2016 रोजी प्रसिद्ध केलेल्या बातमीत व्हायरल मेसेज चे खंडन करण्यात आले आहे.

Fact Check: 1 जुलैपासून सुधारित 10 रेल्वे नियम होणार लागू? नाही, खोटा जुना दावा पुन्हा व्हायरल
Screengrab of NDTV

“ही बातमी पूर्णपणे चुकीची आणि निराधार आहे. प्रसारमाध्यमांच्या एका वर्गानेही भारतीय रेल्वे यंत्रणेच्या अधिकृत स्त्रोतांकडून त्याची खातरजमा न करता बातम्या प्रकाशित केल्या आहेत आणि त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.” असे एनडीटीव्ही च्या बातमीत म्हटले आहे.

पुन्हा, जून 2017 मध्ये, रेल्वे मंत्रालयाने व्हायरल संदेशावर तपशीलवार स्पष्टीकरण जारी केले, जे येथे वाचता येईल.

Fact Check: 1 जुलैपासून सुधारित 10 रेल्वे नियम होणार लागू? नाही, खोटा जुना दावा पुन्हा व्हायरल
Screengrab of pib.gov.in

एसी आणि नॉन-एसी श्रेणीतील तत्काळ तिकिटांच्या बुकिंगच्या सुधारित वेळा जून 2015 मध्येच अधिसूचित करण्यात आल्या होत्या. अधिकृत परिपत्रक येथे पाहता येईल.

Fact Check: 1 जुलैपासून सुधारित 10 रेल्वे नियम होणार लागू? नाही, खोटा जुना दावा पुन्हा व्हायरल
Screengrab of indianrailways.gov.in

Conclusion 

आमच्या तपासात फेसबुक आणि व्हॉट्सअपवर व्हायरल झालेल्या मेसेजने 1 जुलैपासून रेल्वेचे 10 नियम बदलल्याचा दावा चुकीचा असल्याचे सिद्ध झाले आहे. हा मेसेज यापूर्वीही व्हायरल झाला आहे आणि अजूनही होत आहे. मात्र, रेल्वेने सेवांमध्ये आणि नियमात कोणताही बदल लागू केलेला नाही.

Result: False

Our Sources
News published by NDTV on June 24, 2016
PIB Report posted on June 30, 2017
Circular by Indian Railway on June 10, 2015

कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

Most Popular