Thursday, March 28, 2024
Thursday, March 28, 2024

HomeFact Checkव्हायरल फोटोतील वृद्ध पोलिसांच्या मारहाणीत जखमी झालेला नाही, चुकीचा दावा व्हायरल

व्हायरल फोटोतील वृद्ध पोलिसांच्या मारहाणीत जखमी झालेला नाही, चुकीचा दावा व्हायरल

Authors

दिल्लीतील शेतकरी आंदोलनादरम्यान पोलिसांच्या मारहाणीत वृद्ध व्यक्ती जखमी झाल्याचा दावा करण्यात येत आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे का ज्याने पोलिसांवर तलवार उगारली त्याचे पोलिसांच्या मारहाणीत असे हाल झाले. दिल्लीत 26 जानेवारी रोजी शेतक-यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान दिल्ली पोलिस आणि शेतक-यांमध्ये संर्घष निर्माण झाला आणि या रॅलीला गालबोट लागले. दुस-या दिवसी पोलिसाला तलवार दाखवणा-या वृद्धाचा फोटो माध्यमांत व समाजमाध्यमात प्रसिद्ध झाला होता. यानंतर दोन दिवसांनी डोळ्यांवर आणि चेह-यावर जखमा असलेल्या वृद्धाचा फोटो व्हायरल झाला. हा तोच वृद्ध आहे ज्याने पोलिसांना तलवार दाखवली होती असा दावा व्हायरल होत आहे.

संग्रहित

संग्रहित

Fact Check / Verification

व्हायरल होत असलेले दोन्ही फोटो आम्ही गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोधले असता पहिला फोटो आम्हाला इंडियन एक्सप्रेसच्या वेबसाईटवर 26 जानेवारी रोजी प्रसिद्ध झाला असल्याचे आढळून आले.

यानंतर आम्ही दुसरा फोटो गूगल रिव्हर्स इमेजच्या साहायाने शोधला असता एका फेसबुक पोस्टमध्ये 27 डिसेंबर 2020 रोजी शेअर करण्यात आला असल्याचे आढळून आले. या फोटो सह आणखी दोन जखमी वृद्ध व्यक्तीचे व एका ट्रॅक्टर ट्रॅालीचा फोटो देखील आहे. पंजाबीमधील पोस्टमध्ये म्हटले आहे की, किर्ती किसान युनिट वडाळाचे शेतकरी दिल्लीतील शेतकरी आंदोलनासाठी जात असताना खन्नाजवळ अपघात झाला. कीर्ती किसान युनियनने या शेतकर्‍यांच्या संयमास अभिवादन केले व लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

https://www.facebook.com/kirtikisanunion/posts/182861136899377

संग्रहित

याशिवाय शिरोमणी अकाली दलाचे जनरल सेक्रेटरी विक्रमसिंग मजेठिया यांनी देखील फेसबुकवर 27 डिसेबर रोजीच ही पोस्ट शेअर केली आहे.

https://www.facebook.com/BikramSinghMajithia/posts/2133258380141427

याशिवाय आम्हाला फेसबुक पोस्टमध्ये शेअर करण्यात ट्राॅलीचा फोटो असलेली बातमी न्यूज 18 पंजाबीच्या वेबसाईटवर 28 डिसेंबर रोजी प्रकाशित झाल्याचे आढळून आले. पंजाबीतील बातमीचा आम्ही अनुवाद केला. यात म्हटले आहे की, दिल्लीत शेतकरी तीन कृषी कायद्याचा निषेध करत आहेत, पण दुसरीकडे लांब प्रवास आणि धुक्यामुळे शेतकरीही अपघातांना बळी पडत आहेत. कीर्ती किसान युनियनच्या वडाळा खेड्यातील शेतकर-याचा ट्रॅक्टर, दिल्ली ‘किसान आंदोलन’ मध्ये सामील होणार होता त्याचा खन्नाजवळ अपघात झाला.

https://punjab.news18.com/news/punjab/accident-near-khanna-of-farmers-going-to-join-kisan-andolan-delhi-186237.html

Conclusion

यावरुन हेच स्पष्ट होते की, व्हायरल फोटोतील वृद्ध पोलिसांच्या मारहाणीमुळे नाही तर ट्रॅक्टर ट्रॅाली अपघातात जखमी झालेला आहे.

Result – Misleading

Our Sources

न्यूज 18 पंजाबी- https://punjab.news18.com/news/punjab/accident-near-khanna-of-farmers-going-to-join-kisan-andolan-delhi-186237.html

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular