Tuesday, November 19, 2024
Tuesday, November 19, 2024

HomeFact CheckFact Check: दिल्लीच्या यमुना बाजारमध्ये असलेल्या 'राम कचोरी' दुकानाचा मालक मुस्लिम नाही,...

Fact Check: दिल्लीच्या यमुना बाजारमध्ये असलेल्या ‘राम कचोरी’ दुकानाचा मालक मुस्लिम नाही, वादाचा जुना व्हिडिओ बनावट दाव्यासह होतोय व्हायरल

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
दिल्लीत असलेल्या ‘राम कचोरी’ दुकानाचा मालक मुस्लिम आहे.
Fact
हा दावा खोटा आहे. ‘राम कचोरी’ दुकानाचा मालक मुस्लिम नसून हिंदू आहे.

कावड यात्रेदरम्यान वाटेत येणाऱ्या दुकानांवर मालकांची नावे लिहिण्याचे आदेश नुकतेच उत्तर प्रदेश सरकारकडून देण्यात आले होते. कावड यात्रेकरूंचा आदर आणि कायदा आणि सुव्यवस्था लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे सरकारने म्हटले आहे. मात्र, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या आदेशाला अंतरिम स्थगिती दिली आहे. दरम्यान, दिल्लीतील ‘राम कचोरी’ दुकानाचा मालक मुस्लिम असल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या 2:13 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये ‘राम कचोरी’ नावाच्या दुकानासमोर भगवे झेंडे घेऊन जनसमुदाय आंदोलन करत असल्याचे दिसत आहे. याशिवाय पोलिसही दुकान आणि गर्दीच्या मध्ये उभे असल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये, जमावाच्या निषेधादरम्यान, “श्री रामाचे नाव दुकानातून काढून टाकले पाहिजे!” असा आवाज ऐकायला मिळतोय.

पोस्ट (संग्रहण) सोबत असलेल्या मथळ्यामध्ये असे लिहिले आहे, “फिर से धोखा हो गया। यह है दिल्ली में राम कचौड़ी वाला… जब लोगों ने तहकीकात की तो यह निकले मुस्लिम खान… कैसे यह लोग भगवान राम के नाम पर दुकान का नाम रख कर हिंदुओ को बेवकूफ़ बना रहें है?? भगवान राम से नफ़रत करने वाले यह लोग हिंदुओ के देवी देवताओं को काफिर बताने वाले यह भगवान राम का नाम इस्तेमाल करके सिर्फ़ और सिर्फ़ हिंदुओ की आस्था से खिलवाड़ करते हैं???”

Fact Check: दिल्लीच्या यमुना बाजारमध्ये असलेल्या 'राम कचोरी' दुकानाचा मालक मुस्लिम नाही, वादाचा जुना व्हिडिओ बनावट दाव्यासह होतोय व्हायरल
Courtesy: X/@rajasolank71070
Fact Check: दिल्लीच्या यमुना बाजारमध्ये असलेल्या 'राम कचोरी' दुकानाचा मालक मुस्लिम नाही, वादाचा जुना व्हिडिओ बनावट दाव्यासह होतोय व्हायरल

Fact Check/ Verification

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये दुकानाचा पत्ता हनुमान मंदिर कॉम्प्लेक्स, यमुना बाजार, दिल्ली असा उल्लेख करण्यात आला आहे. तपासाच्या सुरुवातीला, आम्ही Google Earth वर दिलेला पत्ता शोधला आणि या पत्त्यावर व्हिडिओमध्ये दिसणारे दुकान सापडले. त्यावरून हे प्रकरण दिल्लीतील यमुना बाजारातील हनुमान मंदिराजवळील ‘राम कचोरी’ दुकानाशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले.

आता आम्ही व्हिडिओच्या मुख्य फ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च केले. यादरम्यान, हा व्हिडिओ मार्च 2023 च्या सोशल मीडिया पोस्टमध्ये दिसला. कॅप्शनमध्ये हा वाद मंदिराच्या आवारात दुकानात मांसाहार ऑर्डर करण्यावरून असल्याचे म्हटले आहे. या व्हिडीओसोबत केलेल्या आणखी एका पोस्टमध्ये दिल्लीतील मरघट येथील हनुमान मंदिराजवळील दुकान असे वर्णन करण्यात आले आहे.

Fact Check: दिल्लीच्या यमुना बाजारमध्ये असलेल्या 'राम कचोरी' दुकानाचा मालक मुस्लिम नाही, वादाचा जुना व्हिडिओ बनावट दाव्यासह होतोय व्हायरल

पुढे तपासात, आम्ही संबंधित कीवर्ड शोधले, ज्याचा परिणाम म्हणून हे स्पष्ट झाले की व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारे प्रकरण अलीकडील नसून जुने आहे. या प्रकरणावर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, 01 मार्च 2023 रोजी ‘राम कचोरी’ दुकानाच्या मालकाचा मुलगा अभिषेक शर्मा याने स्विगीवरून मटण कोरमा ऑर्डर केला होता. त्यानंतर स्विगीची डिलिव्हरी करणाऱ्या सचिन पांचाळने मंदिराजवळ असलेल्या दुकानात मटण कोरमाची ऑर्डर देण्यास नकार दिला. त्यानंतर मंदिराजवळ असलेल्या ‘राम कचोरी’ दुकानात मांसाहार ऑर्डर करण्यावरून वाद झाला. व्हायरल झालेला व्हिडिओ त्या वादाचा आहे.

Fact Check: दिल्लीच्या यमुना बाजारमध्ये असलेल्या 'राम कचोरी' दुकानाचा मालक मुस्लिम नाही, वादाचा जुना व्हिडिओ बनावट दाव्यासह होतोय व्हायरल

पुढे तपासात आम्हाला आढळून आले की, हे प्रकरण वादग्रस्त ठरल्यानंतर ‘राम कचोरी’चे मालक पवन शर्मा यांनी या संपूर्ण प्रकरणावर मीडियाशी संवाद साधला होता. पवन शर्माच्या मुलाखतीच्या या व्हिडिओमध्ये व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये दिसणारे दुकानही स्पष्ट दिसत आहे.

Fact Check: दिल्लीच्या यमुना बाजारमध्ये असलेल्या 'राम कचोरी' दुकानाचा मालक मुस्लिम नाही, वादाचा जुना व्हिडिओ बनावट दाव्यासह होतोय व्हायरल

मुलाखतीदरम्यान, 9:30 मिनिटांनी, दुकान मालक सांगतो की तो सनातनी हिंदू आहे. याबाबत आम्ही दुकान मालकाशीही बोलण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे उत्तर आल्यावर लेख अपडेट केला जाईल.

Conclusion

हा व्हायरल दावा खोटा असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. दिल्लीच्या यमुना बाजारातील मारघाट हनुमान मंदिराजवळ असलेल्या ‘राम कचोरी’ दुकानाचा मालक मुस्लिम नसून हिंदू आहे.

Result: False

Sources
Report published by Dainik Jagran on 9th March 2023.
Report published by News 18 on 9th March 2023.
Video shared by Delhi Update News on 3rd March 2023.

(हे आर्टिकल न्यूजचेकर हिंदीसाठी सर्वप्रथम कोमल सिंग यांनी केले असून, ते इथे वाचता येईल.)

कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Most Popular