Authors
Claim
शिवसेनेच्या (UBT) रॅलीत पाकिस्तानचा झेंडा फडकवण्यात आला.
Fact
व्हायरल दावा खोटा आहे. संबंधित झेंडा पाकिस्तानचा नसून इस्लामिक झेंडा आहे.
शिवसेनेच्या (UBT) रॅलीत पाकिस्तानचा झेंडा फडकवला असे सांगणारा दावा सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे.
दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.
आम्हाला हा दावा इंग्रजी भाषेतही आढळला. ज्यामध्ये स्पष्टपणे म्हणण्यात आले आहे की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या चेंबूर, मुंबई येथील रॅलीत पाकिस्तानचा ध्वज फडकाविण्यात आला.
Fact Check/ Verification
दाव्यांमध्ये असे म्हटले आहे की ही शिवसेनेचे (UBT) मुंबई दक्षिण मध्यचे उमेदवार अनिल देसाई यांची चेंबूरमधील रॅली होती. त्यानंतर आम्ही एक संबंधित कीवर्ड शोध चालवला ज्यामुळे आम्हाला देसाई यांच्या इंस्टाग्राम पोस्ट्सवर नेले ते येथे आणि येथे पाहता येतील.
यावरून 20 मे 2024 च्या निवडणुकीपूर्वी 14 मे 2024 रोजी चेंबूरमध्ये रोड शो झाल्याची पुष्टी आम्हाला मिळाली. यावरून आणि व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारे उड्डाणपूल, होर्डिंग्ज याचा अंदाज घेत, आम्हाला Google MAP वर रॅलीचे स्थान देखील सापडले.
त्यानंतर न्यूजचेकरने “शिवसेना पाकिस्तानी ध्वज अनिल देसाई रॅली” साठी कीवर्ड शोध घेतला, ज्यामुळे आम्हाला रोड शो दरम्यान अशा घटनेबद्दल कोणत्याही विश्वासार्ह बातम्या मिळाल्या नाहीत.
आमच्या लक्षात आले की व्हायरल व्हिडिओमधील ध्वजावर पाकिस्तानच्या ध्वजावर असणारी वेगळी पांढरी पट्टी नाही. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या ध्वजात पांढरा चंद्रकोर आणि मध्यभागी तारा आहे, त्याच्याभोवती लहान पांढऱ्या ताऱ्यांनी वेढलेले आहे, ईदच्या मिरवणुकीदरम्यान वापरल्या जाणाऱ्या इस्लामिक ध्वजांसारखेच आहे.
Conclusion
अशाप्रकारे आमच्या तपासात स्प्ष्ट झाले की, शिवसेनेच्या (UBT) रॅलीत पाकिस्तानचा झेंडा फडकवण्यात आला हा व्हायरल दावा खोटा आहे. संबंधित झेंडा पाकिस्तानचा नसून इस्लामिक झेंडा आहे.
Result: False
Our Sources
Google Search
Image analysis
Google Maps
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सअप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in