Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
विमानात भांडणाऱ्या प्रवाशांचा व्हिडीओ.

“महाराष्ट्रातील लोककला नळावरुन थेट विमानात..!!” अशा कॅप्शनखाली हा दावा केला जात असून युजर्सनी आमच्या व्हाट्सअप टिपलाइन (+91-9999499044) वर हा दावा पाठवून सत्यता तपासण्याची विनंती केली आहे.

गुगलवर “प्रवासी”, “भांडण” असे कीवर्ड सर्च केले असता कथित घटनेबद्दल कोणतेही विश्वसनीय रिपोर्ट मिळाले नाहीत.
त्यानंतर आम्ही व्हायरल क्लिपच्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च केले ज्यामुळे आम्हाला फ्लाय-हाय इन्स्टिट्यूट (@flyhighinstitutenagpur) द्वारे केलेली १६ जून २०२५ रोजीची इंस्टाग्राम पोस्ट मिळाली.
व्हायरल क्लिप घेऊन, त्यात म्हटले होते की, “विमानात एक जादूगार हवेत कबुतराचे जादूटोणा करून आपले कौशल्य दाखवण्याचा निर्णय घेतो… जवळ बसलेली एक महिला अचानक पक्षी दिसल्याने चिडते. ती जादूगाराला भेटते, ज्यामुळे दोघांमध्ये जोरदार वादविवाद होतो… क्रूच्या वेळेवर हस्तक्षेपामुळे तणाव कमी होण्यास मदत होते आणि विमान शांत वातावरणात परत येते.”

आम्हाला त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर अनुक्रमे १३ जून आणि १५ जून रोजी अपलोड केलेल्या व्हायरल क्लिपचा भाग १ आणि २ देखील सापडला. पोस्टमध्ये नमूद केल्याप्रमाणे, “जादूगाराच्या ट्रीक”वरून कथित भांडण झाल्याचे स्पष्टपणे दाखवले आहे.
पुढे, आम्हाला आढळले की @rutu_ramteke_18 हा युजर संस्थेने पोस्ट केलेल्या व्हिडिओंमध्ये देखील टॅग केलेला होता. आम्ही इंस्टाग्रामवर प्रोफाइल शोधले आणि ते नागपूरस्थित कंटेंट क्रिएटर रुतु रामटेके यांचे असल्याचे आढळले.

संस्थेच्या प्रोफाइलमध्ये असे अनेक व्हिडिओ होते ज्यात केबिन क्रू अनियंत्रित प्रवाशांशी सामना करताना दिसत होते.
त्यानंतर न्यूजचेकरने फ्लाय हाय इन्स्टिट्यूटशी संपर्क साधला, ज्याने स्पष्ट केले की हे व्हिडिओ त्यांच्या विद्यार्थ्यांना विमानात अशा परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी तयार केले गेले होते, ज्यामुळे हे फुटेज प्रत्यक्ष घटनेचे चित्रण करत नाही याची पुष्टी होते.
यावरून आम्हाला असे आढळून आले आहे की विमानात प्रवाशांमध्ये भांडण झाल्याचा दावा करणाऱ्या व्हायरल पोस्ट खोट्या आहेत.
हाच व्हिडीओ प्रवासात ११ ए सीटवरून भांडण होत असल्याचा दावा करीत व्हायरल झाला असून न्यूजचेकर इंग्रजीने त्यावर केलेले फॅक्ट चेक येथे वाचता येईल.
Sources
Instagram Post By @flyhighinstitutenagpur, Dated June 16, 2025
Conversation With Fly High Institute’s Representative On June 24, 2025
(With inputs from Shaminder Singh of Newschecker Punjabi)