Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
बिहार निवडणुकीत भाजप-जेडीयूने दारुच्या बाटल्या वाटण्याची तयारी केली असल्याच्या दाव्याने एक दारुच्या बाटल्यांचा साठ्याचा एक फोटो असलेली पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. हिंदीत लिहिलेल्या या पोस्टचा आम्ही मराठीत अनुवाद केला यात म्हटले आहे की, “बिहारमध्ये, ही भाजप आणि जद (यू) यांनी केलेली आणखी एक मतदानाची तयारी आहे. लोकांनो लक्षात ठेवा, हे विष आणि विनाश दोन्ही आहे, आणि म्हणूनच आपण त्यापासून दूर राहिले पाहिजे.”
Fact Check/Verification
भाजप आणि जेडी (यू) ने खरंच मतदारांना वाटण्यासाठी दारुच्या बाटल्या आणल्या आहेत का? याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र माध्यमांत या संदर्भातील बातम्या आढळून आल्या नाहीत. यानंतर आम्ही रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध घेतला असता आम्हाला एका थाई वेबसाईटवर मागील वर्षी 22 सप्टेंबर 2019 रोजी प्रसिद्ध झालेल्या लेखात व्हायरल फोटो आढळून आला. या लेखाचा अनुवाद केला. यात म्हटले आहे की, 2019 मध्ये थायलंडच्या उबॉन रत्थानी प्रांतातील पूरग्रस्तांसाठी जानी नावाच्या व्यक्तीने दारूचे किट वाटले होते. कोणालाही मद्यपीचे मन समजत नाही. पूरा दरम्यान, ते अल्कोहोलशिवाय अडकले पाहिजेत. जॉनीला त्यांचे मन समजले आणि मद्यपान करणा-यांना जगण्याची किट दिली. या थाई भाषेत लिहिलेल्या लेखात जॉनीने दारूच्या बाटल्या आणि इतर मदत सामग्री लोकांना देतानाचा फोटो देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे.
यानंतर आम्ही अधिक शोध घेतला असता आम्हाला जाॅनीचे फेसबुक पेज आढळले यात ब-याच पोस्ट आढळून आल्या शोध सुरुच ठेवला असता त्याने 22 सप्टेंबर 2019 रोजी दारुच्या बाटल्यांच्या पॅकिंगचा फोटो शेअर केल्याची पोस्ट आढळून आली.
याशिवाय एका युट्यूब चॅनलवर 25 सप्टेंबर 2019 रोजी प्रसिद्ध झालेला व्हिडिओ देखील आढळून आला.
Conclusion
यावरुन हेच सिद्ध होते की, मागील वर्षी थायलंडमधी एका व्यक्तीने पुरादरम्यान लोकांना दारु व इतर सामग्री वाटली होती त्याचा हा फोटो आता बिहार निवडणुकीदरम्यान चुकीच्या दाव्याने व्हायरल झाला आहे.
Result: Misleading
Our Source
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.
Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.