Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
हातपाय आणि तोंड बांधून रस्त्यावर पडलेली मुलगी बांगलादेशातील हिंदू महिलांची दुर्दशा दाखवते.
Fact
ढाका येथील एका विद्यापीठाच्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या निषेधाचा एक भाग म्हणून केलेल्या पथनाट्याच्या हा व्हिडिओ आहे.
शेख हसीना देश सोडून पळाल्यानंतर बांगलादेशातील हिंदू समुदायावर लक्ष्यित हल्ल्यांच्या बातम्यांदरम्यान, हिंदूंवर क्रूरता दर्शविल्याचा दावा करणारे अनेक व्हिज्युअल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहेत. बांगलादेशातील हिंदू महिलांची दुर्दशा असे सांगत हात-पाय आणि तोंड बांधलेल्या अवस्थेतील एका मुलीचा असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. न्यूजचेकरला मात्र हा व्हिडिओ ढाका येथील एका विद्यापीठातील विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या निषेधाचा भाग असल्याचे आढळले.
व्हेरीफाईड हँडलसह अनेक एक्स युजर्सनी बांगलादेशातील हिंदू महिलांचा छळ असे सांगत हा व्हिडिओ शेअर केला आहे. जवळपास 30-सेकंद-लांब-व्हिडिओ YouTube वर देखील पाहायला मिळाला.
अशा पोस्ट इथे, इथे, इथे आणि इथे पाहता येतील.
व्हायरल व्हिडिओचे काळजीपूर्वक विश्लेषण केल्यावर, आम्हाला पाठीमागे एक बस दिसली, ज्यावर बंगाली मजकूर लिहिलेला होता. आम्ही तो Google लेन्सवर पाहिला असता, ‘जगन्नाथ विद्यापीठात’ असे त्याचे भाषांतर वाचायला मिळाले.
पुढे, आमच्या लक्षात आले की अनेक X युजर्स हे निदर्शनास आणत आहेत की हा व्हिडिओ प्रत्यक्षात जगन्नाथ विद्यापीठाच्या विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्येच्या निषेधाचा आहे.
एक सुगावा घेऊन, आम्ही Google वर बंगालीमध्ये “जगन्नाथ युनिव्हर्सिटी,” “प्रोटेस्ट” आणि “स्टुडंट सुसाइड” हे कीवर्ड पाहिले, ज्यात 17 मार्च 2024 रोजी प्रकाशित Prothom Alo चा एक रिपोर्ट आम्हाला मिळाला.
जगन्नाथ विद्यापीठातील विद्यार्थिनी फैरुझ सदफ अवंतिका हिच्या आत्महत्येच्या निषेधार्थ जगन्नाथ विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी रविवारीही विविध निषेध कार्यक्रम आयोजित केले होते. आज संध्याकाळपासून, त्यांनी विद्यापीठ कॅम्पसमध्ये निषेध रॅली, मशाल मिरवणुकीसह विविध कार्यक्रम आयोजित केले (गुगलद्वारे बंगालीमधून अनुवादित),” असे रिपोर्टमध्ये नमूद केले आहे.
रिपोर्टमध्ये निषेधाचे चित्रीकरण समाविष्ट आहे. अशाच एका इमेजमध्ये आम्ही व्हायरल फुटेजमध्ये दिसणारी मुलगी पाहिली. “अवंतिकाच्या आत्महत्येच्या घटनेवर विद्यापीठाच्या थिएटर विभागाच्या विद्यार्थ्यांनी नाट्य सादर केले,” असे कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
संबंधित निषेधाचे तपशीलवार वर्णन करणारे असे आणि असे रिपोर्ट आम्हाला पाहायला मिळाले. विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या निषेधाचा एक भाग म्हणून व्हायरल व्हिडीओमधील तीच मुलगी नाट्य करताना दाखवणारे व्हिज्युअल देखील पाहायला मिळतात.
Channel 24 च्या व्हिडिओ रिपोर्टमध्ये युनिव्हर्सिटीच्या निषेधात सहभागी झालेल्या इतरांसह व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी मुलगी देखील दिसते आहे.
पुढील संशोधनावर आम्हाला 31 जुलै 2024 रोजी बांगलादेशी प्रकाशन, द न्यूजचा रिपोर्ट सापडला, ज्यात व्हिडिओमध्ये दिसणारी विद्यार्थिनी ‘तृष्णा’ म्हणून ओळखली गेली, “अवंतिका अपूच्या मृत्यूनंतर कँडल मार्च झालेल्या दिवशी झालेल्या पथनाट्याचे हे दृश्य आहे.”
आम्हाला 26, 2024 ची JnU शॉर्ट स्टोरीजची फेसबुक पोस्ट देखील आढळली, ज्यामध्ये तोच व्हिडिओ आहे. “मुलगी 2021-22 या शैक्षणिक वर्षात जगन्नाथ विद्यापीठाची नियमित विद्यार्थिनी आहे. हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी अवंतिकाच्या आत्महत्येचा निषेध म्हणून पथनाट्याचे दृश्य आहे!” असे पोस्टमध्ये म्हटले आहे.
न्यूजचेकरने व्हिडिओमध्ये दिसलेल्या मुलीच्या मित्राशी देखील संपर्क साधला, ज्याने आम्हाला माहिती दिली की ती हिंदू आहे, हा व्हिडिओ “बॅचमेट्सच्या असमाधानकारक वागणुकीमुळे आत्महत्या केलेल्या मुलीच्या निधनाबद्दल निषेध व्यक्त करताना झालेल्या पथनाट्याचा आहे.” अशी माहिती दिली.
अशाप्रकारे आमच्या तपासात, बांगलादेशातील हिंदू महिलांची सध्याची दुर्दशा असे सांगत विद्यापीठातील विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या निषेधाचा एक भाग म्हणून केलेल्या पथनाट्याच्या व्हिडिओ दिशाभूल करीत शेयर केला जात असल्याचे स्पष्ट झाले.
Sources
Report By Prothom Alo, Dated March 17, 2024
YouTube Video By Channel 24, Dated March 18, 2024
Report By The News, Dated July 31, 2024
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Salman
July 3, 2025
Kushel Madhusoodan
July 2, 2025
Vasudha Beri
July 1, 2025