पेट्रोल दरवाढीबाबत प्रश्न विचारल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठी माणसाला चूप बसविले असल्याची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. पंतप्रधान मोदी व्हिडिओ काॅन्सफरन्सदरम्यान हरिभाऊ नावाच्या व्यक्तीशी मराठीत बोलताना दिसत आहेत. पंतप्रधान त्या व्यक्तीला हरिभाऊ बोला काय म्हणता असे मराठीत विचारतात, त्यावर तो व्यक्ती उठून उभा राहतो आणि म्हणतो की, राम राम ते पेट्रोलचे भाव वाढले, यावर मोदी त्याला बसा बसा असे सांगत आहेत.
व्हायरल क्लिप पाहून काही सोशल मीडिया यूजर्स गमतीशीर कमेंट्स करत आहेत तर काहींनी संताप व्यक्त करत ही लोकशाही आहे की हुुकुमशाही आहे? असा प्रश्न देखील विचारत आहेत.



Fact Check / Verification
पेट्रोलदरवाढीसंदर्भांत प्रश्न विचारल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी माणसाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर न देताच खाली बसायला लावले का याचा शोध घेण्यास आम्ही सुरुवात केली. काही किवर्डसचा वापर केला असता आम्हाला मूळ व्हिडिओ आढळून आला. हा व्हिडिओ पंतप्रधान मोदी यांनी 29 मे 2018 रोजी जनतेशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता त्यावेळी नाशिकमधील हरीभाऊ नावाच्या व्यक्तिला पतंप्रधानांना प्रश्न विचारण्याची संधी देण्यात आली होती. हा व्हिडिओ पीएमओच्या युट्यब चॅनलवर अपलोड करण्यात आला आहे.
पीएमओ ने शेअर केलेला 1 मिनिट 53 सेकंदांचा मूळ व्हिडिओ पाहिल्यावर हे स्पष्ट होते की हरीभाऊ नामक व्यक्तीने मोदींना पेट्रोल दरवाढीविषयी प्रश्न विचारला नव्हता, तर मुद्रा कर्ज योजनेमुळे त्याला कसा फायदा झाला हे त्याने सांगितले होते. तो उठून बोल लागल्यामुळे मोदींनी त्याला बसण्यास सांगितले होते. हरीभाऊ ठाकूर नावाच्या या व्यक्तीने मोदींनी सांगितले की त्याची टपरी होती. मुद्रा योजनेची माहिती मिळवल्यावर त्याने कर्ज घेतले आणि व्यवसाय सुरू केला. त्यामुळे त्याची आर्थिक स्थिती सुधारली. बॅंकेचे हप्ते वेळेवर भरता का असा प्रश्न देखील पंतप्रधानांनी त्याला विचारला होता.
पंतप्रधानांशी व्हिडिओ काॅन्फरन्स द्वारे संवा साधण्याची संधी मिळाल्यानंतर हरिभाऊ ने आपल्या अनुभवाबद्दल माध्यमांना देखील प्रतिक्रिया दिली होती.
.
Conclusion
यावरुन हे स्पष्ट होते की, पंतप्रधानांचा मुद्रा लोन लाभार्थ्याशी संवादाचा व्हिडिओ एडिट करुन पेट्रोल दरवाढीसंदर्भात प्रश्न विचारल्याचा भासवण्यात आला आहे.
Result- Misleading
Our Sources
एबीपी माझा- https://www.youtube.com/watch?v=KixjW00lRyo
पीएमओ- https://www.youtube.com/watch?v=ekdgkomd5Ks
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.