Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
डॉ. भीमराव आंबेडकर यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या वकील अनिल मिश्रा यांच्या अटकेचा व्हिडिओ.
हा व्हिडिओ बिहारमधील दरभंगा येथील आहे, जिथे न्यायाधीशांच्या आदेशानुसार कोर्ट परिसरातून एका वकीलाला पोलीसांनी अटक केली होती.
डॉ. भीमराव आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या वकील अनिल मिश्रा यांना पोलीसांनी अटक केली आहे असे सांगत सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला जात आहे. व्हिडिओमध्ये काही पोलीस एका व्यक्तीला धरून नेताना दिसतात. पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “हरामखोर अनिल मिश्रा अटक….”
या पोस्टचा आर्काइव्ह येथे पाहता येतो. अशाच दाव्यांसह फेसबुकवरही हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अशा प्रकारच्या आणखी काही पोस्ट्स येथे, येथे आणि येथे पाहता येतात. अनिल मिश्रा यांच्या अटकेचा दावा करणारा हा व्हिडिओ X (ट्विटर) वरदेखील मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला आहे.

महत्त्वाचे म्हणजे, ग्वाल्हेर उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील अनिल मिश्रा यांनी डॉ. भीमराव आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त टिप्पणीमुळे त्यांच्याविरुद्ध ग्वाल्हेरमध्ये FIR दाखल करण्यात आली होती. यानंतर त्यांनी स्वतःहून अटक देण्यासाठी एसपी कार्यालय गाठले, परंतु पोलिसांनी त्यांना अटक केली नव्हती.
या घटनेनंतर राज्यातील अनेक राजकीय आणि सामाजिक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
काही संघटनांनी रस्त्यावर उतरून अनिल मिश्रा यांचा पुतळा जाळला.
अनिल मिश्रा यांच्या अटकेचा दावा करणाऱ्या व्हिडिओची पडताळणी करण्यासाठी त्याच्या कीफ्रेम्स Google Lens वर शोधण्यात आल्या. शोधादरम्यान Voice of Darbhanga या YouTube चॅनेलवर 20 जून 2025 रोजी अपलोड केलेला व्हिडिओ सापडला. या व्हिडिओच्या वर्णनात नमूद आहे की, हा व्हिडिओ बिहारमधील दरभंगा न्यायालय परिसरातील आहे, जिथे न्यायाधीशांच्या आदेशानुसार एका वकीलाला पोलीसांनी अटक केली होती.
व्हिडिओ नीट ऐकल्यावर लक्षात येते की, दरभंगा व्यवहार न्यायालयातील वकील अंबर इमाम हाशमी यांना पोलीसांनी कोर्ट परिसरातून अटक केली होती. खोटं बोलण्याच्या एका प्रकरणात एडीजेच्या आदेशानंतर ही अटक करण्यात आली होती. सुमारे चार मिनिटांच्या या व्हिडिओच्या 50व्या सेकंदानंतर व्हायरल व्हिडिओतील दृश्य दिसून येतात.
पडताळणीदरम्यान मिथिला टॉप न्यूज या YouTube चॅनेलवरदेखील 20 जून 2025 रोजी अपलोड केलेला व्हिडिओ सापडला. या व्हिडिओ शॉर्टमध्येही तोच प्रसंग स्पष्ट दिसतो.
अहवालानुसार, दरभंगा व्यवहार न्यायालयातील एडीजे-3 सुमन कुमार यांच्या आदेशानुसार
32 वर्ष जुन्या खुनाच्या प्रकरणात एका वकीलाला पोलीसांनी अटक केली होती.
त्याचप्रमाणे ABP न्यूज च्या YouTube चॅनेलवर 21 जून 2025 रोजी हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. या अहवालात सांगण्यात आलं आहे की, दरभंगा येथील स्थानिक न्यायालयात
कोर्टला खोटी माहिती दिल्याच्या कारणावरून एडीजे-3 च्या आदेशानंतर वरिष्ठ वकील अंबर इमाम हाशमी यांना पोलीसांनी अटक केली होती. अटक झालेले वकील 32 वर्ष जुन्या खुनाच्या प्रकरणातील आरोपी होते. या प्रकरणात त्यांनी एका फॉर्मद्वारे व्यस्ततेचे कारण देऊन
हजेरीतून सूट मागितली होती. परंतु त्याच न्यायालयात ते दुसऱ्या प्रकरणात उपस्थित राहिले. हे लक्षात घेतल्यानंतर न्यायालयाने त्यांना अटक करण्याचा आदेश दिला.
व्हायरल व्हिडिओबाबत अधिक माहितीसाठी आम्ही ग्वाल्हेर पोलिस ठाण्याचे प्रभारी मिर्झा आसिफ बेग यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं सांगितलं आणि सध्या वकील अनिल मिश्रा यांच्या अटकेबाबत कोणतीही कारवाई झालेली नसल्याचं स्पष्ट केलं.
आमच्या पडताळणीनुसार, सोशल मीडियावर फिरणारा “वकील अनिल मिश्रा यांना अटक” हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. व्हायरल व्हिडिओ बिहारमधील दरभंगा न्यायालय परिसरातील आहे, जिथे एका स्वतंत्र प्रकरणात न्यायाधीशांच्या आदेशानुसार एका वकीलाला पोलीसांनी अटक केली होती.
Sources
YouTube video published by Voice of Darbhanga on June 20, 2025
YouTube video published by @mithilatopnews on June 20, 2025
YouTube video published by ABP News on June 21, 2025
Telephonic conversation with SHO of Gwalior Police Station
Vasudha Beri
November 19, 2025
Runjay Kumar
November 17, 2025
Prasad S Prabhu
October 25, 2025