Thursday, June 8, 2023
Thursday, June 8, 2023

घरFact CheckPoliticsभाजप आणि शिंदेगट माझ्यासोबत गद्दारी करत आहे, हे विधान खरंच अब्दुल सत्तार...

भाजप आणि शिंदेगट माझ्यासोबत गद्दारी करत आहे, हे विधान खरंच अब्दुल सत्तार यांनी केलंय? चुकीचा दावा व्हायरल

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. त्यात असा दावा केलाय की, हे विधान नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे. 

सचिन सुमतीलालजी सांघवी या फेसबुक युजरने हा फोटो शेअर केला. त्यात लिहिलंय की,’माझ्या प्रखर हिंदुत्ववादी भूमिकेपुढे शिंदेगट आणि भाजपच हिंदुत्व तोकडं पडत आहे म्हणूनच माझ्या विरोधात कारस्थान रचल आहे. मी उद्धव ठाकरे यांच्या सोबत गद्दारी केली आणि भाजप, शिंदेगट माझ्यासोबत गद्दारी करत आहेत.’ फेसबुकवर हा फोटो युजर शेअर करत आहे.

फोटो साभार : Facebook/Sachin Sumatilalji Sanghavi
फोटो साभार : Facebook/Narendra Kolhe

ट्विटरवर देखील हा फोटो युजर शेअर करत आहे. 

या ट्विटची संग्रहित केलेली दुवा तुम्ही इथे वाचू शकता.

या ट्विटची संग्रहित केलेली दुवा तुम्ही इथे वाचू शकता.

९ ऑगस्ट २०२२ रोजी महाराष्ट्रातील शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यात अब्दुल सत्तार यांनी कॅबिनेट मंत्रिमंडळाची शपथ घेतली आहे. त्यातच आता सोशल मीडियावर एका फोटोद्वारे दावा केलाय की, भाजप आणि शिंदेगट माझ्यासोबत गद्दारी करत आहे, हे विधान अब्दुल सत्तार यांनी केलंय. 

Fact Check / Verification

भाजप आणि शिंदेगट माझ्यासोबत गद्दारी करण्याबाबतचे विधान खरंच अब्दुल सत्तार यांनी केलंय, याची पडताळणी करण्यासाठी आम्ही गुगलवर हे कीवर्ड टाकून शोधले. पण आम्हांला कोणतीही माहिती मिळाली नाही. तेव्हा आम्हांला व्हायरल फोटोशी मिळता-जुळता सरकारनामा यांचा फोटो मिळाला. त्यानंतर आम्ही सरकारनामा यांचे अधिकृत फेसबुक पान तपासले. त्यावेळी आम्हांला ८ ऑगस्ट २०२२ रोजीचा एक फोटो मिळाला. 

फोटो साभार : Facebook/Sarkarnama

नुकतेच राज्यात शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) घोटाळा झाल्याची गोष्ट समोर आली आहे. या गैरप्रकारात अडकलेल्या उमेदवारांची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहे. त्याचवेळी अब्दुल सत्तार यांच्या मुलांची नावे त्यात असल्याची चर्चा सुरू झाली. तेव्हा अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषदेत घेऊन सांगितले की,”मी तीन वेळा मंत्री राहिलो आहे. तर कसलं मंत्रिपद मी काय मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नाहीये, मी साधा आमदार आहे. माझा मुलगा टीईटी परीक्षेला बसला नाही. मग नाव कसं काय आलं, कागद लपवली असा अर्थ होत नाही. काल जी फेक यादी केली, त्याचा मी स्वीकार करू का?”

सरकारनामाने याच विधानाचा फोटो तयार केला. त्यानंतर आम्ही व्हायरल फोटो आणि मूळ फोटोची तुलना केली. तेव्हा आमच्या लक्षात आले की, फोटोच्या मागचा रंग, दुहेरी अवतरण चिन्ह आणि अब्दुल सत्तार यांचा फोटो, या तिन्ही गोष्टी सारख्याच आहे. त्याचबरोबर मूळ आणि व्हायरल फोटोतील फॉन्ट वेगळा असल्याचे लक्षात आले.

फोटो साभार : Facebook/Chhaya Thorat, Facebook/Sarkarnama

या व्यतिरिक्त न्यूजचेकरने सरकारनामाशी संपर्क साधला. तेव्हा सोशल मीडिया विभागाच्या प्रमुख समृद्धा भांबुरे यांनी सांगितले की,”व्हायरल होणाऱ्या फोटोत सरकारनामाचे टेम्प्लेट वापरले आहे. पण त्या फोटोतील फॉन्ट आणि आम्ही वापरत असलेला फॉन्ट वेगळा आहे.” 

त्याचबरोबर आम्ही नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी देखील व्हायरल फोटोविषयी हेच सांगितले की,”हे विधान मी केलेले नाही.” 

Conclusion

अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, शेअर केल्या जाणाऱ्या व्हायरल फोटोतील अब्दुल सत्तार यांचे विधान एडिट केले आहे. अब्दुल सत्तार यांनी हे विधान केलेले नाही.

Result : Altered Photo/Video

Our Sources

८ ऑगस्ट २०२२ रोजीचा सरकारनामा यांचा मूळ फोटो

फोनवरून सरकारनामा येथील सोशल मीडिया विभागाच्या प्रमुख समृद्धा भांबुरे यांच्याशी झालेला संवाद

फोनवरून नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी झालेला संवाद

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular