Friday, November 22, 2024
Friday, November 22, 2024

HomeFact CheckPoliticsमुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेनाच हवी, हे विधान खरंच दीपक केसरकर यांनी केलंय? भ्रामक...

मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेनाच हवी, हे विधान खरंच दीपक केसरकर यांनी केलंय? भ्रामक दावा व्हायरल

सोशल मीडियावर दीपक केसरकर यांच्या विधानाचा फोटो शेअर केला जात आहे. ‘उद्धव ठाकरेंसोबत जरी राजकीय मतभेद असले तरी मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेनाच हवी’ हे विधान दीपक केसरकर यांनी केल्याचा दावा त्या फोटोद्वारे केला जात आहे.

भाजप एक अंधभक्तांचे फेकू सरकार या नावाच्या फेसबुक समूहात विजय पाटील या युजरने हा फोटो शेअर केला आहे. “उद्धव ठाकरेंसोबत जरी राजकीय मतभेद असले तरी मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेनाच हवी” हे विधान शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केल्याचा दावा केला जात आहे. फेसबुकवर हा फोटो शेअर केला जात आहे. 

फोटो साभार : Facebook/group/भाजप एक अंधभक्तांचे सरकार

Fact Check/Verification

‘उद्धव ठाकरेंसोबत जरी राजकीय मतभेद असले तरी मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेनाच हवी’ हे विधान खरंच दीपक केसरकर यांनी केलंय, याची पडताळणी आम्ही हे गुगलवर टाकून शोधले. पण आम्हांला यात कोणतीही माहिती मिळाली नाही. 

त्यानंतर आम्हांला २४ ऑगस्ट २०२२ रोजी लोकमतच्या अधिकृत फेसबुक पानावर एक फोटो मिळाला. हा फोटो व्हायरल फोटोशी मिळता-जुळता होता. नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान विरोधकांनी पायऱ्यांवर उभे राहून घोषणाबाजी केली. ‘खाऊन खाऊन पन्नास खोके, माजलेत बोके माजलेत बोके..’ अशा घोषणा देत विरोधकांनी शिंदे गटाला टोला लगावला. यावर ‘५० खोके काय ५० रुपये जरी घेतले असतील तर राजीनामा देईल,’ असं उत्तर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिलं.

फोटो साभार : Lokmat

दीपक केसरकरांच्या याच विधानाचा फोटो लोकमतने तयार केला. त्यानंतर आम्ही दोन्ही फोटोंची तुलना केली. फोटोचे टेम्प्लेट, केसरकरांचा फोटो, त्यांचे नाव व त्यावरील दुहेरी अवतरण चिन्ह या दोन्ही गोष्टी सारख्याच असल्याचे दिसले. आम्हांला दोन्ही फोटोत केसरकरांच्या विधानाचा फॉन्ट वेगळा असल्याचे समजले.

फोटो साभार : Facebook/Nitin Mali, Facebook/Lokmat

या व्यतिरिक्त आम्ही दीपक केसरकरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण आमचा संपर्क होऊ शकला नाही. जर आमचा संपर्क झाला तर लेख अपडेट करू.

Conclusion

अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, शेअर केल्या जाणाऱ्या फोटोत दीपक केसरकरांचे विधान एडिट केले आहे. 

Result : Altered Photo/Video

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular