Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
सोशल मीडियात दोन व्हिडिओ व्हायरल होत आहेत दावा करण्यात येत आहे की, राकेश टिकेत यांच्या नेतृत्वात हे व्हिडिओ शेतकरी आंदोलनात दारु वाटप केल्याचा आहे. हे आंदोलन शेतकरी नेते राकेश टिकेत यांच्या नेतृत्वाखाली सुरु असल्याचे म्हटले आहे. यातील पहिल्या व्हिडिओत काही लोक बाटल्यातील दारु एका ड्रमध्ये ओतताना दिसत आहेत दुस-या व्हिडिओत ही दारु लोकांना वाटली जात असल्याचे व लोकांची दारुसाठी झुंबड उडाल्याचे पहायला मिळते.
पोस्टमध्ये म्हटले आहे की, हे टिकैत यांचे आंदोलन आहे. तुम्ही तिथे काही करा फक्त गरिब शेतकऱ्याला फसवू नका…
Fact Check/Verification
जेव्हा आम्ही शेतकरी आंदोलनात दारु वाटप या किवर्डने सर्च केले, तेव्हा आम्हाला मुक्त पत्रकार संदीप सिंग यांचे एक ट्विट आढळून आले.यात त्यांनी म्हटले आहे की बीेजेपी सपोर्टस दारु वाटप केल्याची फेक न्यूज पसरवत आहेत. हा व्हिडिओ शेतकरी आंदोलनात दारु वाटप केली जात असल्याच्या चुकीच्या दाव्याने शेअर केला जात आहे. खरं तर हा व्हिडिओ पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील KAUNKE Kalan गावातील आहे. बाबा रोडू शहा दर्ग्यात दारुचे वाटप केले केले होते. ही पंरपरा 60 वर्षांपासून सुरु आहे.
याबाबत आम्हाला एक व्हिडिओ देखील आढळून आला. यात स्थानिक लोकांच्या प्रतिक्रिया देखील घेण्यात आल्या आहेत. यात दारु लंगर चे स्थान देखील दाखवण्यात आले आहे. शिवाय फक्त दारू नाही तर इतर खाद्यपदार्थ देखील लंगर मध्ये होते अशी माहिती देताना गावकरी देत आहेत.
आम्हाला जनशक्ती न्यूज पंजाबचा एक फेसबुक व्हिडीओ देखील मिळाला ज्यामध्ये असे म्हटले आहे की, बाबा रोड शाह लंगरमध्ये दारु वाटपाचा व्हिडिओ शेतकरी आंदोलनात दारू वाटप केल्याच्या दाव्याने शेअर केला जात आहे.
आम्हाला असेही आढळले आहे की त्याच व्हिडिओमधील पंडालचे फुटेज जर्नल सिंह नावाच्या ग्राहकाने फेसबुकवर बाबा रोडू जी मेले या नावाने शेअर केले होते.
दोन दृश्यांमध्ये दिसणारा मंडप फेसबुकवर शेअर केलेल्या ‘कारशाका समरम’ नावाच्या व्हिडिओमध्येही दिसला.
जर्नल सिंह यांनी फेसबुकवर आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात बाबा रोड शाह मेळाव्यात या मंडपात दारु वाटप केले जात असल्याचे पहायला मिळते.
बाबा रोड शाह दर्ग्यावर दारू पिण्याचा सोहळा फार पूर्वीपासून आहे. 2012 मध्ये हिंदुस्तान टाईम्सने बाबांच्या याबाबत बातमी देखील दिली होती.
Conclusion
आमच्या पडताळणीत आढळले की, व्हायरल व्हिडिओ शेतकरी आंदोलनात दारु वाटप केल्याचा नाही तर हा व्हिडिओ पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील KAUNKE Kalan गावातील बाबा रोडू शहा दर्ग्यात दारु वाटप केले जात असल्याचा आहे..
Result: Misplaced Context
Sources
Facebook:Jan Shakti News Punjab
Twitter: Sandeep Singh
Youtube:Sandeep Singh
Facebook: Jarnail Singh
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा
Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.