Authors
काही संकेतस्थळाने बातमी दिली आहे की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे आज पुण्यात निधन झाले. वेब दुनिया मराठी आणि द भोंगा यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे आज पुण्यात निधन झाल्याची बातमी दिली.
फेसबुकवर पीसीएमसी तहलका यांनी देखील बातमी दिली की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे आज पुण्यात निधन झाले.
Fact Check / Verification
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे खरंच आज पुण्यात निधन झाले, याची तथ्य पडताळणी करण्यासाठी आम्ही गुगलवर ‘महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन’ असं टाकून शोधले.
त्यावेळी आम्हांला २०२० मधील काही बातम्या मिळाल्या. महाराष्ट्र टाइम्स यांच्या बातमीनुसार, ५ ऑगस्ट २०२० रोजी किडनी विकाराने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे ९१ व्या वर्षी निधन झाले. २०२० मध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली होती, पण त्यावर त्यांनी मात केली होती. त्याच दिवशी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना पुण्यातील रुबी क्लिनिकमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. पहाटे २ वाजून १५ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे महाराष्ट्राचे दहावे मुख्यमंत्री होते. तसेच ते १९८५-८६ मध्ये देखील ते मुख्यमंत्री होते. १९९०-९१ मध्ये त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद त्यांनी भूषवले होते.
त्याचबरोबर आम्हांला ५ ऑगस्ट २०२० रोजीच्या ई सकाळ, झी न्यूज आणि टीव्ही ९ मराठी यांच्या देखील बातम्या मिळाल्या. या व्यतिरिक्त पीएमओ इंडिया या अधिकृत ट्विटर खात्याचे ५ ऑगस्ट २०२० रोजी शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनाचे ट्विट आम्हांला मिळाले.
(या ट्विटची संग्रहित केलेली दुवा तुम्ही इथे पाहू शकता)
Conclusion
अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन दोन वर्षांपूर्वी ५ ऑगस्ट २०२० रोजी झाले आहे.
Result : Partly False
Our Sources
५ ऑगस्ट २०२० रोजी महाराष्ट्र टाइम्सची प्रकाशित झालेली बातमी
५ ऑगस्ट २०२० रोजी ई सकाळ, झी न्यूज आणि टीव्ही ९ मराठी यांच्या प्रकाशित झालेल्या बातम्या
५ ऑगस्ट २०२० रोजी पीएमओ इंडियाने केलेले ट्विट
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.