Friday, March 29, 2024
Friday, March 29, 2024

HomeFact CheckPoliticsसंभाजीराजे छत्रपती यांच्या नावाने व्हायरल झालेला लोकमतचा फोटो खरा आहे? याचे सत्य...

संभाजीराजे छत्रपती यांच्या नावाने व्हायरल झालेला लोकमतचा फोटो खरा आहे? याचे सत्य जाणून घ्या

सोशल मीडियावर संभाजीराजे छत्रपती यांच्या नावाने लोकमतचा एक फोटो खूप व्हायरल होत आहे. ‘उमेदवारी देऊ असे देवेंद्र फडणवीस यांनी मला अगोदरच सांगितलं होतं, भाजपने माझ्यासोबत गद्दारी केली’, असं विधान संभाजीराजे छत्रपती यांनी केलं. असा त्यात दावा केला जात आहे.

हा फोटो फेसबुकवर अनेकांनी शेअर केला आहे. त्या पोस्ट खाली जोडत आहे.

फोटो साभार : Facebook/अशोक माने शिवसेना
फोटो साभार : Facebook/Uday Navlakhe
फोटो साभार : Facebook/Vinod Ingle

गेल्या काही दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवण्याचे ठरवले. मी कोणत्याही पक्षात थेट प्रवेश करणार नाही, असं त्यांनी सांगितले. त्याचबरोबर त्यांनी ‘स्वराज्य’ या संघटनेची स्थापना केली.

यातच आता सोशल मीडियावर संभाजीराजे छत्रपती यांच्या नावाने लोकमतचा फोटो शेअर करत त्यात ‘उमेदवारी देऊ असे देवेंद्र फडणवीस यांनी मला अगोदरच सांगितलं होतं, भाजपने माझ्यासोबत गद्दारी केली,’ असं विधान संभाजीराजे छत्रपती यांनी केलं. असा दावा केला जात आहे.

Fact Check / Verification

संभाजीराजे छत्रपती यांच्या नावाने लोकमतचा फोटो शेअर केला जात आहे, याची पडताळणी करण्यासाठी आम्ही तो फोटो गुगल रिव्हर्सच्या साहाय्याने शोधण्याचा प्रयत्न केला. पण आम्हांला कोणतीही माहिती मिळाली नाही.

त्यानंतर आम्ही लोकमतच्या अधिकृत फेसबुक पानावरील फोटो तपासले. तेव्हा आम्हांला त्यात २४ मे २०२२ रोजी संभाजीराजे छत्रपती यांचा व्हायरल झालेल्या फोटोशी मिळता-जुळता एक फोटो मिळाला.

फोटो साभार : Lokmat

मग आम्ही व्हायरल झालेल्या फोटोची आणि मूळ फोटोची तुलना केली. त्यात विधान वगळता लोकमत हे नाव, संभाजीराजे छत्रपती यांचा फोटो, आणि त्यांचे नाव हे एकसारखेच असल्याचे समजले.

फोटो साभार : Marathi Porga / मराठी पोरगा, Lokmat

याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही संभाजीराजे छत्रपती यांचे ‘खासदारकीसाठी अगतिक नाही; अपक्ष म्हणूनच राज्यसभा लढवणार’ हे विधान गुगलवर टाकून शोधले. तेव्हा आम्हांला लोकमतची २४ मे २०२२ रोजीची एक बातमी मिळाली. मूळ फोटोतील संभाजीराजे छत्रपती यांचे विधान आणि या बातमीचे शीर्षक एकच आहे.

फोटो साभार : Lokmat

यावरून हे स्पष्ट होते की, ‘उमेदवारी देऊ असे देवेंद्र फडणवीस यांनी मला अगोदरच सांगितलं होतं, भाजपने माझ्यासोबत गद्दारी केली’ हे विधान संभाजीराजे छत्रपती यांनी केलेले नाही. या व्यतिरिक्त न्यूजचेकरने संभाजीराजे छत्रपती यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण आमचा संपर्क होऊ शकला नाही. जर आमचा संपर्क झाला तर लेख अपडेट करू.

Conclusion

अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, संभाजीराजे छत्रपती यांच्या नावाने लोकमतचा शेअर केला जाणारा फोटो एडिट केलेला आहे. मुळात संभाजीराजे छत्रपती यांनी ते विधानच केलेले नाही.

Result : Manipulated Media/Altered Photo/Video

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular