Authors
सोशल मीडियावर बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे ‘नीतीश सबके हैं’ या पोस्टरचा फोटो व्हायरल झाला आहे. महाराष्ट्र टाइम्सने काल या संदर्भात एक बातमी दिली. ‘फक्त बिहारच नाही तर नितीशकुमारांचा आहे हा मोठा प्लॅन, पाटण्यात लागले पोस्टर’ असे या या बातमीचे शीर्षक आहे. त्यात असा दावा केलाय की, बिहारच्या पाटण्यात ‘नीतीश सबके हैं’ असे पोस्टर लागले आहे.
त्याचबरोबर महाहंट, मराठी डीबीपी न्यूज, ब्लॉगिंग पोस्ट यांनी देखील ‘नीतीश सबके हैं’ हे पोस्टर बिहारच्या पाटण्यात लागले आहे, अशी बातमी दिली आहे.
९ ऑगस्ट २०२२ रोजी बिहारमध्ये राजकीय भूकंप झाला. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यातच आता बिहारच्या पाटण्यात ‘नीतीश सबके हैं’ असे पोस्टर लागल्याचा दावा केला जात आहे.
Fact Check / Verification
बिहारच्या पाटण्यात ‘नीतीश सबके हैं’ असे पोस्टर लागले आहे, याची पडताळणी करण्यासाठी आम्ही ‘नीतीश सबके हैं’ हा फोटो गुगलवर रिव्हर्स करून शोधला. तेव्हा आम्हांला १० नोव्हेंबर २०२० मधील बीबीसी मराठीची बातमी मिळाली. या बातमी व्हायरल फोटो देखील जोडला होता.
ऑक्टोबर २०२० मध्ये बिहारच्या विधानसभा निवडणुकीची तयारी चालली होती. त्यावेळी जनता दल संयुक्त (जेडीयू) यांनी बिहारमध्ये ‘नीतीश सबके हैं’ असे पोस्टर लावले होते. त्याचबरोबर आम्हांला ७ ऑक्टोबर २०२० मधील टीव्ही ९ हिंदीची बातमी मिळाली. त्यात देखील त्यांनी व्हायरल फोटो जोडला होता.
या व्यतिरिक्त आम्हांला पत्रकार नरेंद्र नाथ मिश्रा यांचे ७ ऑक्टोबर २०२० मधील एक ट्विट मिळाले. त्या ट्विटमध्ये व्हायरल फोटो जोडत त्यांनी लिहिले की,”नीतीश सबके हैं. २०२० च्या निवडणुकीची हीच थीम आहे?”
(मूळ हिंदी ट्विटचा मराठीत अनुवाद केला आहे)
या ट्विटची संग्रहित केलेली दुवा तुम्ही इथे वाचू शकता.
Conclusion
अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, ‘नीतीश सबके हैं’ असे पोस्टर नुकतेच बिहारमधील पाटण्यात लागल्याचा दावा चुकीचा आहे. ‘नीतीश सबके हैं’ हे पोस्टर २०२० मधील बिहारच्या निवडणुकीदरम्यान लावण्यात आले होते.
Result : Partly False
Our Sources
१० नोव्हेंबर २०२० रोजी प्रकाशित झालेली बीबीसी मराठीची बातमी
७ ऑक्टोबर २०२० रोजी प्रकाशित झालेली टीव्ही ९ हिंदीची बातमी
७ ऑक्टोबर २०२० रोजीचे पत्रकार नरेंद्र नाथ मिश्रा यांचे ट्विट
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.