Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact CheckPoliticsशरद पवार यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओचे नेमके सत्य काय आहे?

शरद पवार यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओचे नेमके सत्य काय आहे?

सोशल मीडियावर शरद पवार यांचा एबीपी माझा वाहिनीचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. त्यातून असा दावा केला जातोय की, शरद पवार हिंदू धर्माची बदनामी आणि जातीयवाद करत आहे.

महाराष्ट्र भाजपाने देखील या संदर्भातचा व्हिडिओ ट्विट केला, “नास्तिक शरद पवार यांनी हिंदू देवी देवतांचे बाप काढलेत. पवार नेहमीच हिंदू धर्माचा द्वेष करतात. 

पवारांनी हिंदू धर्माची बदनामी केली नसती, जातीवाद केला नसता, देवीदेवतांचा अपमान केलाच नसता, तर ते एवढे मोठे झालेच नसते. 

पवार साहेब ह्या वयात आपल्याला शोभेल असेच वक्तव्य करा!” 

(महाराष्ट्र भाजपाने ट्विट केलेली पोस्ट जशीच्या तशी लिहिली आहे)

या ट्विटची संग्रहित केलेली दुवा तुम्ही इथे पाहू शकता.

त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच जास्त व्हायरल झाला. फेसबुकवर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. त्याचे स्क्रिनशॉट खाली जोडत आहे.

ट्विटरदेखील हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.

Fact Check / Verification

शरद पवार यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओची पडताळणी करण्यासाठी आम्ही एबीपी माझाच्या यु ट्यूब वाहिनीवर शोधला. तेव्हा आम्हांला त्यांच्या मूळ भाषणाचा व्हिडिओ मिळाला. 

९ मे २०२२ रोजी भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सातारा येथे पार पडली. तेथील शरद पवार यांचे पूर्ण भाषण आम्ही ऐकले. भाषणात बोलताना त्यांनी दोन कवितांचे दाखले दिले. त्यातच त्यांनी जवाहर राठोड यांच्या डोंगराचे ढोल या पुस्तकातील ‘पाथरवट’ या कवितेच्या माध्यमातून कष्टकऱ्यांच्या वेदना मांडणाऱ्या त्या कवितेचा आशय मांडला. चौकोन केलेल्या कवितेचा आशय मांडत शरद पवार म्हणाले,”आम्ही पाथरवट तुमचा दगड धोंडा, आम्ही आमच्या छन्नी आणि हातोड्याने फोडतो. त्यातून तुमच्या घरात अन्न तयार करायला, पीठ तयार करायला जे जातं लागतं. ते आम्ही घडवतो. त्या जात्यातून पीठ निघत त्याने तुमचं पोट भरतं.”

पुढे बोलतांना ते म्हणाले,”यामध्ये कवी म्हणतो, आज आम्ही अनेक गोष्टी घडवल्या. आमच्या छन्नीने, हातोड्याने आणि घामाने. एक दिवशी तुम्ही ज्यांची पूजा करता. त्या ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या मूर्ती आम्ही घडवल्या. तुम्ही त्या मंदिरात ठेवल्या आणि साल्यांनो, त्या मंदिरात आम्हांला येऊ देत नाही. मला प्रश्न तुम्हांला विचरायचा आहे की, ब्रह्मा, विष्णू, महेश हा आम्ही आमच्या छन्नीने घडवला. हा तुमचा देव आणि तुमचा देव बनवणारे, तुमच्या देवाचे बाप आम्ही आहोत. त्यामुळे आमच्यावरचा अन्याय आम्ही सहन करणार नाही. अशा प्रकारचे ते काव्य मला आठवतंय की, ते जवाहरने लिहून ठेवलं होतं.”

फोटो साभार : Twitter@NCPspeaks

आपण ९ मे २०२२ रोजी या व्हिडिओचा संपूर्ण घटनाक्रम समजून घेऊ. शरद पवार यांच्या मूळ भाषणाचा व्हिडिओ एबीपी माझाने त्यांच्या अधिकृत यु ट्यूब वाहिनीवर १२ वाजून ५१ मिनिटांनी टाकला. हा व्हिडिओ १७ मिनिटे १४ सेकंदाचा आहे.

फोटो साभार : YouTube/ABP MAJHA

त्यानंतर एबीपी माझाने जवळपास तासाभराने मूळ भाषणाच्या व्हिडिओचा शेवटचा भाग घेऊन तो एडिट केला. मग १ मिनिटे ४३ सेकंदाचा तो एडिट केलेला व्हिडिओ १ वाजून ४७ मिनिटांनी त्यांच्या यु ट्यूब वाहिनीवर अपलोड केला. 

फोटो साभार : YouTube/ABP MAJHA

यानंतर भाजपा महाराष्ट्र यांनी एबीपी माझाचा हाच १ मिनिटे ४३ सेकंदाचा व्हिडिओ २ वाजून ३० मिनिटांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून अपलोड केला. मग हा व्हिडिओ पुन्हा एडिट करून २७ ते ३० सेकंदांचा झाला आणि हाच व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. 

फोटो साभार : Twitter@BJP4Maharashtra

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या एडिटेड व्हिडिओचा विपर्यास अर्थ काढला जात होता. मग शरद पवार यांनी आज १३ मे २०२२ रोजी स्वतः ही कविता वाचून दाखवली. त्या कवितेचा संदर्भासहित स्पष्टीकरण दिले. 

Conclusion

अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, शरद पवार यांच्या भाषणाच्या व्हिडिओचा काही भाग विपर्यास अर्थाने शेअर केला जात आहे. 

Result : False Context/Missing Context

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular